Login

अजब गजब लग्न भाग - 43

पाखी आणी राज एकत्र येतील का? त्यांच्या आणी तिच्या आजोबांना सगळे समजेल का? त्यांचे पुढे काय होईल.
दीर्घकथा लेखन स्पर्धा  डिसेंबर- जानेवारी 2025-26
अजब गजब लग्न भाग - 43



राज आणि आजोबा घरी पोहोचले.
घर शांत होते, पण आजोबांच्या चेहऱ्यावर एक उत्साह आणि हलकीशी भीती दिसत होती.

आजोबा हळूच म्हणाले,
“राज, हे कागद नीट ठेवून दे.”

राजने त्यांना बघत,
कागद हातात घेतले. तो कागद म्हणजे लग्नाचे सर्टिफिकेट होता
ते दोघांनी कोर्टमध्ये केव्हाही दाखवले नव्हते.

राजने कागद जमिनीवर ठेवून नाही,
नक्कीच सावधपणे हातात धरले आणि
आजोबांकडे दिले.

“हो आजोबा, मी नीट ठेवतो,”
राजने शांतपणे म्हटले.

आजोबांनी त्याच्या डोळ्यात पाहिले.
त्यांच्या चेहऱ्यावर संतोष होता, आणि मनात एक उत्सुकता होते

आजोबांनी कागद स्वीकारून
त्याला हातावरून हलकेच स्पर्श केला.

“अरे, आता हळूहळू सगळं जमेल,”
आजोबांनी आश्वस्तपणे म्हणाले.

राजने डोळे थोडे उघडे ठेवून
गाढ श्वास घेतला,
आणि त्याच्या मनात एक नवीन आशा उभी राहिली.


---


राज थोडा वेळ शांत उभा राहिला.
मग हळूच आजोबांकडे पाहून म्हणाला

राज म्हणाला,
“आजोबा… मला पाखीला काही सांगायच्या आधी
तिच्या आजोबांना भेटायचं आहे.”

आजोबांनी चष्मा काढून राजकडे पाहिलं.
त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची हलकीशी स्माईल उमटली.

आजोबा म्हणाले,
“हेच ऐकायचं होतं मला.
आधी मोठ्यांचा आशीर्वाद, मग बाकी सगळं.”

राज थोडा निर्धाराने म्हणाला

राज म्हणाला
“आज मी घरीच आहे.
तर… आत्ताच जाऊन येऊ का?”

आजोबा हसले.
त्या हसण्यात विश्वास होता, प्रेम होतं.

आजोबा म्हणाले,
“जा रे.
मनात जे योग्य वाटतंय तेच कर.
पाखी चांगली मुलगी आहे, तिच्या आजोबांचं मन जिंकणं महत्त्वाचं आहे.”

राजने हलकं मान वाकवून
आजोबांच्या पायाला हात लावला.

राज म्हणाला.
“तुमचा आशीर्वाद असला की सगळं सोपं होतं.”

आजोबा समाधानाने म्हणाले

आजोबा म्हणाले
“देव तुझ्या पाठीशी आहे.
आता उशीर करू नकोस.”

राजच्या चेहऱ्यावर निर्धार आणि आशेचं मिश्र भाव होतं.
तो पाखीच्या आयुष्याकडे एक पाऊल पुढे टाकायला निघाला होता…


---
राज हॉस्पिटलमध्ये पोहचला.

हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये शांतता होती.
मशिन्सचा हलका आवाज आणि औषधांचा वास…
राज हळू पावलांनी चालत पाखीच्या आजोबांच्या रूमसमोर आला.

दारासमोर क्षणभर थांबला. छातीत धडधड वाढली होती.

तो हळूच दार उघडतो.

पाखीचे आजोबा बेडवर झोपले होते.
कमकुवत, पण डोळ्यांत तीच मायेची झलक होती.

आजोबांनी राजकडे पाहिलं.

आजोबा म्हणाले,
“राज… तू आलास?”

राज पुढे आला.
डोळे खाली घातले.

राज म्हणाला,
“हो आजोबा… मी तुमची तब्येत विचारायला आणि…
एक महत्त्वाची गोष्ट बोलायला आलो आहे.”

आजोबांनी डोळ्यांनीच बसायला सांगितलं.

राज खुर्चीत बसला, पण अस्वस्थ होता.

राज म्हणाला,
“आजोबा,
मी तुमच्यासमोर हात जोडून माफी मागतो.”

तो खरंच हात जोडतो.

राज म्हणाला,
“माझ्यामुळे पाखीच्या आयुष्यात गोंधळ झाला.
तिच्या मनाला त्रास झाला.
हे सगळं माझ्या चुकीमुळे घडलं.”

आजोबा शांतपणे ऐकत होते.

राज म्हणाला,
“मी तिला दुखावायचा विचार कधीच केला नाही,
पण तरीही चूक झालीच. आजोबा… मला माफ करा.”

आजोबांनी क्षणभर डोळे मिटले.
श्वास थोडा खोल घेतला.

आजोबा म्हणाले,
“राज…
आयुष्यात सगळं आपल्या हातात नसतं.”

राज वर पाहतो.

आजोबा म्हणाले,
“पण जे झालं, त्याची जबाबदारी घेणं…
ते फार मोठं असतं.”

आजोबांचा हात हळूच राजाच्या हातावर पडतो.

आजोबा म्हणाले,
“मी तुला माफ केलं आहे.”

राजच्या डोळ्यांत पाणी आलं.

राज म्हणाला
“खरंच…?”

आजोबा म्हणाले,
“हो रे.
तू मनापासून आलायस, ते मला कळतंय.”

राजचा श्वास हलका झाला.

आजोबा म्हणाले
“फक्त एकच अपेक्षा आहे…”

राज म्हणाला
“सांगा आजोबा.”

आजोबा म्हणाले,
“पाखीला कधीही दुखावू नकोस.
ती खूप निरागस आहे.”

राज ठामपणे मान हलवतो.

राज म्हणाला,
“मी तिच्या आनंदासाठी
सगळं करेन… हे वचन आहे.”

आजोबांच्या चेहऱ्यावर हलकी स्माईल उमटली.

आजोबा म्हणाले,
“मग मला आता काहीच काळजी नाही.”

राज उभा राहिला.
नम्रपणे आजोबांच्या पायाला हात लावला.

राज म्हणाला,
“लवकर बरे व्हा आजोबा.”

राज बाहेर पडला…
मनात अपराधभाव कमी झाला होता,
पण जबाबदारीची जाणीव अधिक घट्ट झाली होती.


---


.क्रमश

पाखीला समजेल का? राज तिचा नवरा आहे ....

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all