Login

अलक १७

अलक
'कितीदा नव्याने तुला आठवावे
डोळ्यातले पाणी नव्याने वहावे'
गाण्याच्या ओळी आठवून त्याला त्रास होत होता. तिला असे बेडवर पाहून त्याचे डोळे पाणावले होते.
"अहो, नका ना रडू. माझं उरलेले काही
दिवस मला आनंदात आणि सुखात जगायचे आहे. "
"पण... आपली ...मुलगी तिचं काय? तिला आईच प्रेम कस देणार?"
"एकदा माझ्यातली आई तुम्ही होऊन बघा. मग कसं जमतंय ते."
त्याने हातात हात घेऊन तिला विश्वास दिला आणि काही क्षणातच तिने प्राण त्यागला.