Login

अलक-२९

एक मैं और एक तू

"आई, कितीवेळा सांगू नाही करायचं लग्न.” तो चिडत म्हणाला.

“एकदा असफल झालं म्हणून तू सतत त्याच गोष्टीचा विचार करणार का? सगळे तसे नसतात रे, एकदा विश्वास ठेव तिच्यावर, सुखांचा संसार पाहायचं तुझा, एकदा तुझ्या पिल्लांचा विचार कर ना सोन्या!” आई त्याला समजावत म्हणाली.

आज तो खूप सुखी होता त्याच्या संसारात.

“आई, तू म्हणालीस होतीस तशीच आहे ही जसं ते गाणं मला नेहमीच ऐकवायचीचं एक मैं और एक तू.” तो तिचा हात स्वतःच्या हातात घट्ट धरत भरलेल्या डोळ्यांनी आईच्या हार घातलेल्या फोटोकडे बघत कातर आवाजात म्हणाला.