राघवची गाडी थोडी एक दोन किलोमीटर अंतरावर पोहचली की परत ती मुलगी अचानक गाडीसमोर आली. त्याने करकचून ब्रेक लावला.
"अरे, आता परत का गाडी थांबवली." निखील
"अरे, ती मुलगी परत गाडीसमोर आली."राघव
"अरे, तुला भास होत आहे का?" साकेत
"नाही मला कसलाही भास होत नाही. लाल ड्रेस घातलेली, लांबसडक काळेभोर केस असलेली एक मुलगी पण ती रडत होती रे. ती मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती. कोण असेल ती आणि एवढ्या रात्री , जंगलात काय करत असेल?" राघव
"काहीतरीच काय बोलतोस मघापासून?" विजय
"तू आधी खाली उतर मी गाडी चालवतो. उगाचच रात्रीच्या वेळी अशा अनोळख्या ठिकाणी थांबायला नको आपण."
"हो ना यार. याला ती मुलगी काय दिसते ? परत ती रडत होती हे सुध्दा कळते." सगळे जण हसायला लागले. साकेतने त्याला बळेच खाली उतरवले आणि तो डायव्हिंग सीटवर बसला. त्याने गाडी सुरू केली. राघवच्या डोक्यात मात्र वेगवेगळे विचार सुरू झाले. थंडगार झोंबणारा वारा, समुद्राच्या लाटांचा खळखळ आवाज हळुहळु कानावर कुजबुज करत होता. त्या गारव्याने त्याला गाढ झोप लागली.
"अरे, हा असा कसा! झोपला देखील." विजय
"अरे, असू दे आपण हाॅटेलवर पोहोचलो की उठवू त्याला." साकेत
पाच दहा मिनीटातच त्यांनी हायवे सोडला. ए तो बघा हाॅटेलचा बोर्ड. आता उजवीकडे टर्न घे. त्यांनी कच्च्या सडकेवरून गाडी टाकली. पण हाॅटेलचा काहीच बोर्ड दिसेना. कितीतरी वेळ गाडी चालत होती.
"अरे, हे काय ? आत्ता तर हाॅटेलचा बोर्ड तर दिसत होता." विजय
"मला वाटतं आपण रस्ता चुकलो." राज
"साकेत गाडी मागे फिरव." राज
"हो मलाही तेच वाटतंय."
साकेतने गाडी परत टाकली. रस्ता शोधण्यासाठी त्यांचा बराच वेळ वाया गेला होता. त्यात त्यांचे मोबाईलचे नेटवर्क बंद झाले होते.
बराच वेळानंतर त्यांना हाॅटेलचा बोर्ड गाडी काही मिनीटातच गाडी हाॅटेलजवळ येऊन थांबली.
"सापडले यार हाॅटेल. मला तर वाटले आपण रात्रभर असेच फिरत राहणार का?" निखील
सगळ्यांनी आपापले सामान काढले.
"राघव, उठ यार. आपण पोहोचलो." विजय त्याला उठवत होता."
"अरे, साकेत हा बघ उठताच नाही." विजय
साकेत राघवला उठवायला गेला. तर त्याचे शरीर तापाने फणफणले होते.
"अरे, याला बघा ना काय झाले? किती तापलाय हा?" साकेत
"बापरे ! " निखील
"आता काय करायच?" विजय
"एक काम करू आधी याला घेऊन आत जाऊ या. तापाचे मेडिसीन आहे माझ्याकडे आणि थंड पाण्याच्या पट्ट्या डोक्यावर ठेवून बघू." राज
चौघांनाही खूप टेन्शन आले होते. राघवचा ताप उतरतो की नाही. पाहुया पुढे काय होते ते.
©® अश्विनी मिश्रीकोटकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा