Login

अलक-८

आईची माया सांगणारे अलक

कुरूप आईचा तो नेहमीच तिरस्कार करायचा. तिच्या अंतिम संस्कारालाही तो गेला नाही.

आज मात्र आईचे ते पत्र वाचून तो धाय कोलमडून रडू लागला.

त्यात लिहिले होते,” डोळ्यांच्या रूपात नेहमीच मी तुझ्यात राहिले पण त्या डोळ्यांत मला माझ्यासाठी प्रेम कधीच दिसले नाही.”