Login

अलक१८

अलक

रात्रीचे नऊ वाजले होते. मुसळधार पाऊस सुरू होता आणि निर्मनुष्य रस्त्यावर ती एकटीच चालत होती. दूरवर कुठेतरी कुत्र्याचे विव्हळणे सुरू होते. मनात धाकधूक सुरू होती. घरी जाऊन त्याच्यासाठी ब्रेडचे भजे करायचे होते. पण सतत कोणीतरी तिचा पाठलाग करत आहे. असे तिला वाटत होते. कोण आहे हे बघण्यासाठी ती वळली तर तिच्या चेहऱ्यावर हसू आले. कारण तो तिचा विश्वास,आधार आणि प्रेमाचा वर्षाव करणारा होता.
©® अश्विनी मिश्रीकोटकर

🎭 Series Post

View all