Login

अखेर ती जिंकली अंतिम भाग ४

गुण आणि कर्तृत्वाच्या जोरावर तीची ओळख निर्माण झाली होती.
" आई सगळ्यांना माझे गाणे खूप आवडले. मला माझ्या कामा बद्दल ट्राॅफी दिली बघ ही."

" खूपच छान झाले."

" शैलजाची आई ऐकलत का जरा."

" बोला ना."

" शैलजाकरता एक स्थळ उत्तम चालून आले आहे."

" बाबा, मला इतक्यात लग्न नाही करायच."

" योग्य वयात लग्न झालेल चांगले असते पोरी."

" पण माझ्या सारख्या मुलीला कोण पसंत करेल."

" कोणाची हिंमत माझ्या सोन्यासारख्या मुलीला नाही म्हणायची."

" माझी तब्येत यासगळ्यात मधे आली तर."

" आता लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोण बदलला आहे."

" जो मला माझ्यातल्या गुणांवरुन पसंत करेल तोच खर माझा नवरा होईल."

" बरोबर बोलली तू."

" काय हो, पाहुणे तर पाहूण गेले. पण अजून काही निरोप नाही आला."

" अग त्यांनी नकार सांगितला आहे."

" कारण काय बोलले ते."

" तिची तब्येत जास्त आहे."

" आजच्या काळात पण अशी लोक आहेत का? जी बाह्यरुपाला महत्व देतात. व्यक्तिच्या गुण आणि कर्तृत्वाला कवडीमोल समजतात."

" भरपूर स्थळ आहे जगात. तसेही बर झाल आताच कळाले त्यांचे खर काय."

" शैलजाला काय सांगणार आपण स्थळा बाबत."

" त्यांनी आधी पण एक मुलगी पाहिली होती. तिला पसंत केले सांगायचे."

" तसही तिच्या डोक्यात हा प्रश्न येणारच नाही."

" बरोबर आहे तुमचे."

" जोशीचा राहूल काल कॅनडा वरुन आला आहे. त्याने आपल्याला घरी जेवायला बोलवले आहे."

" शैलजा, उद्या आपल्याला तुझ्या बाबांच्या मित्राकडे जेवायला जायचे आहे."

" आई, तुम्ही दोघ जावून या. मी जरा हे पुस्तक वाचते."

" नंतर वाच ग. चल जरा बाहेर तेवढेच तुला बर वाटेल."

" जोशी आलो बर का तुला भेटायला."

" तुमचीच वाट पाहत होतो. "

" राहूल ये रे इकडे. हा माझा खास मित्र रानडे. ह्या त्यांच्या मिसेस आणि हि त्यांची मुलगी शैलजा आणि हा मुलगा मोहन."

" ओके. तुम्हा सर्वांना भेटून आनंद झाला खूप. काय करता तुम्ही शैलजा आणि मोहन."

" माझी पी.एच.डी झाली आणि मी काॅलेजमधे लेक्चरर आहे."

" माझी काॅर्मस मधे मास्टर डिग्री झाली. मी बॅंकेत नोकरीला आहे."

" छान शैलजा तुमचे खूप अभिनंदन. या काळात कोण शिक्षणा बाबत एवढे सिरीयस नाहीत. मोहन तुमचे देखील अभिनंदन."

" गप्पा झाल्या असतील तर जेवण करुन घेवूयात आणि परत पुन्हा गप्पा मारुयात."

शैलजा आणि राहूल गप्पा मारत खूप वेळ बोलत बसतात.

" अहो, शैलजा आधी यायला तयार नव्हती आता बघा राहूल सोबत किती गप्पा मारत आहे."

" निघायच का आता शैलजा आणि मोहन."

" हो जावूया बाबा."

" कोणीतरी यायला तयार नव्हते. तिथे मात्र गप्पा मारत घरातून निघावस वाटत नव्हते कोणाला."

" मोहन, तुझे आपले काहीतरीच. आमचे प्रोफेशनल बोलणे चालले होते. त्याला देखील पी.एच. डी करायची आहे. त्या बद्दलच बोलत होतो."

शैलजाच्या मदतीने राहूल तीन वर्षात पी.एच. डी ची परीक्षा पूर्ण करतो.

" शैलजा मला एक तुम्हांला सांगायचे आहे."

" सांगा की."

" माझ तुमच्यावर खूप प्रेम आहे. पहिल्याच नजरेत मला तुम्ही आवडले होते."

" खर का."

" अस का विचारता."

" मी दिसायला अशी. तुम्ही तर कॅनडा वरुन आला आहात. तिकडे असेलच तुमची एखादी मैत्रीण."

" मैत्रिणी खूप आहे. पण बायको मात्र एकच असते ना."

" तुम्हांला मी पसंत आहे ना."

" सांगेल मी एक-दोन दिवसात."

" एवढे दिवस वाट पाहावी लागेल का मला."

" आता मला जायला हव. "

" हो. निरोप सांगाल मला."

" जोशी जरा उद्या तुम्ही सगळे आमच्याकडे जेवायला या."

" हो येतो ना."

" तर आपल्या पोरांनी एकमेकांना पसंत केले आहे. लग्नाचा बार लवकर उडवून द्यायला हव."

" खर का? राहूल."

" अ ते... हो ते आपल. "

" काय ओ तुम्ही घरच्यांसमोर माझी बोबडी वळवलीत."

" माझ्या पोरीला समजून घेणारा. तिच्या गुणांना प्राधान्य देत तिच्यावर प्रेम करणारा जोडीदार मिळाला. अजून काय हव. "

राहूल आणि शैलजाचे लग्न दणक्यात पार पडले होते. त्यांचा सुखाचा संसार सुरु झाला होता.

समाप्त:

विषय : होते कुरुप वेडे
जलद लेखन फेब्रुवारी

🎭 Series Post

View all