१४) अलवार अशा वळणावरती

....
तसा मी अजूनचं  गडबडलो लक्ष मात्र दादाच्या चेहर्यावर होतं. लालबुंद झालेले डोळे त्यातून वाहाणार्या अश्रूचे ओघळ दादाच्या गालावर स्पष्ट दिसत होते.याचा अर्थ एक तर दादा वहिनीच्या आठवणीत खूप रडल्याच दिसत होतंच"...

मी" त्याचा चेहर्याकडे बघताच त्याने नजर हटवली आणि मागे जात बेडवर बसला.मी" मात्र तूला सावरलं तूझी झोप मोड होऊ नये  म्हणून तूझ्यां डोक्यावरून हळूवार हात फिरवला.आणि तसाच तूला घेऊन दादा जवळ गेलो.

दादा मी" त्याचा खांद्यावर हात ठेवत म्हणालो तशी त्याची चुलबूल जाणवली.अगदीच घाबरला होता.आता मात्र गोंधळण्याची वेळ माझी होती.काही वेळापूर्वी माझ्या शी खड्या आवाजात बोलणारा दादा भित्रा ससा कसा काय? होऊ शकतो काहीच कळत नव्हतं.त्याच थरधरणार शरीर शांत करण्याचा गडबडीत माझ्या मनात उडालेला गोंधळ मनातच राहिला.

काही वेळ गेला आणि दादाला झोप लागली तसा मी"पुन्हा तूला घेऊन रूम बाहेर आलो.माझ्या रूममध्ये येताच तूला बेडवर झोपवलं आणि मी "सुद्धा तूझ्या बाजूला आढवा झालो.झोपल्या झोपल्या माझ्या पासून काही अंतरावर असणार्या लाईटीचा बटणावर हात मारला तसा पुर्ण रूमभर अंधार पसरला.आणि मी" घट्ट डोळे मिटले पण झोप काही येत नव्हती.

काही वेळापूर्वी दादाचा रूम मधून कुणाशी तरी बोलण्याचा येणारा त्याचा आवाज माझ्या कानात अजूनही  घुमत होता.तर त्याच बरोबर काही क्षणातं बिथरलेली त्याची अवस्था डोळ्यांसमोर सतत ये जा....करत होती.

मी"मात्र अस्वस्थ होत इकडून तिकडून कुस बदलत पुन्हा पुन्हा घडला प्रकार आठवत होतो.

हो मी" ऐकलं दादा मगाशी बोलत होता त्याचं बोलण मी" अगदीच कान लावून ऐकलंय बोलण्यावरून तो वहिनीशीच बोलत होता.असचं वाटत होतं. पण, वहिनी तर...या जगात नाही.म्हणजे? दादा एकटाच बडबडत होता का? हो तसच होतं बघितले मी "त्याचे डोळे लालबुंद झाले होते रडत असावा पण" मग दादा जर असा बंद खोलीत बोलत राहातो मग दिवसभर तो असा जीव गेल्या सारखा का? वावरतो काहीच कळत नाही आताही तो माझ्यांशी किती रागात बोलत होता तीर्थाच्या काळजीने धावून आला पण मग काही क्षणांत त्याची जी काही अवस्था झाली ती नक्की काय?होती.नाही नाही आता वेळ घालवून नाही चालणार उद्यांचा दिवस वहिनीचं तरावं झालं की, आधी दादाला डाॅक्टर कडे घेऊन जातो.

मला माहित आहे.त्याला वहिनीच जाणं सहन झालेलं नाही. कदाचित त्याला मानसिक धक्का बसलायं पण काही करून मला त्याला यातून बाहेर काढायला हवं वहिनीचं त्याचा आयुष्यातून कायमचं निघून जाणं त्याला कळायला हवं "विचार करतच स्वत:शी पुटपुटत मी" माझे डोळे बंद केल.तेवढ्यात माझ्या डोळ्यांवर हलकीशी किरण पडली त्या किरणात इतक तेज होतं की, त्या प्रकाशाने माझे डोळे किलकिले झाले.मी" त्या किलकिल्या डोळ्यांची उघडझाप केली तसा त्या किरणातून माझ्या दिशेने पडणारं प्रकाशमय तेज थोड कमी होऊ लागलं.
त्या सरशी मी" माझे डोळे हळूहळू उघडण्याचा प्रयत्न करतच होतो की, ....

सदा ये सदा अरे... मी" आहे उठ मला तूझ्यांशी खूप महत्वाच़ बोलायचं आहे  अचानकपणे आलेल्या आवाजाने मी" दचकलो,आणि किलकिले झालेले डोळे पुर्णपणे उघडले. तर...अजूनही ती किरणे तशीच होती अगदी माझ्या आजूबाजूला सोनेरी छटा उमटली होती.मी" त्या प्रकाशाचा दिशेने माझी नजर एकटक करत बघण्याचा प्रयत्न केला तर...समोरच दृश्य बघून अंथरुणातून ताडकन उठून बसलो.

माझ्या अगदी समोर वहिनीची आत्मा उभी होती आणि तीच्या आजूबाजूला प्रकाशमय सोनेरी किरणे ही दिसत होती.काही क्षणांसाठी मला ती दिव्य शक्तीच भासली.

क्षणंभर मला बाबांचं लहानपणचं बोलण आठवलं एकदा गोष्ट सांगता सांगता त्यांनी हा मुद्दा सांगितला होता तो म्हणजे? असा की, आपल्याच व्यक्तीला देव आज्ञा झाली आणि त्याचा अंतिम संस्कार झाला तरी सुद्धा जोपर्यंत त्या व्यक्तीच क्रिया करम होत नाही तोपर्यंत ती व्यक्ती आपल्या घरात आपल्या आजूबाजूला वावरत असते अगदी तशीच वहिनी तीच्या आवाजाच्या रूपात आत्म्यांचा रूपात माझ्या आजूबाजूला त्या बारा दिवसांत वावरत
होती.कधी तूझ्या काळजीने तर ...कधी मला काही तरी सांगण्याचा उद्देशाने तर ....कधी मलाही सावरायचा उद्देशाने

त्या रात्री रात्रीचे दोन वाजले होते आणि अचानक वहिनीने मला आवाज दिला होता सुरुवातीला मी" थोडा घाबरलो होतो.पण हळूहळू स्वत:च, मन धिट करत अंथरुणावर बसून एकटक वहिनीकडे बघत होतो.

सदा "आज माझा शेवटचा दिवस आहे. उद्या नंतर कदाचित तूझ्यांशी मला बोलता नाही येणार म्हणून म्हटलं आज बोलावं तूला माहित आहे सदा अंतिम संस्कारा नंतर ही मी" आपल्या घरात वावरतेयं खूप शांत शांत वाटतं हे घर "मी आत्मा असूनही ही शांतता मला नकोशी झालीयं माझ्या जाण्यांने  सर्वाची जी काही अवस्था झालीयं ती मला बघवत नाही. या सर्वात तूझा मात्र खूप गोंधळ उडतोयं.

🎭 Series Post

View all