१७) अलवार अशा वळणावरती

....
हो कथानक तर आहे ग... पण सत्यही आहेच "मग मात्र मी" तुला उचललं आणि खोलीच्या बाहेर आलो.उरली सुरली सर्व काम करायला घेतली.

तेवढ्यात बाबा आले त्याचा डोळ्यांत पाणी तरळलं हे माझ्या नजरेतून सुटलं नाही पण मी" त्या कडे दुर्लक्ष करत माझ्या हातातलं काम संपवण्यात मग्न होतो.तेवढ्यात माझ्या डोक्यावर कुणीतरी हात ठेवला.असं जाणवलं आणि मी" वर बघितलं बाबा भरल्या डोळ्यांने माझ्या कडे बघत होते.

बाबा आहो काय? झालं तूमच्या डोळ्यात पाणी न राहून मी" विचारलं.

सदा ".... अरे... आपली सीमा गेली पण घराचं अगदीच वाळवंट झालं त्या पोरीचे आईविना हाल बघवत नाही.आणि तीचा बाप त्याचावर एका मुलीची जबाबदारी आहे हेच विसरलायं त्यात मला म्हातार्याला मेलं काही जमत नाही त्यामुळे तूझी मात्र एकट्यांची दमछाक होतेयं आज रात्र भर झोपला नसशील त्यात सीमा गेल्या पासून माझी ही खूप चिडचिड होतेय त्याचा सर्व राग तूझ्या वर निघतोयं .

मला माहित आहे तूझं आणि तीच नांत आई मुलां सारख होतं राज पेक्षा हक्कांने एखादी गोष्ट ती तूला सांगत होती.तीचा हात तूझ्या डोक्यांवर लहानपणापासून फिरला आणि तू तीला आई मानून बसलांस त्यानंतर मात्र तीने कधीही तूला आईची कमी भासू नाही दिली. तूलाही तीच्या जाण्याचा तितकाच
त्रास झाला असेल पण तूला तो व्यक्त करायलाही वेळ नाही. कारण तूला आम्हाला दु;खातून सावरावं लागतंय अगदी स्वत:च दु:ख बाजूला सारून"....

सर्व कळतंय पण काय? करू मन मानतचं नाही की, सीमा आपल्याला सोडून गेलीयं सुन होती रे.... ती या घरची पण वावरताना मात्र घरच्या मुली सारखी वावरली त्यामूळे मी" ही तीला सुन कधी मानलंच नाही.

तूझ्या आईला मुली खूप आवडायचा तूला माहित आहे राज जेव्हा तीच्या पोटात होता तेव्हा ती नेहमी एकच म्हणांयची जग इकडचं तिकडे झालं तरी चालेलं पण मला मुलगीच हवी"पण त्यावेळेस तीचा हिरमोड झाला कारण पहिला मुलगा जन्मांला आला होता.

पुर्ण एक दिवस रूसली होती का? तर तीला मुलगी झाली नाही म्हणून,राजला तर ढुंकूनही बघत नव्हती. माझी मात्र पंचायत झाली होती या सर्वात राजला अंगावरच दुध ही पाजायला तयार होत नव्हती.

त्यावेळेस तिला कसं बसं समजवल म्हटलं आता नाही झाली तर...दुसर्या वेळीस होईल पण आता देवाने तूझ्या पदरात जे...फुलं घातलंय ते असं उपाशी  ठेवणारं आहेस का?एक दिवस झाला ते पोरं आईच्या दुधासांठी तरसतंय आणि तू आहेस की, हट्टला पेटलीस.असं बोलता बोलता ती थोडी का? असेना राज साठी भावूक झाली आणि त्याला लगेच शातीशी  कवंटाळलं मला मनातून खूप बरं वाटलं.

चला सर्व ठिक झालं मनातच मी"बोलत होतो की,पुन्हा तीचा आवाज कानावर पडला.

उपाशी नको ठेवायला म्हणालांस ते पटलं मला म्हणून घेतलंय मी" जवळ पण पुढच्या वेळेस मला मुलगीच हवी सांगून ठेवते मला अगदीच बजावून सांगितलं. पण दुसरीकडे राजला  दुधाजवळ घेत त्याचावर प्रेमच प्रेम लुटत होती.

मी"मात्र त्या दोघांकडे बघून मनात हसत होतो. कुठे? तरी तीला खूप वाईट वाटलं असणार की, पुर्ण एक दिवस तीने तीच्या बाळांला प्रेमा पासून दूर ठेवलं ज्या प्रेमावर त्याचा हक्क होता.
आणि म्हणून ती मला काही वेगळं बोलंत असली तरी मनात ती
स्वत;ला कोसत असणारं हे माझ्यां शिवाय अजून कोण? ओळखणारं पण ओळखून सुद्धा मी" ते तीला दाखवलं नाही.

मात्र त्या दिवसांपासून ती त्याचावर भरभरून प्रेम करण्यां इतकी रमली जोपर्यंत तीची दुसरी वेळ येत नाही.

अखेर तो दिवस आला ज्या दिवशी तीला कळलं की, ती पुन्हा आई होणार अजुनही राजवर तितकचं प्रेम होतं पण डोक्यांतून मुलीचं वेड काही गेलं नव्हतं.

पुन्हा नऊ महिने तेच मला मुलगी हवी आता तरी मुलगी होईलं ना "रे....

मी "काही देव नव्हतो त्यामूळे मी" हो...हो ....मुलगीच होणार इतकंच बोलून दिलांसा देत राहिलो.आणि तो दिवस उगवला.

