Login

अजब गजब लग्न - भाग 45

पाखी आणी राज एकत्र येतील का? त्यांच्या आणी तिच्या आजोबांना सगळे समजेल का? त्यांचे पुढे काय होईल.
दीर्घकथा लेखन स्पर्धा  डिसेंबर- जानेवारी 2025-26
अजब गजब लग्न - भाग 45


पाखी हॉस्पिटलच्या रूममध्ये शिरली. आजोबा बेडवर टेकून बसले होते. तिला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर हलकी स्माईल आली.

“आलीस का ग?” ते प्रेमाने म्हणाले.

पाखी त्यांच्या जवळ जाऊन बसली. हातात हात घेतला.

“आजोबा… तब्येत कशी आहे?” ती काळजीने विचारते.

“आता बरं वाटतंय,” ते हळूच म्हणाले.

थोडा वेळ शांतता होती. पाखी काहीतरी विचारत होती,
पण शब्द गळ्यातच अडकत होते.

तेवढ्यात आजोबा स्वतःच बोलायला लागले

“पाखी…” त्यांचा आवाज थोडा गंभीर झाला.

पाखी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहू लागली.

“आज… तुझा तो… राज माझ्या भेटायला आला होता.”

हे नाव कानावर पडताच पाखीचे डोळे पाणावले.

“तो…?” ती हळूच म्हणाली.

“हो ग,” आजोबा पुढे म्हणाले,
“तो माझ्याशी खूप शांतपणे बोलत होता. डोळ्यांत खूप पश्चात्ताप होता त्याच्या.”

पाखीचा श्वास थरथरला.

“तो… माझी माफी मागत होता,”nआजोबा म्हणाले.

“म्हणत होता ‘मी चूक केली आजोबा.
पाखीला त्रास झाला. तिला सत्यापासून दूर ठेवलं…
मला माफ करा.’”

पाखीच्या डोळ्यांतून नकळत अश्रू ओघळले.

“आजोबा…” ती काही बोलणार तेवढ्यात

“मी त्याला माफ केलं ग,” आजोबा शांतपणे म्हणाले.

पाखी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागली.

“कारण मला त्याच्या बोलण्यात खोटेपणा जाणवला नाही.
तो खरंच पश्चात्ताप करत होता. आणि… तो तुझी काळजी घेतो. असे पण म्हणाला.”

पाखी खाली मान घालून बसली.

मनात एकच वाक्य घुमत होतं

त्यांना माझी काळजी होती का?…

आजोबा तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले..

“कधी कधी नात्यांची सुरुवात चुकीची होते, पण शेवट सुंदर होऊ शकतो… फक्त थोडं धैर्य लागते.”

पाखी काहीच बोलली नाही. पण तिच्या मनात हळूहळू सत्य स्वीकारण्याची सुरुवात होत होती…

---


आजोबा पाखीकडे शांतपणे पाहत होते. थोडा वेळ थांबून त्यांनी हळू आवाजात विचारलं

“पाखी… तो जर तुझी माफी मागायला आला,
तर… तू त्याला माफ करशील का?” आजोबा शांत पणे म्हणाले.

हा प्रश्न ऐकताच पाखी थिजून गेली.
तिने नजर खाली झुकवली. ओठ थरथरले… पण शब्द बाहेरच आले नाहीत.

माफी…? ती मनात म्हणाली.

मनात विचारांचा वादळ उठलं

मी त्याच्यावर प्रेम करायला लागले आहे… हे मी कधी मान्य केलं? राज सर… नाही…
राज… काय गोधळ आहे..

तिचं हृदय जोरात धडधडू लागलं.

तो माझा बॉस आहे. तो दुसऱ्याचा नवरा आहे…
की… माझाच? तिचा श्वास अडखळला.

जर माझं लग्न त्याच्याशीच झालं असेल… तर मी कोणापासून दूर राहतेय आणि जर ते लग्न फक्त कागदावर असेल… तर माझ्या मनाचं काय?

डोळ्यांसमोर त्याचं हसणं, ऑफिसमधला त्याचा रुबाब आणि पार्टीत त्याच्यासोबतचा क्षण सगळं एकामागोमाग एक तरळून गेलं.

मी त्याला टाळायचा प्रयत्न केला… पण मन ऐकतच नाही.

ती मनातच प्रश्न विचारत होती

मी प्रेमात पडले आहे का? की हे फक्त जवळीक आहे?

आणि जर तो माझा नवरा असेल… तर मला त्याला माफ करायलाच हवं का? की माझ्या वेदनेचा हिशेब मागावा?

आजोबांचा आवाज पुन्हा कानावर पडला

“पाखी… घाईत उत्तर देऊ नकोस, मन ऐक… vउत्तर आपोआप मिळेल.”

पाखीने डोळे मिटले. एक अश्रू ओघळला.

माफ करणं म्हणजे विसरणं नाही… पण स्वीकारणं आहे.

ती अजूनही संभ्रमात होती. पण एक गोष्ट मात्र नक्की होती—

राज तिच्यासाठी आता फक्त ‘सर’ राहिलेला नव्हता…


---




क्रमश

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all