एक रात्र मंतरलेली ७
"ए, मुलांनो तुम्ही इथेच थांबा. आमच्या मागे येऊ नका. तुमचा जीव धोक्यात घालून घेऊ नका. आम्ही आहोत आता."
"पण राघव." साकेत
"तुम्ही काळजी करू नका. आम्ही बघतो."
"पण, राघव.... त्याच्या मानेवर तलवार धरून ठेवली आहे त्यांनी."
"त्याची काळजी नका करू. आता आम्हांला जाऊ द्या . वेळ फार कमी आहे."
पोलिसांनी त्यांना सोबत येऊ दिले नाही.
पाहुया पुढे.....
पोलिसांनी अगदी सावधपणे जाऊन त्यांना चारी बाजूंनी घेरले.
"हॅनडसअप, "
अचानक पोलिसांना बघून सगळेजण घाबरले. मुख्य जो आदिवासी होता. त्याच्या हातातील तलवार गळून पडली. सगळेजण सैरावैरा पळायला लागले. पण पोलिसांनी चारी बाजूंनी घेरल्याने कोणीच पळू शकले नाही. पोलिसांनी सगळ्यांना अटक केली.
राघवला त्यांच्या ताब्यातून सोडवले. निखील, साकेत, विजय आणि राज चौघेही पळत पळत राघवजवळ आले. एकमेकांना गच्च आलिंगन दिले.
"राघव कसा आहे? असा न सांगता कशाला गेलास? आज तुला काही झाले असते तर.... आम्ही काका काकूंना काय उत्तर दिले असते?" साकेत
"अरे, मी ठीक आहे. काहीच झाले नाही बघ मरा."
पोलिसांनी आत गुहेत प्रवेश केला. तेथील भयानक दृश्य पाहून किळस आली. सगळीकडे रक्ताचा अक्षरशः सडा पडला होता. हाडा मांसाचा ढीग पडला होता. एका ठिकाणी एक देवीची मुर्ती होती. तिला कवट्यांची माळ घातली होती. शिवाय काही लोकांचे अंतर्गत अवयव काढायचे काही साहित्य आणि त्याची अवैधपणे त्यांची विक्री करून पैसा कमविण्यासाठी काही बाहेरील देशातील लोकांचे पासपोर्ट, व्हिजा, लाखोंची रक्कम, दागदागिने, कपडे असे बरेचसे साहित्य पोलिसांनी हस्तगत केले."
"ए मुलांनो, चला आम्ही सोडतो तुम्हाला. बाकी इथली कारवाई सुरूच राहील. तो तपास आम्ही करूच. जरा बरीच मोठी गॅग आहे असे वाटते. तो शोध आम्ही लावतोच. हो पण एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही परत इकडे येऊ नका."
सगळेजण परत निघाले. पोलिसांनी त्यांना हाॅटेलवर सोडले. सगळे फार थकले होते. त्यामुळे आधी जेवण करू मग थोडावेळ आराम करू. असा प्लॅन ठरला. पण राघवचे मन मात्र अजुनही थाऱ्यावर नव्हते. त्याच्या मनात एकच विचार येत होता. आपण जे काही अनुभवल ते प्रत्यक्षात कस असु शकते. मी तर झोपलो होतो आणि सकाळी प्रत्यक्षात परत तेच.... छे! काहीच संदर्भ लागत नव्हता.
"राघव कस वाटतंय ? आता कोणतेही विचार डोक्यात आणू नकोस. तुला विश्रांतीची फार गरज आहे. तू जेवण सुध्दा नीट केले नाही. आता आराम कर." साकेत
"आपण रात्री निवांत बसून बोलूया." राज
"हो... चालेल." राघव
पण राघव मात्र विचलित झाला होता. कारण त्याच्या आयुष्यात एका रात्रीत जे काही घडले होते. ते न विसरण्यासारखेच घडले होते. त्याला अजुनही काही प्रश्न सतावत होते. ती मुलगी कोण? ती मलाच का दिसत होती? तिथे माझा बळी का दिला जात होता? कोण होती ती लोक? आपण आत्ताच्या आत्ता पोलिस स्टेशनला गेले पाहिजे. पोलिसांना भेटूनच कळेल नक्की काय प्रकरण आहे ते?"
तो रूमचे दार उघडतो. तेवढ्यात साकेत त्याला आवाज देतो.
"आता परत कुठे निघाला ? आता एकट्याने कुठेही जायचे नाही."
"आता परत कुठे निघाला ? आता एकट्याने कुठेही जायचे नाही."
"नाही मी ते ... थोड फिरून येतो."
"थांब राघव आम्ही पण येतो तुझ्या सोबत."
"नको. मी फक्त एक चक्कर मारायला जात होतो."
"नाही. तू थांब. मी सगळ्यांना बोलावतो. मग सगळेच जाऊया चक्कर मारायला."
"अरे, नको. तुम्ही सगळे आराम करा."
"राघव आधीच तुझी तब्येत बरी नाही. त्यात तू एकटा कुठे गेलास तर आम्ही तुला कसे आणि कुठे शोधायचे ?"
"ठीक आहे साकेत मी नाही जात."
"राघव थांबला. पण त्याचे मन मात्र बाहेर भरकटू लागले. त्याच्या मनावर झोपेची गुंगी आली.
संध्याकाळचे चार वाजत आले. तो पर्यंत साकेत उठला होता. राघव अजुनही झोपेतच होता.
"राघव , उठ चल फिरायला जाऊन येऊ. तुझ्या मनावरचा ताण हलका होईल.
दहा पंधरा मिनिटांतच तयार होऊन सगळेजण फिरायला निघाले. जसजसे ते समुद्राच्या जवळ येत होते. तसतसं त्यांच मन उल्हासित झाले होते. आजुबाजुला असलेली नारळाची झाडे, बारीक वाळू, पाण्याच्या लाटेत वाहून आलेले शंख शिंपलेसमुद्राच्या निळ्या क्षार पाण्यात लाटांचा गाज ऐकत खळाळून वाहणाऱ्या लाटा बघून सगळे समुद्रात मनसोक्तपणे खेळू लागले.
काही वेळानंतर राघवला ती मुलगी परत दिसली.
"ए कोण आहेस तू? माझ्या मागे का लागली."
"राघव कोणासोबत बोलतोय तू ? साकेत
"नाही, कोणासोबतच नाही. "
असे म्हणत राघव इकडेतिकडे बघू लागतो. क्षणात ती मुलगी गायब होते आणि अचानक ती समोर येते. पण मग... ती कोण असेल? राघवला काहीच सुचत नाही. तो पाण्यातून बाहेर येतो आणि दूर जाऊन बसतो. तर लाल ड्रेस मधील ती मुलगी परत त्याच्या समोर येते आणि त्याला मागे येण्याचा इशारा करते. हळुहळु हळूहळू राघव तिच्या मागे जाऊ लागतो.
पाहुया पुढच्या भागात... राघव कुठे जातो .