Login

अलक १५

अलक
"अग,पन्नास वर्षांचा संसार झाला. आता हे काय नवीन नाटक!"
"अहो, एकदा उघडून तर बघा. माझी शेवटची इच्छा समजा हवं तर!"
पण त्याने रागाने ते पाकीट भिरकावून लावले. तिला फार वाईट वाटले.
पण अचानक काही दिवसांतच तिने या जगाचा निरोप घेतला. नंतर त्याला ते पाकीट सापडले. तर त्यात होता एक मोठ्या रकमेचा चेक आणि एका कागदावर आयुष्यात अपूर्ण राहिलेल्या इच्छा़ लिहील्या होत्या.
तो कागद वाचताच आजपर्यंत आपण तिच्यासोबत कसे वागलो या चुकांची जाणीव झाली आणि पश्चात्तापाचे अश्रु घळाघळा वाहायला लागले.

©® अश्विनी मिश्रीकोटकर

🎭 Series Post

View all