एक सुटलेला सिग्नल...!

This is one of the life experience

         काही क्षण आयुष्यात अंगावर काटा उभा करतात..एक बोचरी वेदना देऊन..!
माझा शेवटचा पेपर होता त्यादिवशी . मी खुश होते परीक्षा संपली म्हणून. सांताक्रूझ स्टेशन ते कालीना रिक्षा पकडून आम्ही मैत्रिणी निघालो होतो.
सिग्नलला रिक्षा थांबली आणि एक तीन वर्षांचा मुलगा...काळसर...नाही काळाच होता अगदी..वाढलेले केस..नाकात शेंम्बूड..मळके कपडे..आणि डोळयात कितीतरी दिवसाची भूक घेऊन.. हातात एक वाडग घेऊन भीक मागत आला..हे अस म्हणताना पण कसंतरी होतं..!त्याने रिक्षाच्या बाहेरून माझा ड्रेस ओढला. तो पैसे मागत होता...
खरंतर तुम्ही मुंबईत रोज फिरत असलात तर असे खूप भिकारी ...अशी लहान मूल समोर येतात..म्हणजे अगदी प्रत्येकाला एक रुपया दयावा...तर त्या रांगेत एक दिवस आपण उभे राहु का..?? अस वाडग घेऊन इतपत शंका येते..त्यामुळे मी खरच कधी पर्सला हात लावत नाही...!

पण या मुलाला पाहून काळीज गलबलून गेलं...मी सॅकमधून पर्स काढून त्यातून दोन रुपये काढून देईपर्यन्त सिग्नल सुटला होता......!!

तो सुटलेला एक सिग्नल......

आयुष्यात असे खूप सिग्नल लागू नये तेव्हा लागतात आणि सुटू नये तेव्हा सुटतात पण इतकं हळवं व्हायला लावणारा हा एकच सिग्नल...!