अलक ( अती लघु कथा )
कथा तिची आणि त्याची.
कथा तिची आणि त्याची.
आज तिने त्याला लांबुन पाहिलं, आणि पाहताच क्षणी पाहतंच राहिली.
दोघांची ति भेटण्याची पहिलीच वेळ होती, लग्नासाठी विशाल ने निशा ला विचारलं होतं. पण आधी भेटु आणि मग पसंती कळवू असं मत निशा च होतं, आणि त्यावर ति तितकीच ठाम होती.
दोघांची ति भेटण्याची पहिलीच वेळ होती, लग्नासाठी विशाल ने निशा ला विचारलं होतं. पण आधी भेटु आणि मग पसंती कळवू असं मत निशा च होतं, आणि त्यावर ति तितकीच ठाम होती.
विशाल तिला हात मिळवण्यासाठी स्वतःहून पुढे आला, " हाय! मि विशाल.. " त्याने केलेला पुढे हात, तिला किती साथ देईल पुढे जाऊन हे तिला माहित नव्हतं.
विशाल चेहऱ्यावर स्मितहास्य ठेऊन बोलला.
विशाल चेहऱ्यावर स्मितहास्य ठेऊन बोलला.
तिने त्याला हात मिळवला, " मि निशा, नाईस अ मीट यु.. "
निशा बोलली.
निशा बोलली.
विशाल आणि निशा एका शांत ठिकाणी, एका बाकड्यावर बसले. बराच वेळ, ति दोघेही शांत होती. आजुबाजुची शांतता आणि सामोर असलेलं तलावाच पाणी त्या दोघांची एकमेकांसोबत बोलण्याची वाट पाहत होती.
शेवटी विशालने च पहिले बोलण्याचा पुढाकार घेतला, घसा एकदा साफ केला, " मग लग्नाचा काय विचार आहे तुझा..? "
एकदम लग्नाचा विचार..? असा प्रश्न ऐकुन निशा शॉक झाली, " काय..? आपण आता कुठे भेटलो, आणि भेटुन फक्त अर्धा तास झाला नाही तर तु लग्नाचा काय आहे विचार असं विचारतोयस..? " निशा जणुकाही तडकलीच होती त्याच्यावर..
" अगं मग काय, तु आल्या पासुन हाय शिवाय काहीच बोलली नाही शांत होती मग मीच न राहुन हा प्रश्न केला.. "विशाल बोलला.
ति पटकन हसली..
विशाल," अगं हसायला काय झालं..? " तिच्या चेहऱ्यावरील हास्य पाहुन विशाल जणु तिच्या प्रेमातच पडतो.
ति हसायची पटकन थांबली, तिच्या डोळ्यांतुन अश्रु ओघळून आले.
निशा, " पहिल्यांदा कोणी असा प्रश्न केला असेल बघ मला.. " निशा उदास होते.
विशाल, "ह्म्म्म.. का बरं..?"
विशाल तिच्या सामोरं खाली बसतो, " बरं सांग करशील माझ्याशी लग्न..? "
तिने हात पुढे केला, तिच्या डोळ्यांतुन ओघळणारे अश्रु खुप काही विशाल ला सांगुण जातात..