१०) अलवार अशा वळणावरती

.....
हो ते ही आहेच हे कसं विसरले मी"तीर्था तुम्हा सर्वांना माझी आठवण वेळोवेळी करून देईलचं पण...सदा हे नको विसरूसं की, यापुढे तूझ्यां शिवाय या जगात तीचं असं कुणीही नाही.त्यामूळे तीची आई आणि बाबा सुद्धा तूच असशील कारण आज नंतर ती तीचा आजूबाजूला सतत तूलाच बघेलं आणि तूलाच तीचं सर्वस्व मानेलं त्यामुळे तीची खूप काळजी घे"...तीच्यावर इतकं प्रेम कर की,ती कधीही माझ्या आठवणीत कोपरा धरून बसली नाही पाहिजे तूझं आणि तीच नातं हे आपल्या दोघांच्या नात्यां सारखचं  असायला हवं चूकली तर...कान पकड ओरड रागाव पण उद्या जाऊन तीला कोणत्याही कारणाने अंतर नको देऊसं"सीमाचा अदृश्य आवाजात सदाचा कानावर पडणारा शब्द न शब्द हलवा जाणवत होता.

वहिनी अग काय? बोलतोस तू माझ्या नजरे समोर त्या लहानग्यां नशिबाचा खेळ चाललायं ग....आणि ते माहित असताना मी" तिला अंतर कसा देईन हा विचार तरी कसा आला तूझ्यां मनात

सदा वाईट नको रे समजू पण मी" एक आई आहे मी" या जगात नसताना ती या जगात कशी निभावणारं आहे सर्व मी" याची काळजी करणं सहाजिकच आहे.

हो वहिनी कळतंय ग.... मला पण तुला माझ्यांवर विश्वास नाही का? ग....

सदा अरे तीर्था माझा जीव आहे आणि तूझ्या वर विश्वास आहे म्हणून, तर ....तीचा हात तूला पकडायला सांगतेयं ही झाली  आताची गोष्ट आता तू तीला अंतर देणारं नाहीच पण पुढे जाऊन सर्वच बदलेलं जेव्हा तूझं लग्न होईल मग हळूहळू तूझं कुटुंब तयार होईल मग मात्र तू तूझ्या संसारात गुरफटशील आणि कालांतराने माझी तीर्था आयुष्यांत एकटी पडेलं रे....

वहिनी तूझी काळजी समजू शकतो मी" पण असं काहीच होणारं नाही कारण  तूला माहित आहे, ना"हे पुर्ण घर बाबांनी
तीर्थाच्या नावावर केलंयं त्यामूळे उद्या माझं लग्न झालं तरी या घराची खरी मालकीन तीर्थाच असेल  माझ्या बायकोचा हुकूम ती नाही तर तीर्थाच्या हुकूम हा माझ्या बायकोला मानावा लागेल  हे तूझ्या पहिल्या भितीच उत्तर आहे वहिनी पटलं असेल तर तूझ्या दुसर्या भीतीचं उत्तर देऊन ती भीती पण घालवतो.

मला मुलं झाली आणि तीर्थावरच माझं प्रेम कमी होणार असेल तर मी "लग्न अशा मुलीशी करेल जी तीर्थाला आईचं प्रेम देऊ शकेलं तीच माझ्यांसाठी पहिलं आणि शेवटचं मुलं असेलं हा माझा शब्द आहे त्यामुळे वहिनी तू काळजी नको करून फक्त आपल्या तीर्थाच्या मागे तूझा आशिर्वाद अखंड राहू दे".... बाकी तीर्थात अगदी तूझेचं संस्कार उतरतीलं ही जबाबदारी माझी"

सदा तूझं बोलणं ऐकून माझ्या तीर्थाची होती नोव्हती ती काळजी सुद्धा मिटली.मला खात्री पटली की ,तीर्थाला प्रेमाची कमी कधीही भासू देणार नाहीस तू त्यामुळे तीला मी" नसण्यांच दु:ख ही होणार नाही.

अ ह वहिनी इथे तूझी काही तरी गफलत होतेयं तूला काय? वाटतं तू या जगातून गेलीस म्हणजे? तीर्थाला तीच्या आई बद्दल कधीच कळणार नाही. तर"असं कधीच होणार नाही.मी"तीच्या साठी ते सर्व करेन जे तू आाणि दादाने केलं असतं पण मी"तीच तुझ्या शी असलेलं नातं कधीही लपवून नाही ठेवणार एका वळणावर ती मोठी होईल स्वत:ला सावरून दु;ख पचवायला शिकेलं तेव्हा तीला तीची आई नक्की कशी होती हे मी"नक्की सांगेन"

बर्याचं वेळ वहिनी माझ्या शी अदृश्य होऊन बोलत होती म्हणजे? आजूबाजूला कुठे? दिसत नव्हती फक्त तूझ्या डोळ्यात मला तीच्या आनंदाची चमक दिसली आाणि तीचा आवाज माझ्या बोलण्यांच प्रतिउत्तर म्हणून कानावर पडायला लागला त्या रात्री वहिनी माझ्या शी बराच वेळ बोलत होती.त्या बोलण्यातही तीच्या नंतर तूझं काय ?होईल हीच काळजी होती.
तीला जाऊन काहीच तास झाला असेल अजूनही तीची राख थ़ंड झाली नसेल पण तीला फक्त तूझी काळजी होती आाणि तूला सावरणार्या माझ्या हातावर तीचा असणारा विश्वास म्हण किंवा मग माझ्या कडून तीची ही खूप मोठी अपेक्षा होती म्हणून दिवसभरात ती या घरातच घुटमळत होती.सदा आज भरभरून सीमा म्हणजे? तीर्थाचा आई विषयी बोलत होता तर "कधीही तीच्या कानावर न पडलेल्या गोष्टी ऐकुन तीर्था सुन्न झाली आणि न राहून अश्रूंचा एक थेंब तीच्या गालावरून ओघळला तसा सदा एकदम शांत झाला.

तीर्था माफ कर बाळा पण हे तूला सांगायचं नाही.असं वहिनीने मला बजावलं होतं पण तेव्हाही तीला मी" हेच म्हणालो होतो की, एक योग्य वेळ येईल तेव्हा मी" तीला सर्व सांगेन पण...ही ती वेळ नव्हती पण कदाचित त्या बाप्पाचा ही मनात असेल की, तूझ्या आई बद्दल तूला आजच कळावं म्हणून नकळतपणे विषय छेडला गेला आणि आज इतक्या वर्षानंतर तूझ्या समोर सत्य उघडकीस आलं.


🎭 Series Post

View all