दीर्धकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026
"अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - १४"
अभिमन्यू बोलत असतो तितक्यात कीर्ती येऊन आवाज देते,
"अभी, झाले कारे बोलून?"
"अभी, झाले कारे बोलून?"
कीर्तीला यशवंतरावांनी पाठवलेले असते. कीर्ती मध्येच बोलल्यामुळे अभिमन्यूचे बोलणे अर्धवट राहते. कीर्ती बोलल्यावर अभिमन्यू बोलतो, "ताई, आत्ताच बोलायला सुरुवात केली लगेच कशे बोलून होईल." अभिमन्यू कीर्तीला उत्तर देतो.
"ताई, आत्ताच आलो आहोत. कशे बोलून होईल." अभिमन्यू बोलतो.
"बरं.... बरं..... बोलून झालं की या लवकर खाली. असे बोलून कीर्ती तिथून निघून जाते.
कीर्ती गेल्यावर अभिमन्यू जरा वेळ शांत असतो. अभिमन्यूला शांत बघून वैदहीच पुढाकार घेऊन त्याला बोलते, "मी सांगते, माझ्या होणाऱ्या पतीकडून माझ्या काय अपेक्षा आहे."
अभिमन्यू काहीही बोलत नाही. मग वैदहीच अभिमन्यूला होणाऱ्या पतीकडून ज्या अपेक्षा आहे त्या सांगते.
"माझ्या, माझ्या पतीकडून फारशा अपेक्षा नाहीयेत. फक्त माझ्या पतीने माझ्या बरोबर एका पतीपेक्षा जास्त एक मित्र म्हणून राहिले तर मला जास्त आवडेल."
"जसा मी आदर त्यांच्या आई - वडिलांचा करेल; तसाच आदर त्यांनीही माझ्या आई - वडिलांचा करावा."
"सर्वात महत्त्वाचे हे की माझे पती हे निर्व्यसनी असावेत."
वैदहिने तिच्या मानतील तिच्या पतीकडून असणाऱ्या अपेक्षा अभिमन्यूला सांगितलेल्या असतात. पण त्या ऐकण्यात अभिमन्यूला काहीही रस नव्हता. वैदहीच्या बोलण्याकडे अभिमन्यूचे लक्ष देखील नव्हते. त्याच्या मनात एकच होते, की तो कधी वैदहिला त्याच्या मनातले सांगेन आणि ती नकार देईल.
वैदहीचे बोलणे झाल्यानंतर अभिमन्यू तिला बोलतो, "मला तुला वेगळेच सांगायचे आहे."
"काय सांगायचे?" वैदही विचारते.
"ते मला तुला असे सांगायचे होते की.....
अभिमन्यू बोलतच असतो तेवढ्यात नर्मदा येऊन आवाज देते, "अभी झाले का बोलून?"
नर्मदलाही यशवंतरावांनीच पाठवलेले असते आणि नर्मदाने टोकल्याने अभिमन्यूचे बोलणे पुन्हा अर्धवट राहते. अभिमन्यू आता निराश झालेला असतो. दुसऱ्यांदा त्याने वैदहिला सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याला सांगता आले नाही.
"नाही, काकू नाही झाले." अभिमन्यू निराशेने बोलतो.
"अरे मग आवरा लवकर. किती वेळ झाला." नर्मदा बोलते.
"काकू थोडा वेळ, मग आलोच खाली." अभिमन्यू बोलतो.
नर्मदा तिथून निघून जाते. नर्मदा गेल्यावर अभिमन्यू परत शांत बसतो. मग पुन्हा वैदही बोलण्यास पुढाकार घेते.
वैदही अभिमन्यूला बोलते, "मलाही तुम्हांला काहीतरी सांगायचे आहे सांगू का?"
"हो, सांग तुला काय सांगायचं? अभिमन्यू बोलतो.
वैदही अगोदर तिचे शिक्षण कसे झाले, कुठे झाले या गोष्टी अभिमन्यूला सांगते. यानंतर वैदही बोलते, "माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात कुठल्याच मुलाबरोबर मी कमिटेड नव्हते. बॉयफ्रेंड - गर्लफ्रेंड यात मी कधीच पडले नाही. मला यात रसच नव्हता. आणि असा कोणीही मुलगा पण आयुष्यात आला नाही ज्याच्याबद्दल असे काही वाटावे."
"मला पहिल्यापासून समजतील गरजू लोकांसाठी काम करायला आवडते. मला लग्नानंतरही हे काम करायचे आहे."
वैदहीने तिच्याबद्दल सर्वकाही अभिमन्यूला सांगितलेले असते. अभिमन्यूला मात्र त्याच्या मनातले वैदहिला सांगता येत नव्हते. त्याचे मन रेंगाळत होते.
"टेरेस वर आल्यापासून मीच जास्त बोलत आहे. तुम्ही फार कमी बोलता का?" वैदही अभिमयूला विचारते.
"मलापण तुला काहीतरी सांगायचे आहे." अभिमन्यू बोलतो.
"हो, तुम्हाला सांगायचे होते, सांगा काय सांगायचे?" वैदही बोलते.
"मला ते"....
अभिमन्यू बोलायला लागतो तेच यशवंतराव तिथे येतात आणि अभिमन्यूचे बोलणे पुन्हा अर्धवट राहते. कीर्ती, नर्मदा, यशवंतराव हे सगळे अभिमन्यूच्या बोलण्याचा वेळेस आलेले असतात कारण ते भिंतीच्या आडून अभिमन्यू आणि वैदहीचे बोलणे ऐकत असतात.
मग बरोबर अभिमन्यू त्याच्या मनातले वैदहिला सांगायला लागला का, एक एक बाहेर येत होता. त्यामुळे अभिमन्यूचे बोलणेच पूर्ण होत नव्हते.
"अभिमन्यू बराच वेळ झाला. झाले नाही का अजून." यशवंतराव अभिमनन्यूला विचारतात.
"काका, फक्त पाच मिनिटे मग होईल आमचे बोलणे." अभिमन्यू बोलतो.
यशवंतराव चालायला लागतात. पण चालता चालता ते विचार करतात काही करून अभिमन्यू आणि वैदहीला खाली नेले पाहिजे नाहीतर, अभिमन्यू वैदहिला सगळ खर सांगेल.
अभिमन्यूला वैदहिला सगळे खरे सांगण्यापासून काही करून थांबवले पाहिजे.
अभिमन्यूला वैदहिला सगळे खरे सांगण्यापासून काही करून थांबवले पाहिजे.
मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हांला हा भाग कसा वाटला ते कमेंट्स मध्ये सांगा. लाईक करा आणि पुढे काय होईल? अभिमन्यूला त्याच्या मनातील वैदहिला सांगता येईल? यशवंतराव, अभिमन्यला वैदहिला सगळे सांगण्यापासून थांबवू शकतील? काय वाटते तुम्हाला कमेंट्स मध्ये सांगा आणि कथा शेअर करा.
ही कथा पूर्णता काल्पनिक आहे त्याचा वास्तवाशी काही संबंध नाही आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
क्रमशः
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा