Login

आजीच माझा बाप्पा

एक आजी नातवासाठी काय करते.
आजीच माझा बाप्पा !

गोखले आजी आपल्या नातवाला पुण्याला गणपती बघण्यासाठी घेऊनी आल्या . ७५ वर्षाची म्हातारी पण नातवाच्या आनंदा साठी सगळं करत होती.

दोन दिवस झाले अन् आजीच्या जवळचे पैसे संपले म्हणून आजीने मिरवणुकीत छोट्या छोट्या गोष्टी विकूया असं ठरवून तिने तिथल्याच बाजारातून आणल्या . ती आणि नातू एका ठिकाणी जागा बघून विकायला बसले होते. ते विकताना आजीने त्याला हिशोब करायला शिकवले. दोघांनी त्या गोष्टी विकून आजीने नातवाचे हट्ट पुरवले. ते विकत असताना नातवाला तीने व्यवहार शिकवला.

नातू आजीच्या शेजारीच खेळत असताना काही मुलांनी नातवाला त्रास दिला. आधी आजीने सौम्य शब्दात समजावलं. मुलही जरा लांब निघून गेली. पण काही वेळ गेलाच असेल की ती मुलं पुन्हा आली. आधी त्याला मुलांनी खेळायला घेतले पण थोड्यावेळात नातवाला परत त्रास द्यायला लागले म्हणून आजीने तिच्या हातातील काठीने त्या मुलांना चांगला चोप दिला. हा चोप मिळाल्यावर सगळी मुलं पळून गेली आणि आजी एका मंडाळाच्या गणपती विर्सजन झाला म्हणून तोंड झाकून ठेवलेला त्या गणपती समोरचं बसली.

आजीला असं गणपती समोर बसलेला बघून नातवाने आजीला हात जोडून म्हणाला," तूचं माझा गणपती बाप्पा.
आता मी कधीच हट्ट नाही करणार. . मी या बाप्पाचे सगळं ऐकणार. "

आजी त्याला मिठी मारून रडू लागली. आता मी ही या बाळाला खूप मोठं करणार.

यावर दोघांनी मागे असलेल्या गणपतीला नमस्कार केला अन् आपल्या गावाकडे जायला निघाले.

©®सौ. चित्रा अ. महाराव