उदास चेहरा करत तो घरी आला; काही केल्या त्याची उदासीनता कमी होईना. तेच तेच चक्र त्याच्या डोक्यात घुमत होतं.
“अहो, मी आहे ना, आता हसा पाहू.” तिचे ते प्रेमळ जादूमयी बोल त्याच्या कानी पडले आणि तिचे सुंदर जादूभरी हास्य त्याच्या डोळ्यांसमोर तरळले.
जादूची कांडी फिरवावी तशी त्याची उदासीनता चुटकी सरशी गायब होऊन ओठांवर गोड हसू उमटले, डोळे उघडून त्याने समोर तिच्या तसबिरीकडे पाहिले.
©️ जयश्री शिंदे