Login

अजब गजब लग्न - भाग 46

पाखी आणी राज एकत्र येतील का? त्यांच्या आणी तिच्या आजोबांना सगळे समजेल का? त्यांचे पुढे काय होईल.
दीर्घकथा लेखन स्पर्धा  डिसेंबर- जानेवारी 2025-26
अजब गजब लग्न - भाग 46


पाखी थोडा वेळ शांत बसली होती. मनात भीती, गोंधळ आणि ओढ… सगळं एकत्र दाटलं होतं. तिने हळू आवाजात विचारलं

“आजोबा…
तुम्हाला काय वाटतं… मी त्यांच्या घरी राहायला जाऊ का?” पाखी म्हणाली.

आजोबांनी तिच्याकडे प्रेमाने पाहिलं. हसत पण ठामपणे म्हणाले

“तुझा नवरा आहे म्हटल्यावर,
एक ना एक दिवस तुला त्यांच्या घरी जायचंच लागेल ना, पाखी.” आजोबा म्हणाले

पाखीची नजर खाली गेली. तिच्या डोळ्यांत पाणी तरळलं.

“पण आजोबा… मग तुमचं काय होईल? मला तुमची खूप काळजी वाटते,” ती म्हणाली.

आजोबा तिचा हात हातात घेत म्हणाले

“अग वेडी आहेस का तू? मी इथे मस्त आहे. तू खुश राहा, तेवढंच मला हवं आहे. मला भेटायला येत जा… माझी अजिबात काळजी करू नकोस.”

पाखीने डोळे पुसले. पण मनातली भीती अजूनही गेली नव्हती.

“मला काळजी वाटते ना… ते लोक कसे असतील? मला थोडी भीती वाटते,” पाखी हळूच म्हणाली.

आजोबा हसले. त्या हसण्यात विश्वास होता, अनुभव होता.

“घाबरू नकोस पाखी… खूप चांगले लोक आहेत ते.
आणि… तुझ्यासारखी मुलगी त्यांना मिळाली आहे,
याचं त्यांनाच नशीब काढावं लागेल.”

पाखीच्या मनात थोडा धीर आला.
पण आयुष्याचा नवा टप्पा सुरू होणार होता… हे तिला आता नक्की जाणवत होतं.


---


पाखी थोडा वेळ आजोबांसोबत बसली. कधी लहानपणीच्या आठवणी निघाल्या, कधी तिच्या ऑफिसच्या गमतीजमती…
तर कधी फक्त शांत बसून एकमेकांच्या हातात हात ठेवून गप्पा.

आजोबा मधेच म्हणाले, “पाखी, तू खूप मोठी झाली आहेस रे…
आयुष्य समजून घेतेयस.”

पाखी हसली. पण त्या हास्यात थोडी चिंता, थोडी ओढ लपलेली होती.

“आजोबा, मी रोज येत जाईन तुम्हाला भेटायला,” ती म्हणाली.

“मला माहित आहे,” आजोबा प्रेमाने म्हणाले,
“जा आता… उशीर होतोय.”

पाखीने आजोबांच्या पायांवर डोकं ठेवलं.
त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला.

“देव तुला सुखी ठेवो,” ते म्हणाले.

पाखी हळूच उठली, एकदा मागे वळून पाहिलं… आणि मनात अनेक विचार घेऊन ती घरी निघून गेली.


---


पाखी घरी पोहचली.
दार लावलं… पाठीला टेकून थोडा वेळ तशीच उभी राहिली.
मन भरून आलं होतं, पण रडू येत नव्हतं.
डोक्यात विचारांचा गोंधळ चालू होता.

मी काय करायचं आहे?
राज सर… माझे मिस्टर… हे सगळं इतकं गुंतागुंतीचं कसं झालं?

तिने मोबाईल हातात घेतला.
राशीला कॉल लावला.

पहिल्याच रिंगला कॉल उचलला गेला.

“पाखी… काय झालं?” राशीचा काळजीचा आवाज आला

पाखी क्षणभर गप्प राहिली. मग हळूच म्हणाली,
“राशी… मला काहीच समजत नाहीये.”

“आधी श्वास घे,” राशी म्हणाली,
“आणि सगळं नीट सांग. मी ऐकते.”

पाखी बेडवर बसली. डोळे मिटले…
आणि शब्द हळूहळू बाहेर येऊ लागले.


---

पाखीचा आवाज थरथरत होता.
ती राशीशी बोलत होती… पण शब्द जड झाले होते.

“राशी… मी तुला सगळं सांगतेय, कारण आता हे ओझं एकटीने पेलवत नाहीये,” पाखी म्हणाली.

“माझा नवरा… तो आता माझ्या आयुष्यात परत आला आहे.
तो आजोबांना भेटून गेला आहे… त्यांची माफी पण मागितली आहे.
माझ्या समोर अजून आलेला नाही, पण मला जाणवतंय… तो येणारच आहे.” पाखी म्हणाली,

राशी शांतपणे ऐकत होती.

“माझ्या मनात भीती आहे, गोंधळ आहे,” पाखी पुढे म्हणाली,
“ऑफिसमध्ये मी त्यांना ‘सर’ म्हणते… आणि घरी बसून विचार करते तोच माझा नवरा आहे का?
मी काय करायचं, राशी?” पाखी म्हणाली.

फोनच्या त्या टोकाला थोडा वेळ शांतता होती.
मग राशी ठामपणे म्हणाली

“पाखी, पळून काही सुटत नाही. तू त्याला भेट.
समोरासमोर. आणी बोलून घे ” राशी म्हणाली.

“तो कोण आहे, कसा आहे, त्याच्या डोळ्यात काय आहे हे तू स्वतः पाहिलं पाहिजे.”

“आजपर्यंत सगळे निर्णय इतरांनी घेतले.
आता हा निर्णय तुझा आहे.”

पाखीच्या डोळ्यांत पाणी आलं…
पण मनात थोडी ताकदही आली.

“हो राशी…” ती हळूच म्हणाली,
“मी भेटेन. जे असेल ते समोरासमोर पाहीन.”

फोन ठेवताना पाखीने खोल श्वास घेतला.
आता भीती होतीच… पण त्यापेक्षा जास्त होती
सत्य जाणून घेण्याची तयारी.


---




क्रमश

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all