Login

अखेर ती जिंकली भाग १

गुण आणि कर्तृत्वाच्या जोरावर तीची ओळख निर्माण झाली होती.
शैलजा अतिशय गुणी मुलगी होती. आई-वडिलांना त्यांच्या कामात हातभार लावत होती. ती अंगाने जाड होती. त्यामुळे सर्वजण तिला जाडी - जाडी म्हणून चिडवत असायचे. इतकेच नाहीतर नातेवाईकांमधे सुध्दा तिला जाण्याची भीती वाटत होती.

" आज केलेले धपाटे माझ्यासाठी ठेव बर का आई. "

" अरे हो. राहतीलच ना यातले. असे काय विचारतोय."

" आपली ताई शाळेतून आल्या आल्या खायला बसते. संपून टाकेल सर्वच."

" तुला ना फटके द्यायला हवे. तुझ्यापेक्षा ती मोठी आहे. तू लहान असताना तिने तुला सांभाळल, खायला घातल. अस बोलतो तिला."

" सगळेच तिला चिडवतात,हसतात, म्हणून मी पण मस्करी केली."

" आपणच तिच्या बद्दल असा विचार केला तर ती खचून जाईल आणखी."

" नको काळजी करु आई. मी नाही चिडवणार आता तिला यापुढे. आणि जो कोणी तिला चिडवेल त्याला बरोबर उत्तर देतो."

" मोहन आपण खेळायचे का? गल्लीतले सगळे जमले आहेत."

" मी पण येते खेळायला. माझा आताच अभ्यास झाला."

" तू नको येवू. आम्ही लहान मुले खेळणार त्यात तू काय करणार."

" मी काय मोठी आहे का जास्त. मी पण येते."


" काय खेळायचे आपण? "

" लपाछपी खेळूया."

" चल माझ्यावर राज्य आले. लपा सगळे."

" ये जाडे तुझा पाय माझ्या पायावर पडला म्हणून मला जोरात ओरडाव लागलं आणि मी खेळातून बाद झालो."

" जाडी कोणाला बोलतो. ती काय तुझ्या घरी जेवायला येत नाही."

" माझा पाय थोडक्यात वाचला. नाहीतर आज काही खर नव्हते माझे."

" आला मोठा. इथून पुढे तिला जाडी वरुन बोलायच नाही."

आपल्या भावाने आज आपली बाजू घेतलेली पाहून शैलजाच्या डोळ्यात आनंदश्रू जमा झाले होते.

शैलजाने कोणतेही काम हाती घेतले की ते कौशल्याने पूर्ण करत होती.

" आपल्या शाळेचे स्नेहसंमेलन जवळ आले आहे. कोण कोण भाग घेणार आहेत नृत्यात."

" बाई मी."

वर्गातल्या इतर मुली शैलजाने केलेला हात वर पाहून हसत होत्या

" डान्स करता बांधलेला स्टेज आपल्याला स्नेहसंमेलना पर्यंत तरी टिकून ठेवायचा आहे."

" मीना अस बोलायच नसते."

" चल आधीच मुलींची नाव माझ्याकडे आली आहेत. ती खालील प्रमाणे-
हेमा, सीमा, रेखा, वंदना, शिल्पा, मीना, मनिषा, श्वेता, मिनाक्षी, वेदा, राहूल, चिन्मय, आदित्य."

" बघा मी काहीही बोलले तरी बाईंनी सुद्धा तिच नाव नृत्यात घेतले नाही."

हिरमुसलेली शैलजा स्वत:च्या शरीराला दोष देत रडत बसली होती. तिच्या फारश्या मैत्रिणी देखील नव्हत्या. प्रत्येक जण तिच्या हुशारीचा फायद्यापुरती वापर करुन तिला तिच्या
बाह्यरुपावरुन चिडवायला समर्थ होता.

शैलजा तिच्या नातेवाईकांमध्ये गेल्यावर काय घडते पाहूया पुढच्या भागात.

क्रमशः

विषय : होते कुरुप वेडे
जलद लेखन फेब्रुवारी.

🎭 Series Post

View all