Login

अखेर ती जिंकली भाग ३

गुण आणि कर्तृत्वाच्या जोरावर तीची ओळख निर्माण झाली होती.
" शैलजा तू पण या काॅलेजमधे आहेस का? मला माहितच नव्हते."

" हो ग. बर झाले तू मला भेटली ते."

" आपण आता एकत्र जावू आणि सोबत येवू."

' काही झाल तरी मला ज्ञानाने समृद्ध व्हायचे आहे. शिकून लोकांच्या सेवेचा भाग व्हायचे आहे.'

" अभिनंदन शैलजा तुला खूप छान मार्कस मिळाले."

" धन्यवाद, बाई. तुमच्या मुळे शक्य झाले."

" तुझी पण अभ्यास करण्याची मेहनत आहे ना त्यात."

" तुम्ही शिकवलत आणि अभ्यासाची गोडी निर्माण झाली."

" आता पुढे काय करायचे ठरवले आहे."

" बी एड करुन काॅलेजमधे मुलांना शिकवायच आहे. तसेच पी. एच. डी मराठी आणि इंग्रजी विषयात करायची आहे."

" खूप मोठ स्वप्न आहे तुझे. पूर्ण होवू दे."

शैलजा काॅलेजचे शिक्षण करुन बी. एड करते त्यात ती तिने ठरवल्याप्रमाणे पी. एच. डी देखील केली होती.

" आई, आज माझा काॅलेजला जायचा पहिला दिवस आहे. पाया पडते."

" खूप मोठी हो , बाळा. तुझी इच्छा पूर्ण होवू दे."

" पोरी तू तुझ्या दिसण्यावरुन नाही तर समाजकल्याणात ज्ञानाचा दिवा सतत पेटवत ठेवून मुलांना शिकवण्याचे काम हाती घेतले आहे. तुला आम्ही लहानपणी खूप चिडवायचो."

" काका, तुमचेच आशिर्वाद म्हणून मी इथपर्यंत पोहचले आहे. त्या गोष्टी मी कधीच विसरले."

" शैलजाला नोकरी लागली का ओ. ती आमच्या बिल्डिंग मधल्या एका मुलाला शिकवायला आहे."

" हो. दोन महिने झाले तिला नोकरीवर रुजू होवून. तुमचा मुलगा मंदार काय करतोय."

" काही नाही नोकरीच्या शोधात आहे अजून. त्यात मित्रांबरोबरच असतो सारखा. कधी त्याला नोकरी लागते काय माहित? की असाच मित्रांबरोबर भटकतोय."

" नका काळजी करु लागेल त्याला पण नोकरी."

" लहानपणी शैलजाला किती चिडवायचा तो. आता तिचा आदर्श घ्यायला हवा त्याने. बाह्यरुप आपल्या हातात नसते. परंतु अंतर्मन आणि आपली कमकुवत बाजू लक्षात घेवून त्यावर मात करणे म्हणजे जीवन जगण्याचे गमक आहे."

" शैलजा तू पी.एच.डी केली आहेस. तुझे खूप अभिनंदन. वाटल नव्हते तू इतकी शिकून नाव कमवशील."

" काहीच नाही ग हे. अजून खूप शिकायच आहे. माणूस शेवटपर्यंत विद्यार्थी असतो."

" आली का शैलजा तू. काय झाले तुला बर वाटत नाही का? "

" काय सांगू आई तुला. आजकाल लोकांना मी जाड आहे की पातळ याने फरक पडत नाही. कोणी मला चिडवत देखील नाही. त्यांना आता फक्त मी केलेली पी.एच.डी आणि करत असलेली नोकरी दिसते. हे ऐकण्याची माझे कौतुक पाहण्याची सवयच राहिली नव्हती मला."

" काळ हे सगळ्या प्रश्नावर उत्तम उत्तर असते बघ."

" आई काॅलेजच्या संमेलनात मला गाण गायची संधी मिळत आहे."

" हि चांगली गोष्ट आहे बघ. तुला गाण्याची खूप आवड होती ना."

" लहानपणी या जाड असल्यामुळे कशातच मन लागत नव्हते बघ. पण आता मिळालेली संधी सोडायची नाही."

" सगळ तुझ्या मनासारखे होवू दे."

शैलजाच्या जीवनात अजून कोणत्या गोष्टी उमलून येणार आहेत. पाहुया अंतिम भागात.

क्रमशः
विषय : होते कुरुप वेडे
जलद लेखन फेब्रुवारी

🎭 Series Post

View all