दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर- जानेवारी 2025-26
अजब गजब लग्न - भाग 49
अजब गजब लग्न - भाग 49
राजने आधीच दुसरा टेबल बुक करून ठेवलं होतं.
ते टेबल खूप छान सजवलेलं होतं
रेड हार्ट बलून, मेणबत्त्या, फुलांची हलकी सजावट… मध्यभागी एक छोटासा केक ठेवलेला होता.
पाखी सगळं बघतच राहिली. राज तिला तिथे घेऊन आला होता.
तिच्या डोळ्यांत आश्चर्य दाटलं. हे सगळं अचानक होतं… आणि तिच्यासाठीच होत.
“सर… हे सगळं…?” पाखीच्या आवाजात गोंधळही होता आणि उत्सुकताही.
राज हळूच हसला. “तुझ्यासाठी आहे पाखी,” तो शांतपणे म्हणाला.
पाखीचे हात थरथरले. तिला काही क्षण कळेचनासं झालं.
इतकं सुंदर… इतकं खास… आणि तेही राजकडून.
इतकं सुंदर… इतकं खास… आणि तेही राजकडून.
“मला असं वाटलं,” राज पुढे म्हणाला,
“आज जे बोलायचं आहे, ते साध्या जागेत नाही… तर थोडंसं खास असावं.”
“आज जे बोलायचं आहे, ते साध्या जागेत नाही… तर थोडंसं खास असावं.”
पाखीची नजर केकवर गेली… मग बलूनवर…
आणि शेवटी राजच्या चेहऱ्यावर थांबली.
आणि शेवटी राजच्या चेहऱ्यावर थांबली.
तिच्या मनात हजार विचार घोंघावत होते.
आनंद… भीती… प्रश्न… आणि कुठेतरी लपलेली आशा.
आनंद… भीती… प्रश्न… आणि कुठेतरी लपलेली आशा.
“सर…” ती काहीतरी बोलायला गेली,
पण शब्दच सापडत नव्हते.
पण शब्दच सापडत नव्हते.
राजने तिच्याकडे प्रेमाने पाहिलं. आता तो सत्य सांगणार होता…
राजने एक खोल श्वास घेतला.
थोडा वेळ शांतता होती… कॉफी शॉपमधील हलकं संगीत, मेणबत्त्यांचा उजेड, आणि पाखीचे अस्वस्थ डोळे सगळं क्षण थांबल्यासारखं वाटत होतं.
थोडा वेळ शांतता होती… कॉफी शॉपमधील हलकं संगीत, मेणबत्त्यांचा उजेड, आणि पाखीचे अस्वस्थ डोळे सगळं क्षण थांबल्यासारखं वाटत होतं.
राज खुर्चीतून उभा राहिला.
पाखीच्या हृदयाची धडधड वाढली.
पाखीच्या हृदयाची धडधड वाढली.
“पाखी…”
त्याचा आवाज थोडा थरथरत होता, पण डोळ्यांत प्रामाणिकपणा होता.
“मला माहीत आहे, हे सगळं अचानक आहे. कदाचित तुला विचित्रही वाटेल. पण जे मनात आहे ते सांगितल्याशिवाय मला आज शांत बसता येणार नाही.”
त्याचा आवाज थोडा थरथरत होता, पण डोळ्यांत प्रामाणिकपणा होता.
“मला माहीत आहे, हे सगळं अचानक आहे. कदाचित तुला विचित्रही वाटेल. पण जे मनात आहे ते सांगितल्याशिवाय मला आज शांत बसता येणार नाही.”
तो तिच्या समोर आला.
हळूच तिचा हात हातात घेतला.
हळूच तिचा हात हातात घेतला.
“कधी, कसं… मला कळलंच नाही. पण तुझ्याशी बोलताना, तुला बघताना, तुझ्या शांत स्वभावात… मी कधी तुझ्या प्रेमात पडलो, ते समजलंच नाही.”
पाखीचे डोळे पाणावले.
ती काही बोलू शकत नव्हती.
ती काही बोलू शकत नव्हती.
“मी तुझ्यावर प्रेम करतो, पाखी,”
राज ठामपणे म्हणाला.
“फक्त ऑफिसचा बॉस म्हणून नाही… तर एक माणूस म्हणून, जो आयुष्यभर तुझा हात सोडणार नाही.”
राज ठामपणे म्हणाला.
“फक्त ऑफिसचा बॉस म्हणून नाही… तर एक माणूस म्हणून, जो आयुष्यभर तुझा हात सोडणार नाही.”
तो थोडा थांबला, मग म्हणाला,
“माझ्या आयुष्यात खूप चुका झाल्या. नकळत तुला दुखावलंही असेल. पण आज मी तुला मनापासून विचारतोय…”
“माझ्या आयुष्यात खूप चुका झाल्या. नकळत तुला दुखावलंही असेल. पण आज मी तुला मनापासून विचारतोय…”
राजने गुडघ्यावर बसत, छोटासा रिंग बॉक्स उघडला.
