Login

अलक-३६

फुलांच्या सुगंध खूप काही सांगून जातो हे सांगणारी अलक

वाऱ्याची झुळूक आपल्याकडे येताना पाहून बागेतील सारी फुले एक साथ गुणगुणली,”तू परतूनी येता.”

“क्या बात है! आज चक्क माझी वाट पाहत सर्वांनी एक साथ सलामी दिली,” ती झुळूक हसत म्हणाली.

“आम्ही कोमेजण्या आधी आमचा सुगंध सगळीकडे पसरवण्यासाठी तू आलीस म्हणून,” फुलांनी हसत उत्तर दिले.