दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर- जानेवारी 2025-26
अजब गजब लग्न - भाग 50
अजब गजब लग्न - भाग 50
राजने थोडा श्वास घेतला… आणि आजोबांना कॉल केला.
आवाज थोडा थरथरत होता, पण शब्द ठाम होते.
आवाज थोडा थरथरत होता, पण शब्द ठाम होते.
“आजोबा… सगळं सांगायचं होतं मला. पाखी… तीच आहे.
ती माझी बायको आहे… आणि आता आम्ही दोघं एकत्र निर्णय घेतलाय.”
ती माझी बायको आहे… आणि आता आम्ही दोघं एकत्र निर्णय घेतलाय.”
फोनपलीकडे क्षणभर शांतता होती…
आणि मग आजोबांचा शांत, विश्वासू आवाज आला
आणि मग आजोबांचा शांत, विश्वासू आवाज आला
“बरं केलंस राज. आता थेट पाखीच्या आजोबांकडे जा.
आम्हीही येतो.”
आम्हीही येतो.”
तेवढ्यात दुसऱ्या बाजूनेच आजोबांचा आवाज पुन्हा आला
“राज…
मी सध्या हॉस्पिटलमध्येच आहे. तुम्ही दोघं इथेच या.
आम्हाला तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची आहे.”
मी सध्या हॉस्पिटलमध्येच आहे. तुम्ही दोघं इथेच या.
आम्हाला तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची आहे.”
राजच्या चेहऱ्यावर हसू फुललं. त्याने पाखीकडे पाहिलं.
“ठीक आहे आजोबा… आम्ही लगेच येतो,” राज म्हणाला.
फोन ठेवताच पाखीने हळूच विचारलं, “काय झालं?”
राज हसत म्हणाला,
“आपल्या आयुष्याचा पुढचा अध्याय… आज हॉस्पिटलमध्येच सुरू होणार आहे.”
“आपल्या आयुष्याचा पुढचा अध्याय… आज हॉस्पिटलमध्येच सुरू होणार आहे.”
दोघांनी एकमेकांकडे पाहिलं.
मनात भीती होती… पण त्याहून जास्त विश्वास आणि आशा होती
मनात भीती होती… पण त्याहून जास्त विश्वास आणि आशा होती
....
राज आणि पाखी हॉस्पिटलमध्ये पोहोचले.
हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये नेहमीसारखीच धावपळ होती…
पण दोघांच्या मनात मात्र वेगळीच घालमेल सुरू होती.
राजने नकळत पाखीचा हात पकडला.
पाखीने काही बोलली नाही… फक्त त्याच्याकडे पाहिलं. त्या नजरेत भीतीही होती आणि विश्वासही होता..
पण दोघांच्या मनात मात्र वेगळीच घालमेल सुरू होती.
राजने नकळत पाखीचा हात पकडला.
पाखीने काही बोलली नाही… फक्त त्याच्याकडे पाहिलं. त्या नजरेत भीतीही होती आणि विश्वासही होता..
दोघे आजोबांच्या रूमकडे गेले.
दार उघडताच आजोबांनी दोघांकडे पाहिलं.
त्यांच्या चेहऱ्यावर थकवा होता… पण त्याहून जास्त समाधान.
दार उघडताच आजोबांनी दोघांकडे पाहिलं.
त्यांच्या चेहऱ्यावर थकवा होता… पण त्याहून जास्त समाधान.
“आलात?” आजोबा हसत म्हणाले. “तुमचीच वाट पाहत होतो.”
राज पुढे गेला. “आजोबा… तुम्ही बरे आहात ना?”
“आता खूप बरे आहे,” आजोबा म्हणाले,
“कारण आज मला खात्री झाली… की पाखी सुरक्षित हातात आहे.”
“कारण आज मला खात्री झाली… की पाखी सुरक्षित हातात आहे.”
पाखीचे डोळे पाणावले. ती आजोबांच्या जवळ बसली.
आजोबा पुढे म्हणाले,
“आज तुमच्यासाठीच आम्ही दोघांनी तुम्हाला बोलावलं आहे.
आज काहीतरी सांगायचं आहे… जे ऐकल्यावर तुमच्या मनातली सगळी भीती निघून जाईल.”
“आज तुमच्यासाठीच आम्ही दोघांनी तुम्हाला बोलावलं आहे.
आज काहीतरी सांगायचं आहे… जे ऐकल्यावर तुमच्या मनातली सगळी भीती निघून जाईल.”
राज आणि पाखी एकमेकांकडे पाहू लागले…
मनात एकच प्रश्न
आनंदाची बातमी नेमकी काय असणार?
मनात एकच प्रश्न
आनंदाची बातमी नेमकी काय असणार?
राजच्या आजोबांनी हळूच पण ठाम आवाजात सांगितलं
“राज… आम्ही तुझं आणि पाखीचं पुन्हा लग्न लावून द्यायचा निर्णय घेतला आहे.
यावेळी कोर्टात नाही… तर सगळ्या रितीरिवाजांनी, नातलगांसमोर, आनंदात.”
यावेळी कोर्टात नाही… तर सगळ्या रितीरिवाजांनी, नातलगांसमोर, आनंदात.”
हे ऐकताच राज क्षणभर स्तब्ध झाला. त्याच्या डोळ्यांत आनंद चमकला.
तो लगेच पाखीकडे पाहू लागला. पाखीला काय बोलावं तेच सुचेना… हृदय जोरजोरात धडधडू लागलं.
“आजोबा…” राज म्हणाला, आवाज थरथरत,
“हे खरंच…? मला असं वाटत होतं पण…”
“हे खरंच…? मला असं वाटत होतं पण…”
आजोबा हसले.
“हो रे. कारण नात्याची सुरुवात चुकली असली, तरी त्याचा शेवट सुंदर व्हायलाच हवा.”
“हो रे. कारण नात्याची सुरुवात चुकली असली, तरी त्याचा शेवट सुंदर व्हायलाच हवा.”
पाखी शांतपणे उभी होती.
डोळ्यांत पाणी होतं, पण ते दु:खाचं नव्हतं… ते दिलास्याचं होतं.
डोळ्यांत पाणी होतं, पण ते दु:खाचं नव्हतं… ते दिलास्याचं होतं.
पाखी आजोबांकडे पाहून म्हणाली,
“माझी हरकत नाही… मला फक्त एवढंच हवं होतं की हे नातं स्वीकारलं जावं.”
“माझी हरकत नाही… मला फक्त एवढंच हवं होतं की हे नातं स्वीकारलं जावं.”
पाखीचे आजोबा हलकेच मान हलवतात.
“आम्हालाही हेच हवं होतं. आता माझं मन शांत आहे.”
“आम्हालाही हेच हवं होतं. आता माझं मन शांत आहे.”
राजने नकळत पाखीचा हात घट्ट पकडला. त्या स्पर्शात एक नवं वचन होतं आता सगळं नीट होईल.
हॉस्पिटलच्या त्या खोलीत, औषधांच्या वासातसुद्धा
आज पहिल्यांदा लग्नाचा सुगंध पसरला होता…
आज पहिल्यांदा लग्नाचा सुगंध पसरला होता…
सगळं बोलून झाल्यावर वातावरण हलकं झालं होतं.
आजोबा हसत होते, राजच्या चेहऱ्यावर समाधान होतं,
आणि पाखी… आज खूपच शांत वाटत होती.
आजोबा हसत होते, राजच्या चेहऱ्यावर समाधान होतं,
आणि पाखी… आज खूपच शांत वाटत होती.
राजचे आजोबा म्हणाले,
“बरं, आता उशीर झाला आहे. आपण घरी निघूया.”
“बरं, आता उशीर झाला आहे. आपण घरी निघूया.”
राज उठला.
जाण्याआधी त्याने पाखीकडे पाहिलं. त्या नजरेत घाई नव्हती…
फक्त एक समजूत होती.
जाण्याआधी त्याने पाखीकडे पाहिलं. त्या नजरेत घाई नव्हती…
फक्त एक समजूत होती.
“मी उद्या भेटतो,” तो हळूच म्हणाला.
पाखीने मान हलवली.
“हो…”
“हो…”
राज आणि त्याचे आजोबा घरी निघून गेले.
पाखी मात्र आजोबांच्या बेडजवळ बसून राहिली.
आजोबांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला.
आजोबांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला.
“आज खूप काही घडलं ना बाळा?” आजोबा म्हणाले.
पाखी हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली,
“हो आजोबा… पण आज पहिल्यांदा मन घाबरलेलं नाही.”
“हो आजोबा… पण आज पहिल्यांदा मन घाबरलेलं नाही.”
“तेच महत्त्वाचं,” आजोबा म्हणाले. “नातं जेव्हा मनातून स्वीकारलं जातं, तेव्हाच त्याला खरं आयुष्य मिळतं.”
पाखी खिडकीबाहेर पाहू लागली. रात्रीचं आकाश शांत होतं…
आणि तिचं मनसुद्धा.
आणि तिचं मनसुद्धा.
आज ती आजोबांजवळच थांबणार होती. कारण आज तिला पुन्हा एकदा आनंद सापडला होतं.
क्रमश
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
दिपाली चौधरी
तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी कमेंट करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा