Login

एका हाताने टाळी वाजत नाही (अंतिम भाग३)

जलद कथा
३...

अजिंक्यला मेघना सोबत बोलायचे असते.

पाहुया पुढे....

"थांब मेघना. मला तुझ्याशी काही बोलायचं आहे."

अजिंक्य मेघनाच्या जवळ जातो.

"रडू नकोस मेघना. साॅरी, खरच साॅरी."

"अरे , काय बोलतोस अजिंक्य. तू का माफी मागतो तिची."

"अगं आई, आतपर्यंत ती कशी चुकीची आहे. हेच मला दिसत होते. तिने खूपदा मला सांगण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळी मी तिला थांबवत होतो. नव्हे तिच्याशी भांडत होतो. कारण माझे आई बाबा कधीही चुकीचे वागणार नाही. माझी आई जे म्हणेल तेच अगदी बरोबर. असा माझा ठाम विश्वास होता. पण माझ्या माघारी तू मेघना सोबत कशी वागत असेल हे मला कळून चुकले. प्रत्येक वेळी भांडण तू उकरून काढते."

"अजिंक्य." कमलाकर रावांचा आवाज चढला होता.

"साॅरी बाबा, पण खरच मी कधीतरी मेघनाचे म्हणणे सुध्दा ऐकायला हवे होते. पण आई मेघना विषयी जे काही सांगत होती. त्यामुळे माझ्या मनात मेघना विषयी चीड निर्माण होत होती. कधी ती कपडे आवरत नाही. तर कधी घर झाडत नाही. कधी ती स्वयंपाक नीट करत नाही. तर कधी सतत सजत धजत असते. सतत आईची किरकिर... शिवाय आई तिच्या माहेरच्या लोकांचा सतत उद्धार करत होती. मी सुध्दा हो ला हो करत होतो. पण काल जे घडलं त्याने माझे डोळे उघडले. तुम्ही तिला घराच्या बाहेर काढून माझा संसार उद्धवस्त करत आहात. आमचं नातं बहरायच्या आधी कुस्करून टाकत आहात. तिलाही स्वाभिमान आहे. ती घर सांभाळून ट्यूशन घेते. तरीही गर्व करत नाही. तुमचा एकही शब्द खाली पडू देत नाही. पण याचा अर्थ असा होत नाही. की तुम्ही तिला अशा प्रकारे त्रास द्यावा. तुम्हाला ती घरात नको असेल तर मी सुध्दा हे घर सोडून जातो."

"अजिंक्य, काय बोलतोस हे?" कांचन ताई

"कारण काल मी मेघनाला फोन केला असता. तिने तो उचलला पण कट करायचा राहून गेला. मग मला फोनवर तुमच्यात चाललेला वाद ऐकायला आला आणि म्हणूनच माझा मेघनावर विश्वास बसला."

"अहो, तुम्ही समजवा ना अजिंक्यला. असा घर सोडायचा निर्णय घेऊ नको म्हणावं."

"अग, मी तुला कितीतरी वेळा समजावून सांगितले की जरा शांततेत घे. पण तुला सासू पण गाजवायचे असते ना. मेघना म्हणतेय ते खरे आहे. टाळी एका हाताने वाजत नाही. अजिंक्य तू तुझ निर्णय घेण्यासाठी मोकळा आहे."

अजिंक्यने मेघना कडे बघून डोळ्यांनी तिला आश्वस्त केले आणि विश्वास दिला.

"आई बाबा तुम्ही माझ्या आईबाबांना बोलावले. पण मी हे घर तुटू देणार नाही आणि तुमच्या पासून तुमच्या मुलाला देखील दूर करणार नाही. पण मलाही स्वाभिमान आहे आणि चुकीच्या गोष्टीला मी विरोध करेल."

"अनिलराव आम्हाला माफ करा. आम्ही तुम्हाला इथे अचानक बोलावून घेतले. कांचन आणि अजिंक्यच्या वतीने मी तुमची माफी मागतो."

"खरंतर चूक माझीच आहे. कारण मीच एवढ्या तेवढ्या कारणाने मेघनाला बोलत होती. उलट तुम्ही तिच्यावर उत्तम संस्कार केले आहे. खरच मला माफ करा आणि हो आता आल्यासारखं दोन दिवस रहा. मुलीचा सुखाचा संसार बघा. यापुढे सासु सुनेचं एक नवीन रूप आणि नात्यांची रेशमी वीण घट्ट झालेली बघाल."

©® अश्विनी मिश्रीकोटकर