“पाखी…
माझी बायको म्हणून, माझ्या आयुष्याची साथीदार म्हणून…
तू माझ्यासोबत आयुष्य चालशील का?”
माझी बायको म्हणून, माझ्या आयुष्याची साथीदार म्हणून…
तू माझ्यासोबत आयुष्य चालशील का?”
पाखीच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले.
तिच्या मनात आजोबा, भूतकाळ, भीती… सगळं एकाच वेळी आलं.
पण त्याहून मोठं एकच सत्य होतं
तिच्या मनात आजोबा, भूतकाळ, भीती… सगळं एकाच वेळी आलं.
पण त्याहून मोठं एकच सत्य होतं
तीही राजवर प्रेम करू लागली होती
ती हळूच म्हणाली…
“राज…”
आवाज थरथरत होता, पण चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं.
“राज…”
आवाज थरथरत होता, पण चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं.
पाखी काही क्षण शांत राहिली.
तिच्या डोळ्यांत अश्रू होते, पण त्यात भीतीपेक्षा जास्त खरं प्रेम दिसत होतं.
तिच्या डोळ्यांत अश्रू होते, पण त्यात भीतीपेक्षा जास्त खरं प्रेम दिसत होतं.
तिने राजकडे पाहिलं…
आणि हळूच बोलायला सुरुवात केली.
आणि हळूच बोलायला सुरुवात केली.
“राज…
मलाही काही सांगायचं आहे.”
मलाही काही सांगायचं आहे.”
राज उभा राहिला. तिच्या समोर शांतपणे उभा राहून ऐकू लागला.
“सुरुवातीला मी तुला फक्त सर म्हणूनच पाहिलं,” पाखी म्हणाली.
“पण हळूहळू… तुझं बोलणं, तुझी काळजी, तुझा शांत स्वभाव हे सगळं माझ्या मनात घर करू लागलं.”
“पण हळूहळू… तुझं बोलणं, तुझी काळजी, तुझा शांत स्वभाव हे सगळं माझ्या मनात घर करू लागलं.”
ती थोडी थांबली. श्वास सावरत म्हणाली
“पण मला खूप भीती वाटत होती.
तुझं लग्न झालं आहे, असं मला वाटत होतं.
म्हणूनच मी स्वतःला तुझ्यापासून दूर ठेवायचा प्रयत्न करत होते.”
तुझं लग्न झालं आहे, असं मला वाटत होतं.
म्हणूनच मी स्वतःला तुझ्यापासून दूर ठेवायचा प्रयत्न करत होते.”
राज आश्चर्याने तिच्याकडे पाहत होता.
“आणि जेव्हा मला सत्य कळलं…” पाखीचा आवाज भर्रावला.
“तेव्हा माझं मनच गोंधळून गेलं.
मी तुझ्यावर प्रेम करायला लागले होते, हे मान्य करायला मला वेळ लागला.”
“तेव्हा माझं मनच गोंधळून गेलं.
मी तुझ्यावर प्रेम करायला लागले होते, हे मान्य करायला मला वेळ लागला.”
तिने डोळे पुसले आणि पुढे म्हणाली
“आजोबा, वकील, कागद… सगळं कळल्यानंतरही माझ्या मनात एकच प्रश्न होता तू मला खरंच स्वीकारशील का?
माझ्या मनाचं, माझ्या भीतीचं, माझ्या प्रेमाचं उत्तर देशील का?”
माझ्या मनाचं, माझ्या भीतीचं, माझ्या प्रेमाचं उत्तर देशील का?”
ती राजच्या थोडी जवळ आली.
“पण आज…
तू जे बोललास, ज्या पद्धतीने माझ्या समोर उभा राहिलास…
मला समजलं, की माझं मन चुकीच्या ठिकाणी अडकलं नव्हतं.”
तू जे बोललास, ज्या पद्धतीने माझ्या समोर उभा राहिलास…
मला समजलं, की माझं मन चुकीच्या ठिकाणी अडकलं नव्हतं.”
पाखीने हळूच राजचा हात धरला.
“राज…
मीही तुझ्यावर प्रेम करते. भिती असूनही, गोंधळ असूनही
माझं मन तुझंच नाव घेतं.”
मीही तुझ्यावर प्रेम करते. भिती असूनही, गोंधळ असूनही
माझं मन तुझंच नाव घेतं.”
कॉफी शॉपमधील सगळा आवाज जणू दूर गेला.
त्या क्षणी फक्त दोन मनं होती… जी अखेर एकमेकांसमोर उघडी झाली होती
त्या क्षणी फक्त दोन मनं होती… जी अखेर एकमेकांसमोर उघडी झाली होती
राज क्षणभर गप्प राहिला.
डोळ्यांत अपराधीपणा स्पष्ट दिसत होता.
तो पाखीसमोर थोडा झुकला आणि शांतपणे म्हणाला
“पाखी… सगळ्यात आधी मला तुझी माफी मागायची आहे.”
पाखी त्याच्याकडे पाहत राहिली.
