Login

अलक-३५

सुखाची व्याख्या सांगणारी अलक

एका हातातील ओंजळभर फुले हसत होती त्यामुळे नुकतीच देवाला वाहायला घेतलेली फुले उपहासात्मक म्हणाली,” तुम्हाला मान मिळाला नाही म्हणून दुःख वाटायला पाहिजे ना, मग तुम्ही हसत का आहात? ”

“कारण शेवटं त्याच्यासोबतच जाण्याचं भाग्य आम्हांला मिळतं आहे म्हणून. ” एका पार्थिवावर विसण्यासाठी जाणारी दुसऱ्या ओंजळीत फुले हसत म्हणाली.