दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर- जानेवारी 2025-26
अजब गजब लग्न - भाग 48
अजब गजब लग्न - भाग 48
,पाखी ऑफिसला आली.
नेहमीसारखीच कामाला लागली… पण आज मन थोडं अस्वस्थ होतं.
थोड्यावेळाने राज ऑफिसमध्ये आला. आज मात्र तो वेगळाच वाटत होता. त्यांची नजर थेट पाखीवर थांबली होती
राग, अॅटिट्यूड नाही… फक्त प्रेम होते
राग, अॅटिट्यूड नाही… फक्त प्रेम होते
पाखीचं लक्ष त्याच्याकडे गेलं. ती क्षणभर गोंधळली.
हृदयाची धडधड वाढली. नजर खाली झुकवली… गालांवर नकळत लाज उतरली.
हृदयाची धडधड वाढली. नजर खाली झुकवली… गालांवर नकळत लाज उतरली.
सर आज माझ्याकडे असे का बघत आहेत?
मला वेगळं का वाटतंय?
आणि… मला लाज का येतेय?
मला वेगळं का वाटतंय?
आणि… मला लाज का येतेय?
पाखी मनातच विचार करत होती. उत्तर काहीच सापडत नव्हतं… पण एक गोष्ट स्पष्ट होती
आज राजची नजर तिच्या मनाला चुकवत नव्हती.
आज राजची नजर तिच्या मनाला चुकवत नव्हती.
पाखी शेड्युल घेऊन राजच्या केबिनमध्ये आली.
नेहमीप्रमाणे शांतपणे, प्रोफेशनल पद्धतीने तिने फाईल पुढे केली.
राजने शेड्युल घेतलं.
पाखी वळून जायला लागली… तेवढ्यात राज म्हणाला,
पाखी वळून जायला लागली… तेवढ्यात राज म्हणाला,
“पाखी, ऑफिस संपल्यावर थोडं बोलायचं आहे.
कॉफी शॉपमध्ये जाऊ या.”
कॉफी शॉपमध्ये जाऊ या.”
पाखी क्षणभर थांबली.
डोळ्यांत कोणताही प्रश्न नाही, कुठलाही आग्रह नाही.
“ओके,” एवढंच म्हणाली… आणि तिथून निघून गेली.
डोळ्यांत कोणताही प्रश्न नाही, कुठलाही आग्रह नाही.
“ओके,” एवढंच म्हणाली… आणि तिथून निघून गेली.
राज तिच्याकडे पाहतच राहिला.
ही अशी काय वागतेय?
एक शब्द जास्त नाही, एक प्रश्न नाही…
आज मला सगळं सांगायचंच आहे.
एक शब्द जास्त नाही, एक प्रश्न नाही…
आज मला सगळं सांगायचंच आहे.
राज मनात म्हणाला.
आता उशीर नको… आजच तिला सत्य कळायला हवं.
आता उशीर नको… आजच तिला सत्य कळायला हवं.
.......
राजचे आजोबा पाखीच्या आजोबांना भेटायला आले.
दोघेही समोरासमोर बसले. चेहऱ्यावर शांतता होती, डोळ्यांत आपुलकी होती.
दोघेही समोरासमोर बसले. चेहऱ्यावर शांतता होती, डोळ्यांत आपुलकी होती.
“आता सगळं चांगलं होईल,” राजचे आजोबा म्हणाले.
“जे गैरसमज होते, ते संपायला हवेत.”
“जे गैरसमज होते, ते संपायला हवेत.”
पाखीचे आजोबा हळूच हसले.
“हो… आता वेळ आली आहे. मुलांच्या आयुष्यात स्पष्टता यायला हवी.
मनात गोंधळ ठेवून नाती पुढे जात नाहीत.”
“हो… आता वेळ आली आहे. मुलांच्या आयुष्यात स्पष्टता यायला हवी.
मनात गोंधळ ठेवून नाती पुढे जात नाहीत.”
“राज चुकला आहे, पण त्याला त्याची चूक कळली आहे,”
राजचे आजोबा गंभीरपणे म्हणाले.
“तो पाखीला स्वीकारायला, तिची जबाबदारी घ्यायला तयार आहे.”
राजचे आजोबा गंभीरपणे म्हणाले.
“तो पाखीला स्वीकारायला, तिची जबाबदारी घ्यायला तयार आहे.”
“पाखीचं मनही आता गुंतलं आहे,” पाखीचे आजोबा म्हणाले.
“पण भीती आहे… अनिश्चिततेची.”
“पण भीती आहे… अनिश्चिततेची.”
“ती भीती आम्ही दूर करू,” राजचे आजोबा ठामपणे म्हणाले.
“आता नातं लपवायचं नाही, पळायचं नाही.
सरळ, सन्मानाने सगळं होईल.”
“आता नातं लपवायचं नाही, पळायचं नाही.
सरळ, सन्मानाने सगळं होईल.”
दोघेही क्षणभर शांत झाले.
त्या शांततेत एकच विश्वास होता
त्या शांततेत एकच विश्वास होता
आता सगळं खरंच चांगलं होणार होतं.
“मला काय वाटतं,” राजचे आजोबा शांतपणे म्हणाले,
“आपण मुलांचं लग्न पुन्हा केलं तर… सगळं नीट, सन्मानाने, समाजासमोर होईल.” राजचे आजोबा म्हणाले
“आपण मुलांचं लग्न पुन्हा केलं तर… सगळं नीट, सन्मानाने, समाजासमोर होईल.” राजचे आजोबा म्हणाले
पाखीचे आजोबा लगेच हसले. “अरे, हे तर फारच छान आहे.
