Login

अखेर ती जिंकली भाग २

गुण आणि कर्तृत्वाच्या जोरावर तीची ओळख निर्माण झाली होती.
" ताई आलीस का तू. मोहनला नाही आणलस का? "

" अरे त्याची परीक्षा आहे. लग्न झाले की आम्ही लगेच निघणार आहोत."

" आलीस का आक्का तू. लग्नाकरता बर झाल शैलजाला घेवून आली. लग्नात जेवायला भरमक्कम माणसे नको का जेवायला."

" ये डबा कधी आलास मामाच्या गावाला."

" आई हे बघ ना मला चिडवतात."

" राहू द्या ना शांत जरा तिला. एकजण तिला बोलायची संधी सोडत नाही."

"आई मी लग्नाला नाही येणार. तिथे तर अजून लोक मला चिडवत राहतील."

" एकटी काय करशील इथे. आपल्याला तसेच आपल्या घरी जायचे आहे."

" या या. स्वागत आहे तुमचे."

" अवो ती मुलगी कोणाची आहे. आमच्याकडे एक स्थळ आहे."

" ती होय. माझ्या बहिणीची मुलगी आहे. ती अजून लहान आहे. शाळेत शिकत आहे."

" तायडे, शैलजाला उगाच आणल बघ इथे. आता तर लोक हिला लग्नाच पण विचारायला लागले बघ. "

" इथून पुढे नाही आणायची मी कुठेच."

" वाईट नको वाटून घेवूस. पण तिला जरा व्यायाम करायला लाव. खाण कमी कर तिच."

" काय खाते ती अस. एक चपातीच्या वर तीच खाण काहीच नसते."

" बाहेरच खात असेलच की."

" घरातच करुन देते बघ मी तिला."

" झाले का ओ लग्न तुमच्या भावाचे. शैलजा नव्हती तर गल्ली रिकामी रिकामी वाटते होती."

" रिकामी कसली भूकंप व्हायचा थोडे दिवस थांबला होता."

" गण्या नीट बोलता येतच नाही का तुला. घरी चल चांगलच बघते तुला. ती‌ बिचारी मागे फिरुन बोलत नाही तर तू आणि गल्लीतली लोक‌ तिला नुसते बोलतचं सुटले आहात."

" जावू द्या ओ. कामत वहिनी. लहान आहे तो. परत नाही बोलायचा असे काही."

" आई, माझ्या नशिबात आता लोकांचे आता असेच बोलणे ऐकून घ्यायचे लिहले आहे वाटते."

" अस काही नाही बाळा. हे पण दिवस जातील."

शैलजा शालेय शिक्षण संपून आता काॅलेजला जायला लागली होती.

" ताई तुमची बहिण आहे का या काॅलेजला."

" काय? नाही ओ मीच या काॅलेज मधे अॅडमिशन घेतले आहे."

" माफ करा. मला वाटले तुम्ही शोधत आहात का कोणाला."

' आता या सगळ्याची तयारी ठेवायलाच हवी. लहानपणापासून अशीच वागणूक तर दिली आहे सर्व नातेवाईक आणि शेजारी-पाजा-यांनी.'

काॅलेजला जात असताना शैलजाला कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागेल? शैलजा जीवनात स्वत:ला कोणत्या प्रकारे सिद्ध करेल पाहुया पुढच्या भागात.

विषय : होते कुरुप वेडे
जलद लेखन फेब्रुवारी

🎭 Series Post

View all