रोज डे दिवशी तिने त्याला गुलाब देऊन तिचे त्याच्यावरचे प्रेम व्यक्त केले. त्याने ते हसण्यावरी नेलं. तिचे प्रेम त्याला कधी कळलंच नाही; परंतु ते गुलाब मात्र त्याने डायरीत ठेवले.
कित्येक दिवसांनी त्याने ती डायरी उघडता ते सुकलेलं फुलं दिसले. ते पाहून त्याला तिचे बोल आठवले,”ज्या दिवशी तुला खऱ्या प्रेमाची जाणीव होईल तेव्हा ते तुझ्यासोबत नसेल.”
©️ जयश्री शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा