१३) अलवार अशा वळणावरती

.....
काही दिवस असेच गेले वहिनीने उंबरठा काय? ओलांडला तर घरातल्या माणसांचं आयुष्य विस्कळीत झालं तर झालं पण पुर्ण वास्तुतून सुद्धा पुर्ण जीव निघून गेला होता.

लोक येत होती बसत होती तूझ्या बाळपणावर दया दाखवून जात होती.

हळूहळू माणसांची ये जा ही कमी झाली होती.आम्ही मात्र बेजान प्राण्यांसारखे वावरत होतो. तूझा तेवढा आवाज घरात होत होता.

वहिनीला जाऊन बारा दिवस झाले. तरीही दादा अजूनही त्याचं अवस्थेत होता ना"रडत होता ना"ओरडत होता कदाचित अजून त्याचा मेंदू स्वत:ला साथ देत नव्हता. घडल्या प्रकारांची त्याच्या मनाला  पुसटची चाहूल सुद्धा लागली नव्हती.

मला त्याची अवस्था बघवत नव्हती वहिनीच तेराव झालं की,मी"दादाला डाँक्टरांनकडे घेऊन जायचं मनोमन ठरवलं.

तेराव्यांची बरीच तयारी बाकी होती थोडी थोडी तयारी मी" करायला सुरूवात करण गरजेच होत कारण ती एक रात्र माझ्या जवळ होती मदतीचा असा दुसरा हात नव्हता बाहेरची लोक फक्त बघ्यांची भुमिका घेतात याचा अनुभव मी" वहिनीचा अंतिम संस्काराचा दिवशी घेतलाच होता त्यामुळे सर्व काही कुणावर अवलंबून न ठेवता माझचं मला करण गरजेच होतं.

तूला खाऊ पिऊ घालून माझ्या नजरे समोरचं अंथरुण करून झोपवलं जेनेकरून माझं तूझ्यांवर लक्ष राहिलं.

दादाला मात्र पकडून त्याचा रूम मध्ये घेऊन गेलो दिवसभर एकाच ठिकाणी बसून अवघडला होता बिचारा याची खात्री मला होतीच पण त्याला होणारा त्रास तो कुणाला सांगण्याचा मनस्थिती नव्हता त्यामुळे मला त्याचा प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवाव ही लागत होतं.मी त्याला रूम मध्ये नेऊन त्याचा जागेवर झोपवलं आणि रूम बाहेर पडणार की, मी झोपलेल्या जागेवरून दादा सरकत बेडच्या कडेला येऊन झोपला.वहिनीची नेहमीची जागा त्याने मोकळीच ठेवली.

म्हणजे? सदा काका बाबांनी आईला झोपायला जागा केली होती का? मध्येच तीर्था ने शंका विचारली.

हो तसचं काही तरी कारण वहिनी या जगात नाही हे त्याचा मनाने अजून स्विकारलेलं नव्हतं हे मला माहित होतं पण त्याची होणार्या हालचालीची कुणकुण मला जावताच मी"मागे ही बघितलं  पण त्याची होणारी हालचाल थांबली होती. म्हणून मग मी "त्याचा खोलीतून बाहेर आलो आणि त्याचा दरवाजा आवाज न करता बंद केला.

खाली आलो तूझ्या वर नजर टाकली तू शांतपणे झोपली होतीस, उद्यांचा  पूजेत लागणारं साहित्य एका बाजूला केलं. टेबल वगैरे सर्व आताच मांडून ठेवला.जमतेम सर्व तयारी करायला रात्रीचे आठ वाजले.

तेवढ्यात बाबांचा आवाज माझ्या कानावर पडला.

सदा अरे.... गुरूजीना फोन केलास का? बाबा माझ्या दिशेने येता येता म्हणाले आणि मी" डोक्यावर हात मारला कारण या सर्वात मी" त्याना बोलवायला विसरलो होतो.

काय? रे काय? झालं विसरलास की, काय? अरे पण ह्या पुजेसाठी गुरूजी तर...लागतात ना"तू आणि मी" करून नाही चालणार ही पुजा अरे.. देवा आता रे ...काय? करायचं आठ वाजले पुजा उद्या आहे आहे आता इतक्या कमी वेळात कुणी तयार होईल का? पुजा करायला. बाबांचं माझ्याकडे बघत पुटपुटणं सुरू होतं.

मला मात्र सुचायचं बंद झालं होतं कारण बाबां जे काही बोलले ते सर्व खरच होत मला खरच उशीर झाला होता.

बाबांची बडबड अजूनही माझ्या कानावर पडत होती. मी" तसाच मोबाईल घेतला गुरूजींना नंबर मोबाईल वर शोधला. आणि वेळ न दवडता फोन लावला.

मोबाईलची रिंग जात होती.थोड्याच वेळात रिंग वाजायची बंद झाली.आणि माझ्या कानात कुणाचा तरी आवाज घुमला.तसा माझा जीव जरा शांत झाला मात्र मी" न थांबता माझी अडचण सांगायला सुरूवात केली देवाच्या दयेने तेही मला नकार न देता ही पुजा करायला तयार झाले. आणि मी" मोबाईल ठेवला. तशी बाबांची ही बडबड थांबली कुठे? तरी त्याना ही वहिनीच जाण सहन झालं नाही हे त्याचा आजच्या वागण्यावरून मला जाणवलं अगदीच सैरभैर झाले होते.ते तसेच निघून गेले मी" सर्वत्र एक नजर फिरवली.आणि दादाचा विचार मनात आला. तसं मी" तुला उचलून घेत दादाचा रुम च्या दिशेने गेलो.

आवाज न करता दार लोटलं तर आतून मला दादाचा बोलण्यांचा आवाज आला.क्षणभर मला त्याचा आनंद झाला पण काही तरी आठवलं आाणि मी"मनातून घाबरलो. त्याचं अवस्थेत मी"काही विचार न करता दरवाजा लोटला.समोरच दृश्य बघून मला खूप मोठा धक्का बसला. कारण तूझा बाबा स्वत:शीच बोलताना माझ्या नजरेस पडला.

त्या रिकाम्या खोलीत त्याचा शिवाय कुणीही नव्हतं दादा बेडच्या एका टोकाला कुशीवर झोपला होता.त्याची नजर मात्र एकटक कुणाकडे तरी बघावं अशीच होती.म्हणून मी"दारातून थोड वाकून बघितलं.तर तो बेडच्या दुसर्या टोकाला जिथे वहिनीची नेहमीची जागा होती त्या दिशेकडे एकटक बघत काही तरी बडबडत होता.

मी "त्याचा या अवस्थेला बघून मनातून खूप घाबरलो.पण त्याचं  बोलणं ऐकण्यासाठी कान टवकारले. तर त्याचं बोलणं ऐकून  मला जबरदस्त धक्का बसला.आणि त्यामुळे माझा तोल गेला. तोल सावरण्यासाठी माझे हात धडपडले.आणि या सर्वात दरवाजाचा आवाज झाला. आवाजा सरशी दादाने माझ्या दिशेने असं काही बघितलं की, तूझ्या भोवती असलेल्या माझ्या हाताची पकड सुद्धा सैल झाली.ते दादाचा नजरेतून सुटलं नाही. तूला पडताना बघून दादा माझ्या दिशेने धावत आला.

सदा अरे.... काय? करतोस पडली असती ती लक्ष कुठे? आहे तूझं आणि हे रे.... काय? रात्र किती झालीयं आणि तू अजूनही तीर्था ला खांद्यावर घेऊन फिरतोयं"


🎭 Series Post

View all