आणि माझा जन्म झाला.आई खूप चिडली असणारं आई पुढचं
वाक्य सदाने पुर्ण केलं.

हो,ना ....

काय? हो, ना ....बाबा आई माझ्या वर नाही तर....तूमच्या वर चिडली असणारं कारण ती मुलगी होईलं ना" हे किती विश्वासांने विचारायची तूम्हांला पण तुम्ही तीला दोन्ही वेळेस खोटंच सांगितलं म्हणून चिडली असणारं.

हो म्हणजे? चिडली होती ते फक्त चेहर्यावर दिसत होतं पण याची झळ तूला नाही पोहचू दिली तीने  म्हणजे? जे राज सोबत केलं तसं तूझ्या सोबत नाही केलं तीने याच मलाच अश्चर्य वाटलं म्हणून एक दिवस मी "तीला त्याबद्दल विचारलंही.

नंदा मी"काय? म्हणतो या ही वेळेस तूला मुलगी नाही झाली. वाईट वाटलं असेलं ना "तूला "त्यावर तीच उत्तर काय? असेलं सांग,

काय? बाबा

अरे.... तीच उत्तर ऐकून मीच चक्रावलो  म्हणजे? आताची नंदा आणि राजच्या वेळेची नंदा काही वेगळीच होती.

म्हणाली मुलगी नाही झाली म्हणून का? वाईट वाटून घेणार आहे मी"तुम्ही नेहमी म्हणता तसं आता नाही झाली तर....दुसर्या वेळेस होईल.समजलं मी"का? चक्रावलो दुसर्या दुसर्या वेळेस बोलून तिसरी वेळ येण्याची वाट बघायला सांगत होती.माझा चेहरा कदाचित बघण्यांसारखा झाला होता असंच वाटलं जेव्हा ती माझा चेहरा बघून  जोर जोराने हसली.

अरे काय? झालं किती घाबरतोस चेहरा बघितलासं का? कसा झालायं,

अग नंदा मुलीची वाट बघता बघता दोन वेळा मुलचं झाली आणि तू आहेस की,पुन्हा एकदा तेच बोलतेस मग घाबरणारं नाही तर काय? ग....

अरे... मी" गमंत करत होते तू खरंच समजलासं की, काय?मान्य आहे राजचा जन्म झाला तेव्हा मी"चुकीचं वागले पण तीच चूक मी"आता नाही करणार आणि मुली नाही झाल्या ह्याचं दु;ख का? करायचं नाही हा आजिबात दु;ख वगैरे नाही झालंयं मला मी" तर आत दुप्पट खुश आहे. असचं म्हणं"...

तूला मीहित आहे का?आता मला मुलगी झाली असती तर ...ती एकच असती हो ना,मग मी "अजून थोडी वाट बघितली तर...एकदम दोन मुली असतीलं आहेस कुठे? तीच बोलणं मला काही समजलं नाही.माझा मनात उडालेला गोंधळ मात्र तोंडातून बाहेर येऊ पहात होता.हे तीलाही कळून चुकलं.

इतका रे ....काय? गोंधळतोस काय? विचार करतोस मनात ते थांबव आधी तसलं काहीच म्हणांयच नाही मला"पण हे नक्की काही वर्षे थांबून मी"अजून वाट बघितली तर ....नक्कीच माझा फायदा आहे हे अगदीच खरं बोलतेयं मी"

नंदा अग काय? बोलत आहेस कसला फायदा आणि तो कसा कोणत्या? दोन मुली येणार आहेत मला तूझ्यां बोलण्यांचा अर्थ लागतच नाही आणि तू आहेस की,इतकं फिरवून फिरवून का? बोलतेस सरळ काय? ते सांग ना, मी गोंधळतच म्हणालो.

अरे.... असं काय? करतोस जरा विचार कर ना"आपल्या ला दोन मुलं आहेत कमी आहे ती मुलींनची आपल्या मुलांचा बायका येतील की, अजून काही वर्षे थांबलो तर....माझं तर बाई कधीच ठरलंय त्याना मी" सून कधीच नाही मानणार त्या माझ्या मुली असतील"

त्या दिवशी खूप खूश होऊन बोलत होती तूमच्या बायकांन विषय ज्या की, अजून जन्मालाही आल्या नसतीलं पण तीने तीच तीच त्याचाशी असलेलं नातं ठरवलं सुद्धा"

अरे.... व्हा हे बरचं आहे तूझं सर्व ठरलंय म्हणायचं म्हणजे? काही वर्षाने मी"बापडा एकदम एकटा पडणार नाही म्हणजे?तू मुलांच्या बालकांवर प्रेम करणारं मग तर ती मुलंही तूझ्याच टीम मध्ये "पापरे विचार करून भिंती वाटतंय माझं कसं होणार,

असेचं दिवस जात होते तूम्ही लहानांचे मोठे झाले तीचं दुसरं स्वप्न पूर्ण होण्यांची वेळ आली.पण नीयतीने घाला घातला.तुमच्या आईला आजारांने वेढा घातला आणि त्यातचं तीने शेवटचा श्वास घेतला.

अखेर माझ्या नंदाचं मुलींच स्वप्न स्वप्नच राहिलं.त्या दिवशी मी"तीचं स्वप्न पूर्ण करायचं ठरवलं.

एका वर्षाचा आत राजचं लग्न करावं लागलं कारण नंतर तीन वर्षे ते करता येणार नव्हतं घराला घरपण तसचं टिकावं म्हणून घरची लक्ष्मी घरात असायला  हवी या दोन कारणाने राजचं लग्न केलं.


🎭 Series Post

View all