आज राज पाखीशी बोलणार आहे.bकालच तो मला सांगून गेला.”
आज राज पाखीशी बोलणार आहे.bकालच तो मला सांगून गेला.”
“बरं झालं,” राजचे आजोबा समाधानाने म्हणाले.
“आधी राजला पाखीशी मोकळेपणाने बोलू दे.
तिचं मन ऐकू दे, तिचा निर्णय समजू दे.”
“आधी राजला पाखीशी मोकळेपणाने बोलू दे.
तिचं मन ऐकू दे, तिचा निर्णय समजू दे.”
ते थोडा वेळ थांबले आणि पुढे म्हणाले,
“मग आपण सगळे मिळून बसूया… आणि जे योग्य असेल, ते ठरवूया.”
“मग आपण सगळे मिळून बसूया… आणि जे योग्य असेल, ते ठरवूया.”
पाखीचे आजोबा मान हलवून म्हणाले,
“हो… आता घाई नको. मुलांच्या मनातला गोंधळ संपला,
की नात्यालाही नवी सुरुवात मिळेल.”
“हो… आता घाई नको. मुलांच्या मनातला गोंधळ संपला,
की नात्यालाही नवी सुरुवात मिळेल.”
दोघेही एकमेकांकडे पाहून हसले. मनात एकच भावना होती
या वेळी नातं जबरदस्तीने नाही, तर समजून घेऊन जुळणार होतं.
या वेळी नातं जबरदस्तीने नाही, तर समजून घेऊन जुळणार होतं.
.....
ऑफिसचा वेळ संपला होता.
एकामागोमाग एक सगळे कर्मचारी घरी जायला निघाले होते.
कॉरिडॉर शांत होत चालला होता.
एकामागोमाग एक सगळे कर्मचारी घरी जायला निघाले होते.
कॉरिडॉर शांत होत चालला होता.
पाखी मात्र तिच्या जागेवरच थांबली होती.
मनात विचारांचा गोंधळ…
आज काय होणार आहे, हे तिलाही कळत नव्हतं.
मनात विचारांचा गोंधळ…
आज काय होणार आहे, हे तिलाही कळत नव्हतं.
राज अजूनही केबिनमध्येच होता.
तो फाइल्स आवरत होता, पण लक्ष मात्र वारंवार घड्याळाकडे आणि बाहेरच्या दिशेने जात होतं.
तो फाइल्स आवरत होता, पण लक्ष मात्र वारंवार घड्याळाकडे आणि बाहेरच्या दिशेने जात होतं.
थोड्या वेळाने पूर्ण ऑफिस रिकामं झालं.
तेव्हा राज केबिनमधून बाहेर आला.
पाखीला तिथेच उभी पाहून तो क्षणभर थांबला.
तिच्याकडे पाहून हळूच म्हणाला,
“सॉरी… वाट पाहायला लावली.”
तिच्याकडे पाहून हळूच म्हणाला,
“सॉरी… वाट पाहायला लावली.”
“नाही सर… मीच थांबले होते,” पाखी शांतपणे म्हणाली.
राज जवळ आला. त्याच्या आवाजात आज वेगळाच ओलावा होता.
“चला… आपण कॉफी शॉपला जाऊया.
आज मला खूप काही बोलायचं आहे.”
“चला… आपण कॉफी शॉपला जाऊया.
आज मला खूप काही बोलायचं आहे.”
पाखीने मान हलवली.
दोघेही ऑफिसच्या बाहेर पडले.
दोघेही ऑफिसच्या बाहेर पडले.
दार बंद झालं…
आणि त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा संवाद
आता सुरू होणार होता.
आणि त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा संवाद
आता सुरू होणार होता.
दोघेही कॉफी शॉपमध्ये पोहोचले.
संध्याकाळची सौम्य लाईट्स, हलकंसं संगीत, कॉफीचा दरवळ… सगळं वातावरणच वेगळं वाटत होतं.
राजने कोपऱ्यातली एक शांत टेबल निवडली.
दोघे समोरासमोर बसले.
दोघे समोरासमोर बसले.
पाखी थोडीशी गोंधळलेली होती.
हातातली पर्स घट्ट धरून बसली होती.
राज मात्र तिला शांतपणे पाहत होता.
हातातली पर्स घट्ट धरून बसली होती.
राज मात्र तिला शांतपणे पाहत होता.
“काय घेशील?” राजने विचारलं.
“काहीही चालेल,” पाखी हळूच म्हणाली.
राजने दोन कॉफी ऑर्डर केल्या.
थोडा वेळ दोघेही शांत होते.
त्या शांततेतही खूप काही दडलेलं होतं.
त्या शांततेतही खूप काही दडलेलं होतं.
कॉफी आली.
राजने कप हातात घेतला… पण प्यायचं विसरून गेला.
राजने कप हातात घेतला… पण प्यायचं विसरून गेला.
“पाखी…” तो थोडा थांबून म्हणाला,
“आज मी जे सांगणार आहे… ते ऐकायला सोपं नाही.
पण ते लपवून ठेवण्यापेक्षा सांगणं योग्य वाटलं.”
“आज मी जे सांगणार आहे… ते ऐकायला सोपं नाही.
पण ते लपवून ठेवण्यापेक्षा सांगणं योग्य वाटलं.”
पाखीचे हृदय जोरात धडधडू लागलं.
तिने नजर खाली घातली, “सर… तुम्ही बोला,” ती म्हणाली.
तिने नजर खाली घातली, “सर… तुम्ही बोला,” ती म्हणाली.
राजने एक दीर्घ श्वास घेतला. आता सत्य बाहेर येणार होतं…
क्रमश
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
दिपाली चौधरी
तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी कमेंट करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा