Login

आजी : कुटुंबाच आगळं( अंतिम भाग)

आजीची जादू
आजी : कुटुंबाचं आगळ

भाग ४

मागील भागात आपण पहिले कि , शरयू सगळ्यांच्या बोलण्याचा विचार करत होती. तेवढ्यात अमोद ऑफिस मधून आलेला असतो. तिला विचार करताना बघून तो आधी सगळं आवरून नंतर दोघांसाठी नाष्ट्या ला घेऊन आला .

अमोद ने शरयू ला हाक मारली , " काय ग कसला विचार करतीय ? "

" अहो , आज आईंनी आणि पोरांनी मला यातून बाहेर येणे किती महत्वाचे आहे हे सांगितलं . तुम्हाला माहितीय आज दोन्ही पोरं इतकी मोठी झाल्यासारखी वागत बोलत होती. त्यांनी इतके छान मला समजावले की खरंच त्यानां आपली गरज आहे आणि त्यांच्या साठी सकारत्मक विचार करून बरी होण्यासाठी आईंनी सांगितले तसे मी नक्की वागणार असं ठरवलयं. तर तुम्ही मला साथ द्याल ना. "

" मी तुला आधी पण सांगितले आहे आता पण सांगतो मी कायम तुझ्या बरोबर आहे . मी तुला सगळी मदत करणार , फक्त हा शारीरिक त्रास नाही वाटून घेउ शकत . " असं म्हणून त्याने तिला आपल्या मिठीत घेतले .

थोड्यावेळानी तिला आराम करायला सांगून तो बाहेर निघून आला . तिच्यात झालेल्या थोड्याफार फरकाने त्याला खूप आनंद झाला म्हणून त्याने बाहेर आल्याआल्या आई जी स्वयंपाक करत होती तिला मागूनच मिठी मारली . आई खरच तुझ्यामुळे हे सगळे शक्य झाले.

रात्री सगळ्यांनी आनंदात चार घास जास्तीत च खाल्ले . जेवण करून सकाळी मीरा बरोबर फिरायला जायचे ठरवून शरयू झोपायला गेली. आजी आणि मुलांनी पण सगळं आवरून झोपले .

दुसऱ्या दिवशी पासून ठरल्या प्रमाणे शरयू सगळं करू लागली . मुलांबरोबर सकाळी फिरायला लागल्यामुळे त्यांच्यात होणाऱ्या चर्चा , सकाळचं प्रसन्न वातावरण यामुळे तिच्यात थोडाफार बद्दल व्हायला सुरुवात झाली . दुपारी पुस्तक वाचून झाल्यावर तिने आईनं बरोबर बऱ्याच विषयांवर गप्पा मारायला सुरुवात केली . या गप्पांमध्ये आजी तिच्या सभोवतील असलेल्याच महिलांच्या गोष्टी सांगत ज्या संकटांना तोंड देत आपलं पुढील आयुष्य आनंदाने जगत होत्या . यामुळे तिच्यात अजून आत्मविश्वास वाढू लागला.

असेच दिवसामागून दिवस जात होते. या दिवसांमध्ये शरयू मध्ये पण थोडाफार फरक जाणवत होता. साधारण दोन महिन्यांनी शरयू आणि अमोद दोघंही डॉक्टरांकडे जाऊन आले. सगळे रिपोर्ट पण नाँर्मल आले. डॉक्टरांनी काही दिवस काही पथ्य आणि औषध सांगितली आणि परत सहा महिन्यांनी दाखवायला बोलावले.

घरी आल्यावर दोघांनी हे सासूबाईंना सांगितले. सासूबाई म्हणाल्या ," आपण जे ठरवल्या ते तसेच चालू ठेवायचे आहे. त्यात कोणताही बद्दल होणार नाही . "

" हो आई .तसेच चालू ठेऊ, तुमची या दिवसात खूप धावपळ झाली तर आता मी थोडा फार स्वयंपाकात मदत करत जाईन फक्त . चालेल ना ?"

" हो चालेल पण ठरवलेल्या गोष्टी सगळ्या झाल्यावर तुला करायची इच्छा राहिलाय तर नक्की कर . जा आता थोडावेळ आराम करा. मी पण माझ्या भजनाच्या क्लासला जाऊन येते. "
हळू हळू सगळं रोजच्या प्रमाणे व्हायला सुरवात झाली म्हणजेच आजी घर सांभाळून तिच्या मैत्रीणींबरोबर गप्पा मारणं , भजन, ट्रिप सगळं करू लागली. दोन्हीपोरं पण आई कडे लक्ष देत त्यांचा अभ्यास करू लागले . अमोद पण ऑफिसाला जायला लागला . सगळ्यात महत्वाचे म्हणजे शरयू ने स्वतः मध्ये खुप बद्दल करून घेतला. आजीने सांगितल्या प्रमाणे रोजचं सगळं करून आजीला पण स्वयंपाकात मदत करू लागली . मैत्रिणीबरोबर कधी कधी फिरायला जाणे , चित्रपट पाहणे चालू होते . एकंदरीत सगळं वातावरण छान झालं होतं .

आज बरोबर वर्षांनी शरयू आणि अमोद डॉक्टर कडे गेले होते. त्यांनी सगळं चेक केलं . डॉक्टर म्हणाले , " सगळं आता व्यवस्थित आहे. फक्त काही औषध रोज घ्यावी लागतील आणि दर सहा महिन्यांनी पूर्ण शरीराची तपासणी करायची . "

दोघेही हो म्हणून घरी आले. घरी आले तर आज सगळे आईचीच वाट बघत होते. आईने येताना मुलांच्या आवडीची पिस्ता बर्फी आणली. आल्या आल्या हातपाय धुऊन देवा समोर दिवा लावून नमस्कार केला. बर्फीचा नेवैद्य दाखवला आणि मग सगळयांना वाटली.

आई आजीच्या पाया पडली अन् म्हणाली , " आई मी जे आज बरी झालीय याचे सगळे श्रेय फक्त तुमचे आहे . तुमच्या मुळे मी खरच यातून उभी राहिले. या साठी मी तुमची कायम ऋणी राहीन . "

" अगं वेडाबाई , मी काय तुझ्यावर उपकार केलेत का ? आणि मुळात आई मुलांवर उपकार कधी करतच नाही . त्यामुळे असे काही म्हणू नको. माझी पोरं आनंदी म्हणजे मी पण आनंदी . "

मीरा म्हणाली , " आजी तूला माहितीय आम्हाला ना मराठीत एक धडा होता . ' आजी : कुटुंबाचं आगळं ' त्याच प्रमाणे तू खरंच आपल्या कुटुंबाला सावरायला मदत केली . तुझ्यामुळे आम्ही लहान वयात हि मोठी जबाबदारी सांभाळू शकलो. तू खरंच आपल्या कुटुंबाचं आगळं आहे . असे म्हणून सगळयांनी तीला एकत्र मिठी मारली .

अश्या तऱ्हेने एका संकटातून शरयू चे कुटुंब एका आजी मुळे सावरू शकली. खरोखरच प्रत्येक कुटुंबात अशी आजी असावी जी कायम येणाऱ्या संकंटांना तोंड देताना आपल्या पाठीशी उभी राहील. हि सदिच्छा .

©® सौ . चित्रा अ . महाराव

🎭 Series Post

View all