#जलद ब्लॉग लेखन स्पर्धा – ऑक्टोबर २०२५
विषय- अकस्मात.
शिर्षक – अकल्पित क्षण. भाग – एक
“आई काय झाले? तू का रडत आहेस? अहो बाबातुम्ही तरी सांगा, आई का रडत आहे? आई आज तू गायनॉकॉलॉजिस्टकडे गेली होतीस ना. काय म्हणाल्या त्या? का तुला चक्कर आली होती? काही सिरीयस आहे का?” रीमा तिच्या आईवडिलांना विचारत होती.
“अगं रीमा एकाच वेळी किती प्रश्न विचारतआहेस? जरा थांब. आईसाठी आधी पाणी घेऊन ये. मग आपण शांतपणे बोलू या.” रीमाचे बाबा रमण रीमाला म्हणाले.
रीमा आईसाठी पाणी घेऊन आली. तेव्हा रमण रीमाला म्हणाले,
“रीमा तुझी आई प्रेग्नंट आहे. चार महिने झाले.”
“काय? अहो बाबा काय सांगत आहात तुम्ही? ह्या वयात आई प्रेग्नंट. कसं शक्य आहे? आता तर तिचा मोनोपॉजचा काळ चालू झाला आहे. आई तू गर्भपात करुन घे.”
“नाही ते आता शक्य नाही. तुझ्या आईने गर्भपात केला तरतिच्या जीवाला धोका आहे. असं डॉक्टरम्हणाले.”
“अहो बाबा काय करुन ठेवले तुम्हीदोघांनी? जरा म्हणून तुम्हाला संयम नाही का? हल्ली एवढी साधन आहेत ती वापरता नाही येत का तुम्हाला? लोकांना कळले तर लोक काय म्हणतील? माझं भविष्य काय? ह्याचा विचार केला आहे का तुम्ही. आईबाबा तुम्हालावंशाचा दिवा हवा म्हणून तुम्ही हे केलं. शी मला विचार करताना सुद्धा लाज वाटते. एवढे वर्ष मी नुसती ऐकत आले. आमची मुलगी आमचा अभिमान आहे. आम्ही तिला आमचा मुलगाच मानतो. आता काय त्याचं? नुसतं बोलायचं.”
“रीमा तोंडाला येईल ते बोलू नकोस. काही गोष्टीआपल्या हातात नसतात. जरा आईचा विचार कर. ती किती रडती आहे. तिचा विचार कर जरा. अगं तू तुझ्या जन्मदात्या समोर हे बोलत आहेस. आता तुझ्या आईला विश्रांतीची गरज आहे. आपण ह्या विषयावर नंतर बोलू.”
“अहो बाबा, तुम्ही आता बोलण्यासाठी काही ठेवलं आहे का? मी आता बावीस वर्षांचीहोईल. मी तुम्हाला आधीच सांगते. आता येणाऱ्या बाळामुळे माझ्या जीवनात काहीही बदल झालेला मला चालणार नाही. मी ठरल्याप्रमाणेपरदेशात शिकायला जाणार आहे.” असं म्हणून रीमा आपल्या खोलीत जाते.
“अहो काय झालं हे? मी माझा गर्भपात करुन घेते. रीमा म्हणते ते खरं आहे. लोक काय म्हणतील? रीमासाठी तरी मी गर्भपात करते.”
“अग त्यामुळे तुझ्या जीवाला धोका आहे आणि येणाऱ्या बाळाचा त्यात काय दोष आहे? कबूल आहे आपण दोघांनी साधन वापरायला हवे होते. पण आता चूक झाली आहे तर ती आपण दोघांनी निस्तरायला हवीच ना. तू रीमाचा विचार नको करू. ती तिच्या जागीबरोबर आहे. आता ती रागात होती म्हणून एवढं बोलली. शांत झाल्यावर ती नक्की आपल्याला समजूनघेईल. मी आईबाबा व तुझ्या मम्मी पप्पांना ही बातमी सांगतो फोन करुन.”
रीमा येणाऱ्या बाळाचा स्वीकार करेल का? मेधा व रमणच्या आईवडिलांचे काय मत असेल?
वाचा पुढच्या भागात.
३१/१०/२०२५
©️®️ ज्योती सिनफळ
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा