Login

अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - ९

राजकीय फायद्यासाठी झालेलं लग्न, आणि लग्नानंतर उमलणारे प्रेम
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026

"अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - ९"

अभिमन्यू लग्नासाठी तयार झालेला असतो. त्यामुळे पाटलांच्या घरात उत्साहाचे वातावरण असते. इतके नाही...नाही... म्हणणारा अभिमन्यू लग्नाला अखेर तयार झाला होता.

यशवंतराव आबासाहेबांशी बोलल्यानंतर प्रतापरावांना कॉल करून बोलतात, "नमस्कार प्रतापराव, कधी भेटायचं मग आपण? पोरांचा बघण्याचा कार्यक्रम कधी करायचा?"

"नमस्कार यशवंतराव, कार्यक्रम तुम्ही बोलाल तेव्हा ठेवू!" प्रतापराव बोलतात.

"आमचं घरात बोलणं झालं आहे, जर तुम्हाला उद्या काही हरकत नसेल तर उद्या ठेवूया का?" यशवंतराव बोलतात.

"चालेल उद्या आम्हला, आम्हालाही उद्या काही हरकत नाहीये." प्रतापराव बोलतात.

"चालेल या उद्या सहपरिवार आमच्या इथे." यशवंतराव बोलतात.

"यशवंतराव पण बघण्याचा कार्यक्रम मुलीच्या घरी होतो त्यामुळे तुम्ही इकडे यायला हवं." प्रतापराव बोलतात.

"प्रतापराव आपल्यामध्ये कशाला एवढी औपचारिकता, आणि दादाची इच्छा आहे बघण्याचा कार्यक्रम आमच्या इथे व्हावा." यशवंतराव बोलतात.

"यशवंतराव येऊ मग आम्ही उद्या सकाळी आता स्वतः आबासाहेबांची इच्छा आहे म्हटल्यावर मी काय बोलणार. संपूर्ण जिल्ह्यात त्यांच्यासमोर कोण बोलत नाही तिथे मी काय बोलणार." प्रतापराव थट्टा करत बोलतात.

यशवंतराव आणि प्रतापराव यांचे फोनवर बोलणे झाल्यानंतर दिग्विजय अभिमन्यू कडे येऊन बोलतो, "खाली आत्ताच काकांचे आणि प्रतापरावांचे बोलण झालं आहे. उद्या बघण्याचा कार्यक्रम ठेवला आहे. उद्या येणार आहे प्रतापराव आपल्या इथे. तू खरंच लग्न करणार आहे? दिग्विजय विचारतो.

"दादा, खरं सांगू! तुला तू कोणाला सांगणार नाहीना?" अभिमन्यू बोलतो.

"सांग काय सांगायचं सांग मला. मी नाही सांगणार कोणाला." दिग्विजय बोलतो.

"दादा, मी त्या मुलीला भेटून मला लग्नाला नकार दे असे सांगणार आहे." अभिमन्यू बोलतो.

"अभी, तू तुझ्या मनाच ऐक, तुला जे वाटतंय तेच कर नाहीतर पुढे जाऊन तुलाच त्रास होईल." दिग्विजय बोलतो.

अभिमन्यू आणि दिग्विजय बोलणे झाल्यानंतर दिग्विजय जातो. इकडे आबासाहेब आणि यशवंतराव यांचे अभिमन्यू लग्नाविषयी चर्चा चालू असते.

"दादा, उद्या पाहुणे येतील पण अभिने त्याच्या आयुष्यातले वैदहिला जर सगळे खरे सांगितले तर ती लग्नाला तयार होईल का?" यशवंतराव बोलतात.

"मलाही तीच शंका वाटत आहे, आणि मला खात्री आहे अभी तिला सगळं खरं सांगेल." आबासाहेब बोलतात.

"दादा, आपल्याला काही तरी कराव लागलं जेणेकरून अभी वैदहिला सगळ खर सांगणार नाही." यशवंतराव बोलतात.

"बघू काय करायचं?" आबासाहेब बोलतात.

इकडे आश्रमात वैदेहीने मोर्चाची पूर्ण तयारी केलेली असते. मोर्चा दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर घेऊन जायचा होता. मोर्चात काय बोलायचे, काय घोषणा द्यायच्या याची रंगीत तालीम मोर्चासाठी जमलेल्या महिलांना वैदही देत होती. पण वैदहिला हे माहित नव्हते की उद्याच तिचा बघण्याचा कार्यक्रम ठरला आहे.

"पंढरी काका, मोर्चाची संपूर्ण तयारी झाली आहे. ताई इथे नसल्या तरी आपल्याला मोर्चा यशस्वी करायचा आहे." वैदही पंढरी काकांना बोलते.

"वैदही काळजी नको करू, मी आहे तुझ्या बरोबर आपण दोघे मिळून मोर्चाचे नीट नियोजन करू." पंढरी काका वैदहिला धीर देत बोलतात.

दिवसभर आश्रमात मोर्चाची आखणी करून वैदही रात्री घरी येते. घरी आल्यावर वैदही थोडा आराम करते. थोड्यावेळाने वैदही, शारदा आणि प्रतापराव जेवायला बसतात.

"आई - बाबा, उद्या माझ्या आयुष्यात खूप महत्वाचा दिवस आहे." मी खूप आतुर उद्याच्या दिवसाठी." वैदही खूप उत्साहाने बोलते. ( वैदही मोर्चासाठी बोलत असते )

"अरे बापरे इतके दिवस नाही...नाही म्हणत होतीस आणि आता किती उत्साह दिसतो हिच्या चेहऱ्यावर, शारदा तू सांगितले का वैदहिला?" प्रतापराव बोलतात. ( प्रतापरावांना वाटते वैदही बघण्याच्या कार्यक्रम बद्दल बोलते म्हणून तेही त्याच संदर्भात बोलतात.)

"नाही, मी काही नाही सांगितले. मला वाटले तुम्ही सांगितले असेल" शारदा प्रतापरावांना बोलते.

"वैदही तुला कोणी सांगितले." शारदा विचारते.

"कशाबद्दल आई?" वैदही विचारते.

"अगं हेच आपण उद्या पाटलांचे इथे जाणार आहोत. तुझा कांदेपोह्यांचा कार्यक्रम आहे." शारदा बोलते.

शारदा असे बोलल्यावर शारदा आणि प्रतापराव दोघेही हळूच हसतात आणि वैदेही जेवता जेवता ताडकन उठून उभी राहून बोलते "काय!"

"आई-बाबा तुम्ही मला हे अगोदर का नाही सांगितले." वैदही थोड नाराज होऊन बोलते.

"वैदही आज दुपारीच ठरलंय हे सगळे. तू बाहेर होती म्हणून मी तू घरी आल्यावर सांगणारच होते." शारदा बोलते.

"बाबा, उद्या आमचा मोर्चा आहे. ताई इथे नाही म्हटल्यावर मोर्चाची सगळी जबाबदारी माझ्यावर आहे. मी जर गेले नाहीतर मोर्चा होणार नाही." वैदही बोलते.

"म्हणजे तू मोर्चासाठी उत्साहित आहेस तर पण वैदही बेटा तू मला अगोदर सांगायला हवे होते की तुझा मोर्चा वैगरे काही आहे म्हणून, मी दुसरा कोणता दिवस सांगितला असता पाटलांना." प्रतापराव बोलतात.

"बाबा प्लीज त्यांना कॉल करून सांगना उद्या नाही जमणार." वैदही बोलते.

"वैदही ते आता शक्य नाहीये, आबासाहेब काय विचार करतील. अगोदर यांनीच भेटायचे ठरवले आता स्वतः कॅन्सल केले आणि पहिल्याच भेटीला असे मग पुढे कसे असेल. नाही आता काही होणार नाही. तू मोर्चा पुढे ढकल." प्रतापराव बोलतात.

"बाबा, मी खूप तयारी केली आहे. खूप साऱ्या महिलांना बोलवले आहे, पोलिसांकडून उद्याची परवानगी घेतली आहे. आबासाहेबांना एकदा कॉल करून बघा." वैदही विनंती करते.

"नाही वैदही असं करता नाही येणार. एवढंच होते तर तू मला अगोदर सांगायचे." प्रतापराव थोड्या वरच्या सुरात बोलतात.

प्रतापराव असे बोलल्यानंतर वैदही शारदाकडे बघते. शारदा वैदहीच्या नजरेला नजर देत नाही. वैदही रागात येऊन तिथून जाते.

मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हांला हा भाग कसा वाटला ते कमेंट्स मध्ये सांगा. लाईक करा, फॉलो करा आणि पुढे काय होईल? वैदही मोर्चाला जाईल की बघण्याच्या कार्यक्रमाला? अभिमन्यू वैदहिला त्याचा भूतकाळ सांगेल? काय वाटते तुम्हाला कमेंट्स मध्ये सांगा आणि कथा शेअर करा.

ही कथा पूर्णता काल्पनिक आहे त्याचा वास्तवाशी काही संबंध नाही आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

क्रमशः
0

🎭 Series Post

View all