दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026
"अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - ८"
डॉक्टरांनी देवकीला तपासले. तिच्या नाडीवर बोट ठेवून क्षणभर गंभीर झाले आणि मग शांतपणे बोलले, "यांना अशक्तपणा आला आहे, यांनी काही दगदग झाली आहे का?"
"त्यांनी काल संध्याकाळ पासून काही खाल्ले नाही आणि पाणी प्यायले नाही." नर्मदा डॉक्टरांना सांगते.
"मग चक्कर का नाही येणार?" तब्येतीकड लक्ष द्यायला हवं यांनी. त्यांना थोड्यावेळाने जाग आल्यावर त्यांना काही हलका आहार खायला आणि सोबत फळांचा ज्यूस द्या. बर वाटेल त्यांना." डॉक्टर बोलतात आणि मग निघतात.
डॉक्टर गेल्यावर नर्मदा अभिमन्यूला बोलते, "अभी तू तरी हट्ट सोड. आरे ताईंना काही झाले तर तुलाच जास्त त्रास होईल ऐक."
थोडा वेळ गेल्यानंतर देवकीला जाग येते. देवकीला जाग आल्यानंतर अभिमन्यू देवकीसाठी जेवायला घेऊन येतो.
देवकीला अभिमन्यू बोलतो, "आई, घे जेवून तू बोलशील ते करायला मी तयार आहे."
"गुणाच माझं पोरगं, अभी तुला वाटत असेल की मी तुला असं लग्नासाठी भाग पाडतेय पण एक लक्षात घे पोरा मी तेच करत आहे जे तुझ्या भल्याच." देवकी बोलते.
"आई, मी नाही खुश राहणार हे लग्न-बिग्न याने, मी एकटा आहे त्यातच खूश आहे." अभिमन्यू बोलतो.
"तुझा परत नाहीचा पाडा सुरू झाला का नाही, अरे एकदा भेट तर त्या मुलीला. प्रतापराव देसाई यांची मुलगी आहे, वैदही! खूप चांगली मुलगी आहे, यशवंतभाऊजी सांगत होते." देवकी बोलते.
देवकी आणि अभिमन्यू बोलणे झाल्यानंतर देवकी आबासाहेब आणि घरातील सदस्यांना सांगते की, "अभिमन्यू लग्नासाठी तयार झाला आहे." देवकीने घरात अभिमन्यूचा निर्णय सांगितल्यावर सगळ्यांना आनंद होतो.
इकडे वैदही आश्रमात मोर्चाची तयारी करत असते. परंतु मोर्चाची तयारी करत असताना तिच्या डोक्यात अभिमन्यूचा विचार चालू असतो.
"अभिमन्यू कसा असेल?"....
"सरस्वतीताई त्याच्यामध्ये स्वतःचा मुलगा बघतात म्हणजे तो चांगला असेल"....
"सरस्वतीताई त्याच्यामध्ये स्वतःचा मुलगा बघतात म्हणजे तो चांगला असेल"....
पण मग सरस्वतीताईंच्या म्हणण्यानुसार तो इतके दिवस त्यांच्यापासून का लांब राहिला. असा सगळा विचार वैदही करत असते.
अभिमन्यू बद्दल कोण माहित माहिती देईल याचा विचार वैदही करत असते. सरस्वतीताई इथे असत्या तर त्यांनी नक्कीच सांगितले असते असे वैदहिला वाटते. तितक्यात तिच्या लक्षात येते, या आश्रमातील पंढरी काका खूप वर्षापासून काम इथे काम करत आहे; त्यांना विचारले तर असे वैदहीच्या मनात येते. ती लगेच पंढरी काकांकडे जाते. पंढरी काका त्यांचे काम करत असतात.
"पंढरी काका कामात आहात, थोडे बोलायचे होते." वैदही बोलते.
"हा बोलना वैदही काय बोलायचे आहे." पंढरी काका बोलतात.
"काका तुम्ही खूप वर्षापासून आपल्या आश्रमासाठी काम करत आहात त्यामुळे तुम्हाला या आश्रमात कोणी कोणी काम केले आहे ते माहितच असेल." वैदही बोलते.
"हो, माहित आहे की, तुला कोणाची माहिती पाहिजे का?" पंढरी काका बोलतात.
"हो काका, मी सरस्वतीताईंकडून ऐकले होते की आपल्या आश्रमात आबासाहेब पाटलांचे मुलगा अभिमन्यू पाटील काम करायचे." वैदही बोलते.
"अभिमन्यू दादा होय, करत होते. तुम्हाला त्यांच्या बद्दल काही माहिती हवी का?" पंढरी काका बोलतात.
"हो काका, अभिमन्यू इथे काय काम करायचे? त्यांचा स्वभाव कसा होता? वागणं कसं होतं? मला हे जाणून घ्यायचं होत." वैदही बोलते.
"अभिमन्यू दादाबद्दल जर बोलत बसलो तर संपूर्ण दिवस संपेन तरी त्यांच्याबद्दल बोलणे व्हायचे नाही, असे होते अभिमन्यू दादा. कोणाच्याही मदतीला धावून जाणार, सगळ्यांबरोबर आपुलकीनं वागणारे, एकदम प्रामाणिक, खरे खोट्याची चिड असणारे, आजपर्यंत आपल्या आश्रमासाठी सरस्वतीताई नंतर कोणी सगळ्यात जास्त मेहनत घेतली असेल ते म्हणजे अभिमन्यू दादा होय. पण अचानक ते कुठे गेले कोणालाच माहीत नाही. पण वैदही तू हे का विचारतेस?" पंढरी काका बोलतात.
"काही नाही काका? असच विचारलं. काका तुम्हाला त्यांचा एखादा प्रसंग आठवतो का सांगण्यासारखा? वैदही विचारते.
"एक काय खूप आठवतात परंतु एक प्रसंग सांगतो. हा प्रसंग अभिमन्यू दादामधला खरेपणा सांगतो. काय झाले होते, काही वर्षांपूर्वी आपल्या आश्रमातील एका मुलीवर दिनकर जाधव यांच्या मुलाने अत्याचार केले.
दिनकर जाधव म्हणजे आबासाहेब पाटील यांच्याच पक्षातील त्यावेळेच राजकारणातील एक खूप मोठं नाव. दिनकर जाधव आपल्या आश्रमातील मुलीच्या प्रसंगात स्वतःच्या मुलाला वाचायला बघत होते. पण दिनकर जाधव यांना ते काही जमत नव्हते. कारण अभिमन्यू दादा त्या मुलीच्या बाजूने होते.
मग दिनकर जाधव यांनी आबासाहेब पाटील यांच्यावर दबाव टाकून अभिमन्यू दादांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु दादांनी आबासाहेबांना देखील जुमानल नाही आणि त्या मुलीला न्याय मिळून दिला. असे खूप प्रसंग आहे अभिमन्यू दादांचे." पंढरी काका बोलतात.
पंढरी काकांकडून अभिमन्यू बद्दल ऐकल्यावर त्याच्याबद्दल वैदहीच्या मनात नकळत आदर आला....
मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हांला हा भाग कसा वाटला ते कमेंट्स मध्ये सांगा. लाईक करा, फॉलो करा आणि पुढे काय होईल? अभिमन्यू बद्दल ऐकून वैदहीच्या मनात त्याच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर तयार होईल? वैदहिला अभिमन्यू बद्दल अजून काही माहिती भेटेल? काय वाटते तुम्हाला कमेंट्स मध्ये सांगा आणि कथा शेअर करा.
ही कथा पूर्णता काल्पनिक आहे त्याचा वास्तवाशी काही संबंध नाही आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा