Login

एक रात्र मंतरलेली..३

रहस्यमय भयकथा

एक काम करू आधी याला घेऊन आत जाऊ या. तापाचे मेडिसीन आहे माझ्याकडे आणि थंड पाण्याच्या पट्ट्या डोक्यावर ठेवून बघू." राज

चौघांनाही खूप टेन्शन आले होते.
पाहुया पुढे काय होते ते.

त्यांनी राघवला आत नेले. जेवणाची ऑर्डर दिली. राघवला कसेबसे जागे केले. सगळ्यांनी जेवण केले आणि राघवला जबरदस्तीने खाऊ घातले. त्यानंतर तापाची गोळी दिली आणि खोलीत घेऊन गेले. थंड पाण्याच्या पट्ट्या त्याच्या कपाळावर ठेवल्या. काही वेळानंतर त्याचा ताप थोडा कमी झाला. तो जरा गुंगीतून बाहेर आला.

"राघव कसा आहे? बर वाटतंय का आता." साकेत

"हो बर वाटतंय. साॅरी यार. माझ्या मुळे तुम्हाला एवढा त्रास झाला." राघव

"पण अचानक तुला ताप कसा काय भरला?" राज

"अरे, रस्त्यावर त्याला ती मुलगी दिसली ना. मग काय घाबरला असेल."

"हो, खरच एक मुलगी मला दिसली होती. पण मध्येच कुठेतरी गायब झाली आणि परत अचानक समोर आली. ती रडत होती."

"बर बर, आता हा विषय नको. आधीच आपण सगळेच थकलेलो आहोत. शिवाय उद्या सकाळी फिरायला सुध्दा जायचे आहे. तेव्हा लवकर झोपा." साकेत

"ओके गुड नाईट. विजय ,राज आणि निखील तुम्ही तिघे जा. मी राघव सोबत झोपतो."

"राघव तू झोप शांत. मी आहे तुझ्यासोबत."

पण, राघवचे मन मात्र वेगळ्याच विश्वात गेले होते. 'कोण असेल ती मुलगी? फक्त मलाच का दिसत होती? मला काही सांगायचे तर नसेल‌ ना तिला?  ती रडत का होती ? या आधी तर आपल्यासोबत असे काही घडले नव्हते. तरीच आईने सांगितले होते. जास्त रात्रीचा प्रवास करू नका. संशयास्पद ठिकाणी थांबू नका. छे !  मी पण काय विचार करतोय. लवकर झोपू या. एक तर  माझ्यामुळे आधीच सगळ्यांना किती त्रास झाला आहे. उद्या सकाळी फिरायला सुध्दा जायचे आहे."

रात्रीचे बारा साडेबारा वाजले होते. सगळीकडे सामसूम झाली होती. तरीही राघव जागाच होता. त्याची झोप उडाली होती. झोप येत नव्हती म्हणून तो रूमच्या बाहेर आला. मंद प्रकाशाचा झोत लाॅबी मध्ये पसरला होता. राघव सारखा  येरझारा घालू लागला.‌ ही  भयाण रात्र त्याला खायला उठू लागली. अचानक त्याला पैंजणाचा आवाज आला. कोणीतरी धावत गेल्यासारखे वाटले. तो इकडे तिकडे बघू लागला. पण कोणीच दिसत नव्हते. क्षणभरासाठी तो घाबरला. पण हिंमत करून आवाजाच्या दिशेने जाऊ लागला. राघव जसजसा आवाज जवळ जाऊ लागला. तसा तो आवाज दूर जात होता.  परत तीच मुलगी तर नसेल ! की हा मला भास  होतो आहे.

काय करायचे सुचत नव्हतं. तो एकदम भारावलेल्या अवस्थेत त्या आवाजाच्या दिशेने निघाला. पेंजणाचा आवाज कमी जास्त होत होता. पण ती मुलगी कुठेही दिसत नव्हती. अचानक दिसायची आणि मध्येच गायब व्हायची. काय करायचे सुचत नव्हते. कोणाला झोपूतून जागे करायचे म्हणजे सगळ्यांची झोप मोड व्हायची. त्यामुळे तो एकटाच निघाला.


राघव सोबत काय घडते पाहुया पुढच्या भागात.....


🎭 Series Post

View all