सुरांची मैफिल सजली होती. तालावर ठेका धरून ती बेफामपणे नृत्य करण्यात गुंग होऊन गेली. फक्त आज ती शेवटची उभी राहिली होती. कारण ज्या विश्वासावर तिने घर सोडले होते. त्यानेच तिचा विश्वासघात केला. परत जाण्याचे सर्व रस्ते बंद झाले होते. तिने झोपेच्या गोळ्या घेतल्या आणि तिच्या नृत्याचा शेवट मृत्यूच्या छायेत झाला.
©® आश्विनी मिश्रीकोटकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा