रात्रीचे दहा वाजत आले होते. पोर्णिमेची रात्र होती. टिपूर चांदणे पांघरलेले आकाश खूप सुंदर भासत होते. भरधाव वेगाने त्यांची गाडी धावत होती. आजुबाजुच्या दाट झाडीतून पानांची सळसळ जाणवत होती. चंद्राच्या त्या लख्ख प्रकाशाने सामसूम रस्ता सुध्दा एका उजळून निघाला होता. अगदी दहा पंधरा मिनिटांतच ते पोहोचणारच होते. सगळे जण अगदी थकलेले होते. राघव आणि त्याचे मित्र दोन दिवसांच्या सुट्टी कोकणात फिरायला निघाले होते. शुक्रवारी संध्याकाळी सात वाजता ते निघाले. गाणी गात, आनंदाने, मस्ती करत त्यांचा प्रवास सुरू झाला होता. त्यांनी आधीच एका हाॅटेलमध्ये रूम बुक केली होती. राघव स्वतः गाडी चालवत होता. सगळ्यांना खूप जोरात भूक लागली होती. कधी एकदाचे हाॅटेलमध्ये जातो आणि कधी नाही असे सगळ्यांना झाले होते. त्यांचा प्रवास अगदी शेवटच्या टप्प्यात होता.
"अरे यार, कधी एकदाचे पोहोचतो आणि कधी नाही असे झाले आहे." निखील
त्यात राघव मध्ये मध्ये मध्ये सारखा हाॅर्न देत होता.
"अरे, राघव असा सारखा हाॅर्न का देत आहे. समोर तर कोणतीही गाडी नाही." साकेत
"पण मला वाटतंय कोणीतरी आहे समोर."
"अरे, कोणीच तर नाही." साकेत
पण अचानक राघवने करकचून ब्रेक लावला. सगळ्यांना आश्चर्य वाटले.
"राघव काय झाले? अशी मध्येच गाडी का थांबवली ? " साकेत
"ती... ती मुलगी..." राघवला दरदरून घाम फुटला होता. तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते.
"कुठे आहे, कोणती मुलगी! हो ना ! अचानक भररस्त्यात गाडी थांबवली." निखील
"अरे, ते बघा ना समोर. एक मुलगी समोर चालत आहे. "
"काहीही काय सांगतोस? एकदम सामसूम रस्ता आहे. इथे एक चिटपाखरू सुध्दा नाही." साकेत.
"अरे, ती काय गाडीच्या समोर बघ ना. निखील, विजय, राज तुम्हा कोणालाच काही दिसत नाही का?"
सगळेजण डोळे चोळू लागले.
सगळेजण डोळे चोळू लागले.
"अरे, कोणीच तर नाही."निखील
"तू एक काम कर. तू बस मी ड्रायव्हि करतो. तू फार थकला आहे." साकेत
"नको, मीच करतो ड्रायव्हिंग. कोणीतरी गुगल मॅप लावा रे. अजून किती दूर आहे हाॅटेल."
अचानक राघव गाडीतून खाली उतरला आणि त्याने चेहऱ्यावर पाण्याचे सबके मारले. इकडे तिकडे बघत तो निरीक्षण करु लागला. थंडगार हवेची झुळूक त्याच्या मनाला थंडावा देऊन गेली.
"अरे, राघव बस ना गाडीत. चल उशीर होत आहे आपल्याला. गुगल मॅप ऑलरेडी लावलेच आहे. हा हायवे सोडला की समोर उजवीकडे रस्ता जातो. तिकडे ते हाॅटेल आहे." राज
"ओके, चला." राघव
राघव गाडीत बसतो. पाहुया पुढे...
राघव गाडीत बसतो. पाहुया पुढे...
©®अश्विनी मिश्रीकोटकर