“मीच तुझा नवरा आहे…
आपलं लग्न आधीच झालेलं होतं,” राज म्हणाला.
“तेव्हा परिस्थिती अशी होती की ना तू मला ओळखत होतीस, ना मी तुला नीट ओळखत होतो.
मी तेव्हा तुला सत्य सांगायला उशीर केला… हीच माझी सगळ्यात मोठी चूक.”
आपलं लग्न आधीच झालेलं होतं,” राज म्हणाला.
“तेव्हा परिस्थिती अशी होती की ना तू मला ओळखत होतीस, ना मी तुला नीट ओळखत होतो.
मी तेव्हा तुला सत्य सांगायला उशीर केला… हीच माझी सगळ्यात मोठी चूक.”
तो थोडा थांबला. खिशातून कागद काढले.
“मी वकिलाला भेटलो. आपल्या लग्नाचे सगळे कागद घेऊन आलो,”
राज म्हणाला.
“हे काही लपवण्यासाठी नाही…
तर तुला सत्य समजावं, म्हणून.”
राज म्हणाला.
“हे काही लपवण्यासाठी नाही…
तर तुला सत्य समजावं, म्हणून.”
पाखीच्या डोळ्यांत अश्रू आले.
“मला माहिती आहे, हे सगळं ऐकून तुला धक्का बसला असेल.
तुझ्या मनात भीती, गोंधळ, राग… सगळं असणार,” राज म्हणाला.
तुझ्या मनात भीती, गोंधळ, राग… सगळं असणार,” राज म्हणाला.
तो हळूच पुढे म्हणाला
“पण पाखी,
मी आज तुला हे सगळं सांगतोय कारण
मला तुझ्याशी खोटं नातं नकोय.
मला तुझ्या परवानगीने, तुझ्या विश्वासाने, तुझ्या प्रेमाने तुझा नवरा व्हायचं आहे…
फक्त कागदावर नाही, तर मनापासून.”
मी आज तुला हे सगळं सांगतोय कारण
मला तुझ्याशी खोटं नातं नकोय.
मला तुझ्या परवानगीने, तुझ्या विश्वासाने, तुझ्या प्रेमाने तुझा नवरा व्हायचं आहे…
फक्त कागदावर नाही, तर मनापासून.”
तो तिच्याकडे पाहून म्हणाला
“माफी मागतो…
आणि एक संधी मागतो. तू हो म्हणशील, तेव्हाच मी खरंच तुझा नवरा होईन.”
आणि एक संधी मागतो. तू हो म्हणशील, तेव्हाच मी खरंच तुझा नवरा होईन.”
पाखी न बोलता ऐकत होती…
पण तिच्या डोळ्यांत आता राग नव्हता फक्त ओलसर प्रेम होतं
पण तिच्या डोळ्यांत आता राग नव्हता फक्त ओलसर प्रेम होतं
पाखी हळूच पुढे आली.
तिने राजकडे पाहिलं… त्या नजरेत राग नव्हता, प्रश्न नव्हते
फक्त समजूत होती.
तिने राजकडे पाहिलं… त्या नजरेत राग नव्हता, प्रश्न नव्हते
फक्त समजूत होती.
“राज…” ती शांतपणे म्हणाली,
“चूक झाली आहे… पण तू ती मान्य केलीस.
माफी मागायला पुढे आलास… म्हणून मी तुला माफ करते.”
“चूक झाली आहे… पण तू ती मान्य केलीस.
माफी मागायला पुढे आलास… म्हणून मी तुला माफ करते.”
राजच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक आली.
“मला तुझ्यावर राग धरून राहता येत नाही,” पाखी पुढे म्हणाली,
“कारण कळत-नकळत… मी पण तुला मनापासून स्वीकारायला लागले होते.”
“कारण कळत-नकळत… मी पण तुला मनापासून स्वीकारायला लागले होते.”
ती थोडी थांबली आणि मग ठामपणे म्हणाली
“आता आपण लपवून काही करायचं नाही.
आजोबांना सगळं सांगू. सत्य जसं आहे तसंच.”
आजोबांना सगळं सांगू. सत्य जसं आहे तसंच.”
राज हसला मनापासून, हलकं वाटल्यासारखं.
“हो पाखी,” तो म्हणाला,
“आजोबा आपल्याला समजून घेतील.
आणि यावेळी…
आपलं नातं सगळ्यांसमोर, सन्मानाने सुरू करूया.”
“आजोबा आपल्याला समजून घेतील.
आणि यावेळी…
आपलं नातं सगळ्यांसमोर, सन्मानाने सुरू करूया.”
दोघे एकमेकांकडे पाहून हलकेच हसले.
कॉफी थंड झाली होती…
पण त्यांच्या आयुष्यातला नवीन अध्याय मात्र गरमागरम सुरू झाला होता
कॉफी थंड झाली होती…
पण त्यांच्या आयुष्यातला नवीन अध्याय मात्र गरमागरम सुरू झाला होता
क्रमश
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
दिपाली चौधरी
तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी कमेंट करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा