Login

अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - ७

राजकीय फायद्यासाठी झालेलं लग्न, आणि लग्नानंतर अलगद उमलणारे प्रेम
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026

"अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - ७"

प्रतापराव सकाळचा नाष्टा करत असतात. त्यांच्या डोक्यात वैदहीच्या निर्णयाबद्दल विचार चालू असतो. वैदहीच्या निर्णयाची चिंता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.

प्रतापराव शारदाला विचारतात, "कालच्या विषयावर तुझं वैदही बरोबर काही बोलणं झालं का? काय बोलली का वैदही?"

"झालय रात्री माझं बोलणं वैदही बरोबर, ती मला बोलली सकाळी सांगेल. वैदही खाली आली का विचारू तिला तिने काय ठरवलं." शारदा बोलते.

"ठीक आहे, पण तुला काही अंदाज आला का वैदहीचा? प्रतापराव विचारतात.

"मी वैदहीकडे गेले तर ती कसल्यातरी विचारात होती. मला वाटलं लग्नाचाच विचार करत असेल म्हणून मी तिला विचारलं देखील काय विचार करते तर ती दुसरा विचार करते असे म्हटली." शारदा बोलते.

"ठीक आहे, वैदही आली की बोलू सविस्तर तिच्याबरोबर." प्रतापराव बोलतात.

प्रतापराव आणि शारदा गप्पा चालू असतात. थोड्या वेळाने वैदेही येथे. तिच्या चेहऱ्यावर हसू होते पण डोळ्यात गंभीरता होती.

"आई, काय बनवलं नाशट्याला?" वैदही शारदाला विचारते.

"उपमा केला आहे." असे बोलून शारदा वैदाहिला नाष्टा देते.

थोडा वेळ गेल्यानंतर शारदा वैदहिला विचारते, "वैदही तू काय निर्णय घेतला आहे?"

क्षणभर वैदही वेळ घेते, आणि आई-बाबांकडे बघते. त्यांच्या डोळ्यात वैदहिला अपेक्षा, काळजी, आणि प्रेम दिसते.

"आई, बाबा मी तयार मुलगा बघायला." वैदही बोलते.

"खरंच, मला खूप छान वाटलं तुझा निर्णय ऐकून." प्रतापराव आनंदी होऊन बोलतात.

"गुणाची माझी पोरगी, मला माहित होतं तू योग्य तोच निर्णय घेशील." शारदा बोलते.

"मी लगेच यशवंतरावांना कॉल करतो, आणि बघण्याचा कार्यक्रम कधी करायचा विचारतो." प्रतापराव उत्साहाने बोलतात.

प्रतापराव यशवंतरावांना कॉल करतात.

"नमस्कार, प्रतापराव काय म्हणता? सकाळी सकाळी कॉल केला?" यशवंतराव कॉलवर बोलतात.

"यशवंतराव मी तुम्हाला हे विचारण्यासाठी कॉल केला की, वैदही आणि अभिमन्यू यांचा पोह्याचा कार्यक्रम कधी करायचा?" प्रतापराव बोलतात.

क्षणभर थांबून यशवंतराव बोलतात, "म्हणजे तुमची सगळी तयारी झाली वाटतं."

"हो आमची सगळी तयारी झाली आहे, तुम्ही बोलका आबासाहेब आणि इतर घरातल्या मंडळी बरोबर." प्रतापराव बोलतात.

"हो...हो....माझं घरातल्या सर्वांशी बोलणं झालं आहे. आम्हीही तुम्हाला सांगू कधी पोह्याचा कार्यक्रम करायचा." यशवंतराव बोलतात.

यशवंतराव आणि प्रतापराव यांचे फोनवर बोलणे झाल्यानंतर यशवंतराव ताबडतोब खाली त्यांच्या घरातल्या हॉल मध्ये येतात, जिथे आबासाहेब, देवकी आणि घरातील सर्व मंडळी ( अभिमन्यू सोडून ) बसलेले असतात.

"दादा, वहिनी आत्ताच प्रतापरावांचा फोन आला होता. बघण्याचा कार्यक्रम कधी करायचा असे विचारत होते."
यशवंतराव बोलतात.

"मग तू काय बोललास त्यांना?" आबासाहेब यशवंतरावांना विचारतात.

"दादा, मी त्यांना म्हटलो नंतर सांगतो. आता सध्या वेळ मारून नेली आहे पण दादा, वहिनी त्यांना आज नाहीतर फार फार उद्यापर्यंत काहीतरी सांगायला लागणार आहे." यशवंतराव बोलतात.

"ताई, तुम्ही काल संध्याकाळ पासून काही खाल्ल नाहीये, पाणी प्यायल नाहीये. तुम्ही काहीतरी खाऊन घ्या नाहीतर तुम्हाला त्रास होईल." नर्मदा देवकीला बोलते.

"माझा निर्णय अटळ आहे, जोपर्यंत अभी लग्नाला तयार होत नाही तोपर्यंत मी अन्नपाणी घेणार नाही." देवकी बोलते.

"ताई तुम्हीतरी सोडा हट्ट. एकीकडे तुम्ही हट्टाला लागल्या आणि दुसरीकडे अभी." नर्मदा बोलते.

घरातील सर्वांचे हे बोलणे चालूच असते तितक्यात अभिमन्यू तिथे येतो. अभिमन्यू आल्यावर नर्मदा त्याला नाष्टा करायला देते आणि बोलते, "अभी, काल संध्याकाळ पासून ताईंनी काही खाल्ल नाहीये की पाणी प्यायल नाहीये. त्या हट्ट सोडत नाहीये तू तरी हट्ट सोड."

अभिमन्यू अन्नाचा घास तसाच हातात ठेवतो आणि बोलतो, "आई तू का हट्ट करते?"

"मी एक दिवस हट्ट केला तर तुला त्रास होतेय, मग विचार कर गेल्या काही वर्षांपासून तुझ्या या हट्टाचा आम्हा सगळ्यांना किती त्रास होत असेल." देवकी बोलते.

"असे असेल तर ठीक मग, मीपण अन्नपाण्याचा त्याग करतो." असे तडकाफडकी बोलून अभिमन्यू घराच्या बाहेर जाण्यासाठी निघतो.

त्याचक्षणी देवकी उठून उभी राहते आणि बोलते "अभी" .... एवढा शब्द बोलून देवकी चक्कर खालि पडते. दिग्विजय लगेच देवकीला पकडतो. दिग्विजय आणि मालती देवकीला उचलून देवकीच्या खोलीत जेऊन घेऊन जातात. यशवंतराव डॉक्टरांना कॉल करून बोलवून घेतात.

मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हांला हा भाग कसा वाटला ते कमेंट्स मध्ये सांगा. लाईक करा, फॉलो करा आणि पुढे काय होईल? देवकी आणि अभिमन्यू यापैकी कोण आपला हट्ट सोडेल? अभिमन्यू आणि वैदहीचे लग्न होईल? काय वाटते तुम्हाला कमेंट्स मध्ये सांगा आणि कथा शेअर करा.

ही कथा पूर्णता काल्पनिक आहे त्याचा वास्तवाशी काही संबंध नाही आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

क्रमशः
0

🎭 Series Post

View all