साकेतला लगेचच झोप लागली. पण राघवची मात्र झोप पुर्णपणे उडाली होती. आता त्याने स्वतः च बाहेर जाऊन शोध घ्यायचे ठरवले. पण जायचे कुठे? आपण जंगलाचा रस्ता विचारून घेऊ. परंतु एकट्याने जायची हिंमत होत नव्हती. पण आपल्या सोबत जे काही घडलं आहे. त्याचा शोध घेण्याचा निर्णय घेतला. त्याने कोणालाच काही सांगितले नाही. तो फक्त उजाडायची वाट बघत होता. तो पटकन फ्रेश झाला आणि गुपचुप बाहेर पडला. तो पर्यंत साडेसहा वाजले होते.
त्याने खाली रिसेप्शनवर काही माहिती विचारली.
"हे बघा तुम्ही तिकडे जाऊ नका. तुम्ही या ठिकाणी नवीन आहात. तेव्हा ऐका आमचे."
ते ऐकायला राघव होताच कुठे. तो हाॅटेलमधून बाहेर पडला. थोडे थंडीचे दिवस असल्याने काही लोक शेकोटी करून बसले होते. त्याने एका ठिकाणी मस्त गरमागरम चहा घेतला आणि त्या लोकांना पत्ता विचारला.
"अहो, दादा. जंगलाकडे जाणारा रस्ता कुठे आहे. "
"ओ साहेब, तुम्ही या गावात नवीन आहात. उगाच नसत्या भानगडीत पडू नका. परत जावा."
"ठीक आहे नका सांगू मीच शोधणार."
शंभर पावल चालत जाताच. अचानक....
"मी सांगू का साहेब." एक छोटासा मुलगा त्याच्या जवळ आला.
"मी सांगू का साहेब." एक छोटासा मुलगा त्याच्या जवळ आला.
"तू सांगणार."
"साहेब कसं आहे. आम्ही खूप गरीब आहे हो. जर तुम्ही मला मदत केली तर मी पण तुम्हाला मदत करेन. पण एक गोष्ट सांगतो
तुम्ही तिकडे जाऊ नये ही माझी पण इच्छा आहे. म्हणून मी सांगतो. पण तुम्हाला जंगलात का जायचे?"
तुम्ही तिकडे जाऊ नये ही माझी पण इच्छा आहे. म्हणून मी सांगतो. पण तुम्हाला जंगलात का जायचे?"
"एक काम आहे?"
"बर ठीक आहे. पण काळजी घ्या."
राघवने लगेच शंभरची नोट त्यांच्या समोर धरली.
तो मुलगा पुढे निघाला आणि त्याने राघवला मागे येण्याचा इशारा केला. राघव त्याच्या मागे मागे जाऊ लागला. राघव त्या मुलाशी गप्पा मारत होता. त्यामुळे एकमेकांशी ओळख झाली. त्या मुलाचे नाव माहित झाले. अंदाजे दोन किलोमीटर अंतर पार केले. तो खूप छान मराठी बोलत होता.
गावातील वस्ती संपली होती. कुठे शेती आहे? कुठे समुद्र आहे आणि कुठे जंगल ही सर्व माहिती त्याने सांगितली.
रामू अचानक थांबला.
"काय झाले?"
"हे बघा साहेब. हे देवी आईच देऊळ आहे. इथे गावाची हद्द संपली. हा पुढे जाणारा रस्ता दिसतो ना तो जंगलात जाणारा आहे. यापुढे मी तुमच्या सोबत येऊ शकणार नाही. कारण तिकडे जायची सगळ्यांना भिती वाटते. त्यामुळे तुम्हाला एकट्याला जावे लागणार."
समोर दिसणारा रस्ता अतिशय भयानक वाटत होता. आतापर्यंत आनंदाने गप्पा मारणारा राघव शांत झाला.
"साहेब, गरज नसेल तर नका जाऊ तिकडे."
"अरे, रामू तू काळजी करू नकोस. मी येतो संध्याकाळ पर्यंत. तू मला परत इथेच भेट."
"काळजी घ्या." असे म्हणत रामू परत जायला निघाला."
राघवने त्याला बाय बाय केले आणि पुढे निघाला.
जवळपास आठ वाजता साकेत उठला. तर राघव जवळ नव्हता. त्याला परत टेन्शन आले. त्याने त्याच्या मित्रांना फोन केले.
"अरे यार, या राघवला काय झाले? कसा वेड्यासारखा वागतोय हा? आता कुठे गेला असेल? त्याला कुठे शोधायचे ?" निखील
"काय रे साकेत. राघव कधी गेला तुला कळले सुद्धा नाही का?"
"नाही ना. मला तर गाढ झोप लागली होती. थांबा, आपण आधी फोन करून बघुया. नाही तर खाली जाऊन रिसेप्शन आणि वाॅचमनला विचारू." साकेत
राघव फोन उचलत नव्हता. त्यामुळे सगळेजण खाली धावतपळत गेले. पण तो कुठेच नव्हता. त्याने खाली चौकशी केली. तर तो जंगलाच्या दिशेने गेल्याचे कळले.
"चला आपण लगेच निघु या." साकेत
"अरे, साकेत थांब थोड. जरा फ्रेश तर होऊ या. मग सोबतच जाऊ या. कारण त्याला जाऊन दीड तास झाला आहे. आपण जरा तयारीने जाऊ या." राज
"हो, यार मला पण तसेच वाटते." निखील
"ठीक आहे."
सगळे परत रूम वर आले. पटापट आवरून थोडासा नाश्ता करून आणि काही खायचे पदार्थ सोबत घेऊन ते निघाले. काही लोकांना त्यांनी जंगलाकडे जाणार रस्ता विचारला.पण गावकऱ्यांनी त्यांना वेड्यात काढले. आम्ही इतकी वर्षे झाली. तरी आम्ही एकट्याने कधीच जात नाही. असेही सांगितले. तरी सुध्दा हे चौघेही निघालेच. गावाची हद्द संपली होती.
" एक मिनिट... " विजय
"आता काय झाले? निखील
"मला काय वाटतं सगळेच जायचे का? समजा राघव आलाच तर इथे कोणी नको का? शिवाय तुम्हाला कोणती मदत लागली तर इथे एक जण तरी हवेच. कारण आपल्याला कोणी ओळखत सुध्दा नाही." विजय
"ठीक आहे. तू थांब इथेच. ए निखील तू पण थांबतोस का? मी आणि राज जाऊन बघतो. काही वाटल तर आम्ही फोन करतो." साकेत
"साकेत, राज काळजी घ्या. काहीही संशयास्पद वाटल्यास फोन करा. पावले जपून टाका. कारण प्राण्यांना पकडण्यासाठी सापळे वगेरे लावलेले असू शकतात.
"हो आम्ही काळजी घेऊ. तुम्ही पण अलर्ट रहा."
विजय आणि निखील हाॅटेलमध्येच थांबले आणि साकेत आणि राज जंगलात जायला निघाले.
पाहुया पुढे राघव सोबत काय घडते.
©® आश्विनी मिश्रीकोटकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा