Login

अलक१३

अलक
कालपर्यंत देवाच्या दर्शनाला आनंदाने येणारी ती. पण आज लोकांनी तिला देवळाच्या दारात सुध्दा प्रवेश करू दिला नाही. दगड मारून लोकांनी तिला हाकलून लावले. कारण एका रात्रीत तिच्या नावावर बलात्कारित स्त्रीचा कलंक लावल्या गेला.
पण या घटनेला तीच एकटीच जबाबदार नव्हती. सक्ती केलेले पुरूष मात्र दुरून मजा बघत होते. पण शिक्षा मात्र एकटीला. जेव्हा लोकांना खरे गुन्हेगार कोण? हे कळले तो पर्यंत बराच उशीर झाला होता. कारण तिने त्याच मंदिराच्या दारातच प्राण त्याग केला होता.

©®अश्विनी मिश्रीकोटकर

🎭 Series Post

View all