१२) अलवार अशा वळणावरती

....
नाही ग... बाळा तूझ्यांमूळे काहीच झालेलं नाही.या बाबतीत तीने गैरसमज करून घेतला.तूझ्या मूळे तूझी आई गेलेली नाही. ती गेली तेव्हा तू एक वर्षाची होतीस आणि तीने जेव्हा शेवटचा श्वास घेतला तेव्हा सुद्धा तू तीच्या कुशीत होतीस,

राहिली ती आई न होणं तर ती तीला देवाने दिलेली शिक्षा समज ती नकळतपणे केव्हाच आई झाली होती जेव्हा ती या घरात लग्न करून आली होती. मनात आणलं असतं तर ती सर्व प्रेम तूझ्या वर लुटून ती तूझ्या कडून आईही बोलवून घेऊ शकली असती कुणीही तीच ते सुख ओरबडलं नसतं पण नाही तीच्या हाता तोंडाशी आलेला घास तीला नाही खाता आला.

कदाचित त्या गणरायाने तूझ्या रूपात तीच्या पदरात मुल टाकलं होतं पण ते तीने लाथाडलं आणि म्हणून देवाने तीला जन्माची अंदल घडवली.आणि राहिली ती निपुत्रिक पण मला मात्र खूप आनंद आहे की, मला तूझा बाप होण्यांच सौख्य लाभलं आणि मी" तूझ्या प्रेमात तेव्हा पासून आतापर्यंत अखंड भिजतोयं
शेवटच वाक्य सदा काका डोळ्यातून वाहाणारे अश्रू पुसत म्हणाला.

आई गेली हे तर मी"तूझ्या कडून ऐकलं पण माझे बाबा त्यांना  काय? झालं होतं. सदा काकांच्या तोंडून आई बद्दल ऐकता ऐकताच नकळत तिला बाबांची आठवण झाली.आणि न राहून तीने बरेच वर्षापासून मनात घोळणारा प्रश्न केलाचं"तसे सदा काकांचे अश्रू पुसणारे हात मध्येच थांबले.आणि त्यांनी तीर्थाकडे चमकून बघितलं.

सांग ना"सदा काका बाबांना काय? झालं होतं तीने सदा काकांचा हात घट्ट पकडत पुन्हा एकदा विचारलचं,

सांगतो आज सर्वच सांगतो सदा काकां तीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत म्हणाला.

तसा तीर्था ने पकडलेला सदा काकाचा हाताची पकड अजून घट्ट केली. तसे सदा काकां पुढे बोलू लागले.

आज न उद्या हे तूला सांगण खूप गरजेच होतंच तसंही या तूझ्या काकूंच्या तोंडात काही राहात नाही ती तूला त्रास व्हावा म्हणून ते सर्व सत्य चुकीच्या पद्धतीने तूझ्या समोर आणायला ही मागे पुढे बघणारा नाही त्यापेक्षा आज देवानेच योग घडवून आणलायं तर...पुर्ण सत्या वरून पडदा पाढायलाच हवा,

पण तीर्था या आधी मला एक वचन हवं मी"तूला जे काही सांगणार आहे त्याचा नंतर तू स्वत:ला  त्रास करून घेणार नाहीस ही माझी अट समज तूला सर्व सत्य जाणून घ्यायचं असेल तर....ही अट मान्य करावी लागेल.

कारण इतक्या वर्षांत मी"तूझ्या समोर ते येऊ नाही दिलं का? तर तूला त्रास होऊ नये"म्हणून दुसरी गोष्टी वहिनीची शेवटीची इच्छा सुद्धा हिचं होती की, तू कधीही तूझ्यां आईबांबाच्या आठवणीत कोपरा पकडू नये बाकी काहीच नाही पण तूझ्यां आईची शेवटच्या इच्छेचा तरी आपण मान ठेवायला हवा"

ठिक आहे काका? दिलं मी"तूला वचन या सर्व गोष्टींचा मी"स्वत:ला त्रास नाही करून घेणारं पण तू आता तरी मला सर्व खरं सांगशील अगदी काहीच न लपवता"

हो तीर्था या आधी तूला मी"जितकं सांगितलं ते आठवत असेल तर ....मी "तूझ्या बाबांचा ही उल्लेख केलायं,वहिनीच जाण त्याला धक्कादायक ठरलं.आणि त्यात त्याला मानसिक धक्का बसला.त्याचा वागण्यां बोलण्यावरून ते कळायला लागलं होतं यातून तो बाहेर निघेल की, नाही ही  शंका मनात घोळतच होती.

आपल्या वर दु:खांचा डोंगर कोसळला होता. पण यातून मलाचं मार्ग काढायचा होता तू अजूनही लहान होतीस त्यात दादा  तूझ्या पेक्षा ही लहान झाला होता. सतत माझी चूकी दाखवून माझ्या वर  चिडणारा दादा एकदम शांत झाला होता.तूझ्यां पेक्षा मला त्याचांवर लक्ष ठेवावं लागत होत.

दिवस सरकत होते पण दादाचा परिस्थितीत काहीच बदल जाणवत नव्हता त्या उलट त्याची तब्येत बिघडत चालली होती.खाण्यांपिण्यांकडे त्याचं मूळात लक्ष नव्हतं त्या अवस्थेत तो नव्हताचं म्हणा"

वहिनीला जाऊन बारा दिवस झाले तो एकाच जागी बसून होता.

वेळोवेळी मी" त्याला स्वत:हून अंथरूणापर्यत नेत होतो आणत होतो बस इतकीच काय? ती हालचाल ती ही सेल वरच्या खेळण्यां सारखी नाही तर दिवसभर बिचारा सेल संपलेलं खेळण, बनून वावरत होता.


🎭 Series Post

View all