Login

अलक... शोध.... मोकळं आभाळ

2 Short Stories
*शोध*

आज सकाळपासून च वातावरण तापलेलं होतं. *तू घरीच तर असतेस* या नवऱ्याच्या वाक्यामुळे ती *मी कोण आहे* याचा शोध घेत होती. स्वतःच स्वतःला शोधत होती. शाळेतून परतलेल्या तिच्या लाडक्याने तिची ओढणी पकडली, तिला बिलागला आणि म्हणाला, " *तू जगातली सर्वात चांगली आई आहेस, तूझ्या शिकवणीमुळेच आज मला बेस्ट स्टुडन्ट चे बक्षीस मिळाले.* "


*मोकळं आभाळ*

वर्षानुवर्षे तिला फसवत आलेल्या तिच्या प्राणप्रिय सहचाऱ्याचे खरे रूप तिच्यासमोर आले. आजपर्यंत तिचे मन आणि कानाला जाणवणाऱ्या गोष्टी आज डोळ्यांनी दिसल्या होत्या. नैराश्य चे काळे ढग तिच्यासमोर दाटून आले. आयुष्य संपवीण्याचा निर्णय तिने घेतला. आत्महत्ये पूर्वी चिट्ठी लिहिण्यासाठी रॅक मधील डायरी ओढताच, त्याच्या सोबत असलेले तिच्या आवडत्या लेखकाचे पुस्तक खाली पडले. ती ते उचलण्यासाठी खाली वाकली, उघडले गेलेल्या त्या पानावर लिहिले होते, " *जलधार हो, नदीसारखे वाहत रहाणे म्हणजे जीवन* "

आणि क्षणातच तिच्या मनावर आलेले निराशेचे ढग दूर होऊन, तिच्या मनाचं आभाळ मोकळं झालं..


गितांजली सचिन
0