Login

अकल्पित क्षण. भाग - २

क्षण
जलद ब्लॉग लेखन – ऑक्टोबर २०२५

विषय – अकस्मात

शिर्षक – अकल्पित क्षण. भाग - २

मेधा पंचेचाळीस वर्षाची होती. ती एका बँकेत नोकरी करायची. तिचा नवरा रमण एका प्रायव्हेट कंपनीत मॅनेजर होता. त्यांना एकच मुलगी होती. तिचे नाव रीमा. रीमा फॅशन डिझाइनर होती. मेधा आपल्या आयुष्यात खूप सुखी व आनंदी होती.

मेधाचा सध्या राजोनिवृत्तीचा काळ चालू होता त्यामुळे तिची पाळी अनियमित होती. तिने तिच्या डॉक्टरला दाखवले होते. त्यांनी तिला सांगितले होते. ह्या काळात पाळी अनियमित होते. मेधाला दोन तीन महिन्यातून एकदाच पाळी यायची. तिला ह्या गोष्टीची आता सवय झाली होती.

पंधरा दिवसांपासून मेधाला चक्कर येत होती. जेवण जात नव्हते. अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे तिने त्यांच्या फॅमिली डॉक्टरांकडून औषध आणले. पण काही फरक पडला नव्हता. तेव्हा डॉक्टरांनी तिला प्रेग्नंट टेस्ट करायला सांगितले म्हणून ती आज (रमण) नवऱ्याबरोबर गायनॅकॉलॉजिस्ट सुनिताकडे गेली होती. तेव्हा तिला गायनॅकॉलॉजिस्ट सुनिता ने तपासून सांगितले की ती चार महिन्याची प्रेग्नेंट आहे. ते ऐकताच मेधाच्या पाया खालची जमीनच सरकली. ती डॉक्टरांना म्हणाली, “हे कसं शक्य आहे? अहो मी आता पंचेचाळीस वर्षाची आहे. माझा मोनोपॉज चालू झाला आहे. माझी मुलगी लग्नाला आली आहे. मला हा गर्भ नको आहे. आपण लगेच गर्भपात करु या. कधी करायचा ते सांगा?”

“थांब मेधा शांत हो. गर्भपात करणं आता शक्य नाही. चार महिन्याचा गर्भ आहे तुझ्या पोटात. गर्भपात केला तर तुझ्या जीवाला धोका आहे.”

हे ऐकताच मेधा रडायला लागली. रमणला म्हणाली, “अहो हे काय झाले? आता काय करायचं? रीमा काय म्हणेल. आईबाबा, मम्मी पप्पा काय म्हणतील? लोक हसतील आपल्याला.”

“थांब मेधा शांत हो. डॉक्टर दुसरा काही उपाय नाही का? म्हणजे झाली आमच्याकडून चूक. पण ह्या वयात आईवडील होणं म्हणजे अवघडच आहे. लोक काय म्हणतील ह्यापेक्षा मेधाला हे सर्व झेपेल का? तिला डायबेटीस, ब्लडप्रेशर दोन्हीही आहे.”

“हो ते सगळं मला माहिती आहे. पण आता गर्भ चार महिन्याचा झाला आहे. त्यामुळे गर्भपात करणे अवघड आहे. मेधाच्या जीवाला धोका आहे. बाकी निर्णय सर्वस्वी मेधाला घ्यायचा आहे. पण डॉक्टर म्हणून सांगते. आता जे आहे ते स्वीकारावे लागेल तुम्हाला.”

हे सर्व ऐकल्यावर रमण डॉक्टरांना परत तपासणीसाठी येतो म्हणून सांगून मेधाला घेऊन घरी आला. घरी आल्यावर रमाचे बोलणं ऐकून तो खूप निराश झाला. पण मेधासमोर तसं न दाखवता. तिला धीर देऊन. तिचे मनोबल वाढविले. पण त्याच्या मनात लोक काय म्हणतील. त्याचे मित्र त्याला हसतील ह्याविषयी भीती होतीच. पण आता अकस्मात आलेल्या प्रसंगाला तोंड तर द्यावे लागणार होते. त्याचे मनोबल वाढण्यासाठी त्यानी स्वतःच्या आईवडिलांना व मेधाच्या आईवडिलांना घरी बोलावले.

मेधा आणि रमणवर आलेल्या अकस्मात प्रसंगावर मेधाचे व रमणचे आईवडील काय प्रतिक्रिया देतील? त्यांना आनंद होईल की ते ह्या दोघांना दोष देतील.

वाचू या पुढच्या भागात.
३१/१०/२०२५
©️®️ ज्योती सिनफळ.


0

🎭 Series Post

View all