Login

अलक-३४

स्वप्नपूर्ती पूर्ण झाली हे सांगणारी अलक

"किती सुंदर व टुमदार घर आहे ना,” ती एका घराकडे बघत म्हटल्यावर त्याने एक नजर त्या घराकडे टाकत हुंकार भरला व तेथून ते दोघे निघून गेले.

काही दिवसांनी तो तिला तेथेच घेऊन आल्यावर ती त्याला म्हणाली, “अहो, हे तेच घर आहे ना; पण आपण इथे का आलोत?”

“हो, हे तेच आहे घर तुझे आणि माझे, आपल्या स्वप्नपूर्तीचे. ” तो हसत तिला जवळ घेत म्हणाला.