१६) अलवार अशा वळणावरती

.....
हो वहिनी ठरवलंय मी"काही तरी उद्यांच घेऊन जाणार आहे  दादाला डाँक्टरांकडे मला नाही माहित या सर्वातून तो किती टक्के बरा होईल की, होणार नाही पण मला असचं वाटतंय की, दादाचा बाबतीत मी" यापुढे डाँक्टरांचा सल्ल्याने जावं,

ठिक आहे जे काही ठरवलंस त्यात मी"तूझी मदत करू शकले असते तर...त्यापेक्षा कोणताही आनंद नसता पण खूप दु:ख वाटतंय की, मी" तूझ्या या खडतर प्रवासात तुझी काहीच मदत नाही करू शकत पण ....तूझ्या मनात माझ्या प्रती जी काही भिती निर्मान झालीयं ती काढून टाक मी" या बारा दिवसांत जे काही केलं ते फक्त तूझ्या दादाला थोडा का? असेना पण आनंद देण्यासाठी "पण त्या सर्वानी त्याची अवस्था अजूनच बिथरतेय हे काही माझ्या लक्षांत नाही आलं किंबहुना तसं काही होईल याचा विचार ही नाही आला मनात मी" मात्र प्रेम आणि काळजी पोटी सर्व काही निस्वार्थ मनाने करत राहिले. रे.... सदा"
काळजी घे"माझ्या तीर्थाची जाते मी" शेवटच वाक्य वहिनी म्हणाली आणि सोनेरी छटा हळूहळू कमी झाली.आणि वहिनीची आत्मा काही क्षणांत दिसेनाशी झाली. मी"मात्र केसातून हात फिरवला आाणि भिंतीवरच्या घड्यांळात बघितलं पहाटेचे चार वाजले होते.आता मात्र रात्रभराची झोप माझ्या डोळ्यात उतरली होती.खूपच झोप येत होती.पण "आज वहिनीच तेराव होत उरली सुरली तयारी मलाच बघायची होती.म्हणून मी  तुझ्या कडे एक नजर बघितलं आणि तू माझ्या नकळत खाली पडू नये म्हणून तूझ्यां बाजूला उश्या लावल्या आणि फ्रेश होण्यासाठी गेलो.

काही वेळ गेला मी" फ्रेश झालो आणि तूझ्या रडण्यांचा आवाज आला मी "तूझ्या दिशेने बघितलं तूला जाग आली होती.तू जोर जोरात रडत होतीस कदाचित तूला भूक लागली असावी.असा विचार करत मी" तूझ्या दिशेने गेलो तूला उचलणार होतोच की,तू खुदूखुदू हसत आनंदाने हात पाय मारताना दिसलीस मला मात्र या गोष्टीच अश्चर्य वाटलं

तूझं बूर्र बूर्र असा आवाज तोंडाने काढण चालूच होतं त्याच बरोबर तूझ्या तोंडातील लाल सुद्धा बाहेर पडत होती.त्यात मला दुधांसारखच काही तरी जाणवलं.

म्हणजे? काय? सदा काका? आई मला दुध पाजून शांत करून गेली असं म्हणायचं आहे का? तूला तीर्थाने पुन्हा एकदा शंका विचारली.

हो, तसचं झालं होत  त्या रूम मध्ये आपल्या दोघांशीवाय कुणीही नव्हतं कदाचित वहिनी त्यावेळस घरात वावरत असेलं.अजूनही तीचा शेवटचा दिवस बाकी होताच ना"तूला रडताना तीला बघवलं  नसेल शेवटी ती तूझी आई होती तीला तूला भूक लागलीय हे समजण तितकं ही कठिण नव्हतंच,दुध पाजून तीने तूझी भूक मिटवली  होती.

बापरे सदा काका हे किती हाँरेबल आहे ऐकून अंगावर शहारा आलायं.आणि तू म्हणतोस की, हे सर्व माझ्यासोबत घडलंयं मी" कुणाला सांगितलं तर कुणीही विश्वास नाही करणार की हे प्रत्येक्षात माझ्या सोबत घडलंयं म्हणून इतकं कथामय आहे हे सर्व"


🎭 Series Post

View all