Login

अलक-४२( वडाचे झाड)

वडाचे झाडाची कैफियत सांगणारी अलक
वर्षानुवर्षे ऊन, पावसाचे पाणी, वारा झेलणारे वडाचे आज मात्र दुःखी होऊन म्हणालं, ‘’ भरभक्कम फांद्या असलेलं, अनेक पशुपक्षांना निवारा देणारं माझं शरीर आज नाहिसं होणार, चलं मानवा चालवं करवत माझ्या अंगावर, तुझ्या स्वप्नातलं प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी.”

काही महिन्यांनी ते झाडं नाहिसं होऊन त्याच जागी भव्य दिव्य इमारत दिमाखात उभारण्यात आलं.

“वा रे! मानवा, अजब तुझी करणी.” आतमध्ये एका कुंडीत बोन्साय रूपातील वडाचं झाडं खिन्न हसत म्हणालं.