११) अलवार अशा वळणावरती

....
मला माहित आहे मी "इतक्या वर्षांत तूझ्या आई बद्दल तूला सर्व सांगितलं यामूळे तूझा दु:खाची खपली निघाली असेल त्याच बरोबर ज्या सदा काकावर इतका विश्वास ठेवला त्यानेच तूझ्या पासून सर्व लपवून ठेवलं म्हणून खूप राग येत असेल़ माझा पण काय? करू ग.... तू तेव्हा त्या वयात होतीस ज्या वयात आईबाबाची खूप गरज असते लहान मुलांना त्याच वेळी मी"  तूझी आई या जगात नाही हे सांगून तूला ते पटणार नव्हतं त्यावर तूझे खूप प्रश्न निर्मान झाले असते आणि त्या प्रश्नाची उत्तर मला नसती देता आली.आणि त्यामुळे मला तूझ्यांशी अजून खोटं बोलावं लागलं असतं आणि माझ्या मनावरच्या ओझ्यांत अजून वाढ झाली असती.

पण खरं सांगू तीर्था खूप वर्षे हे ओझ मनात घेऊन जगत होतो, आज तूझ्याच आई बद्दल तूझ्या शी बोलताना मला मनातून खूप छान वाटतंय"इतकंच काय? तर आज होत नव्हतं ओझं ही कमी झालं माझ्या मनावरचं असं वाटतंयं काय? गरज नव्हती ते सर्व लपवायची आता ती मला खूप, मोठी चूक वाटतेयं ग....

सदा काका अरे "....चूक कसली रे...असं थोडीच आहे की, तूला माझ्या आई बद्दल मला कधी काही कळू द्यायचंच नव्हतं म्हणून नाही ना" आज न उद्या ते मला तू स्वत:हा सांगणार होतास पण,माझ्या बद्दल इतका हालवा आहेस की, ते सर्व सांगायला तूला तूझ्या मनाची तयारी करायला थोडा वेळ लागला बसं आणि इतक्या वर्षात तू माझ्यांशी आई बद्दल कधी बोलला नाहीस यातही कुठोतरी तू माझाचं विचार केला होतास हे मला कळतं नाही असं वाटलं का? तूला "....

सदा काका तसंही  काळजी कशाला करतोस तू कितीही माझ्या मनाचा विचार करून हे सर्व लपवलं असलंस तरी ते माझ्या पासून कधीही लपलेलं नाही माझे आईबाबा या जगात नाहीत ही गोष्ट मला आधीपासून माहित आहे.फक्त मला काहीच माहित नाही असचं वावरत राहिले मी"तूझ्या समोर"कारण मला जपण्यासाठी तूझी धडपड मी"लहान पणापासून बघत आले होते.

तीर्था काय? बोलतेस तू ते कसं, शक्य आहे मी" तूला ते कधीच सांगितलं नाही आणि मला जितकं माहित आहे त्यावरून तर...आपल्या पुर्ण घरात दादा वहिनीचा फोटोही कुठे? लावलेला नाही.सदा काका शंकेने बघत म्हणाला.त्यावर तीर्था मात्र हसली.आणि सदा जे समजायचं ते समजला,

म्हणजे? तीर्था  सरिता तूला काही बोलली का?सदा काकांनी मनातली शंका विचारली.

ही बाई तर सुखाने जगू देत नाही तीला तर...मी "याबाबत तूझ्या शी काहीच बोलायचं नाही हे बजावलं होत तरीही तीने तीला हवं तेच केलं. पुन्हा एकदा सदा काकांचा चिडका स्वर लागला.

वाटलं होतं तूला आईचं प्रेम मिळेल म्हणून लग्न केलं मी" तिच्याशी पण ...तसं काहीच झालं नाही.काय?माहित का? पण तीला तू या घरात सुरूवाती पासून खटकत होतीस.

त्यातं तीला मुलं बाळ झालं नाही मग तीचा तूझ्या वर असणारा राग वाढत गेला.मला मात्र मुलं झाली नाही याने  काही फरक नाही पडला कारण वहिनीने तूझी जबाबदारी माझ्या वर टाकली तेव्हाच माझं पहिलं आणि शेवटच मुलं तूच असशील असं वचन दिलं होतं मी" वहिनीला आणि त्यामूळे मी" तूझ्यातच माझं मुलं बघत राहीलो, प्रेम देत माझ्या निर्णयावर कायम ठाम राहिलो. पण...तीला ते नाही जमलं तीला आमचं स्वत:च मुलं हवं होतं.कदाचित मी" या गोष्टी कडे दुर्लक्ष करतोयं हे तीच्या एव्हाना लक्षात आलं असावं म्हणून हळूहळू तीची चिडचिड वाढताना दिसत होती या सर्वात ती तूला ही त्रास देताना विचार करत नोव्हती.

म्हणून मग विचार केला आमचं मुलं झालं तर ती त्या मुलांत रमेलं आणि मग मात्र तूझ्या वरचा राग थोडा कमी होईल म्हणून त्या विचारा सोबत तीच्या हाट्टापाई आम्ही डाॅक्टर तपासणी केली.पण कदाचित देवाने ही आपलं नातं स्विकारलं होतं म्हणून की, काय?पण डाॅक्टर तपासणी नंतर चे रीपोर्ट मनासारखे नाहीच आले त्यात ती कधीही आई होणार नाही असं कळलं. मलाही थोड वाईट वाटलं. याचा दोष कधी कधी मी" स्वत:लाच देत होतो तेव्हा ही आणि आताही कारण कुठेतरी माझ्या नकार घंट्टा मूळेच ती आईच्या सुखापासून वंचित राहिली कारण मी "या सर्वासाठी मनापासून कधी तयार नव्हतोच ना"

पण या सर्वात तूझ्या प्रती तीच्या मनात तिरस्कार वाढत गेला.

आणि म्हणून काकूला वाटायला लागलं की, माझा पायगूण चांगला नाही त्यामूळे माझे आईबाबा माझ्या सोबत नाही आणि फक्त माझ्या मूळचे ती आई या सुखापासून वचिंत आहे पुढच वाक्य तीर्था ने पुर्ण केलं.

🎭 Series Post

View all