२१) अलवार अशा वळणावरती

.....
हे मला तेव्हा समजलं जेव्हा दादा किंचाळून उठला. काय? झालं असेल मला काही कळे ना,पण सतत वहिनीच्या नावाचा जप करत तो त्याची नजर सैरभैर फिरवत होता.मी "त्याला शांत करायला त्याचा दिशेने धावलो.

सीमा शेवटी गेलीस मला सोडून का? ग... तू म्हणाली होतीस तूला टाकून नाही जाणार मग कशी गेलीस मला काही न सांगता कशी हिंमत झाली तूझी जाण्यांची,का? फसवलं मला आता मी" वेडा होणार मला माहित आहे आता मी"वेडा होणार मग मी" रस्त्यावर चालणार्या लोकांचा दगड मारणार मग ते मला
वेड्यांचा हाँस्पिटलमध्ये नेणार मग काही दिवसांनी मी "ही तूझ्या जवळच असेन मला नाही राहायच़ इथे,असचं काही तरी दादा बडबडत होता.

जसा मी "त्याचा जवळ येताना त्याचा नजरेस पडलो तसा तो बसल्या जागेवरून मागे मागे सरकण्याचा प्रयत्न करत बेड वरची बेडशीट हाताने गोळा करत मुठ्ठीत घट्ट कवटाळत होता. त्याचं बरोबर त्याची घाबरलेली नजर चित्रविचित्र हावभाव करत
एकटक माझ्यावर खिळली.

तू तू कोण? आहेस इथे काय? करतोस हाँस्पिटल मधून आलायसं का? मला मला वेड्याचा हाँस्पिटल मध्ये नाही जायचं मी "इथे कसा  आलो हे घर कुणाचं आहे मी" जातो मला सीमाला शोधायला हवं किती वेळ झाला ती सापडत नाही. त्यामुळे मी "चूकून आलो असेन इथे मी"काही वेडा वगैरे नाही आहे. पुन्हा अगदी सैरभैर होत तो स्वत:ची सुटका करायचा प्रयत्न करत होता.

त्याची अवस्था बघून मला डाँक्टरांच काही क्षणापुर्वीच
बोलणं आठवलं. दादाची खूप वाईट अवस्था होताना मी"माझ्या डोळ्यांने बघत होतो. तो पुरता घाबरला त्यामूळे घामाने
भिजला ही होता.त्याचं पुर्ण अंग भितीने थरथर कापत होतं. त्याची अवस्था बघता तो शांत होईल की,नाही ही शंकाच होती. तरीही सर्व आवाक्या बाहेर जाण्यापूर्वीच त्याला शांत करणं ही गरजेचं होतं काय? कराव सुचत नव्हतं पुन्हा खोटेपणाचा आधार घेणं हाच पर्याय सुचला.आणि मी" नाईलाजाने सीमा वहिनीचं नाव घेतलं. माझ्या तोंडून सीमा वहिनीच नाव येताच दादाने त्याचे कान टवकारले आणि क्षणांत त्याचं थरथरणारं शरीरही शांत झालं.

सीमा कुठे?कुठे? आहे सीमा तू तू ओळखतोस का? माझ्या सीमाला सांग ना, पण सीमा इथे कशी आली हा मी" जसा तीला शोधत शोधत इथे आलो तशी ती सुद्धा आली असेल मला शोधत अरे ...तू असा बघत काय? उभा आहेस बरं सांग ना,माझी सीमा कुठे? आहे ते,.... थरथरणार्या ओठांची हालचाल झाली. बोलता बोलता मध्येच कधी तरी दादा माझ्या जवळ येत मला हाताने हलवत अगदी लहान मुलांसारखा हतबल होऊन विचारत होता.

दादा तू तू शांत हो बघू वहिनी आहे रे... इथेच, दादा शांत  व्हावा म्हणून मी"बोलायला सुरुवात केली.

कुठे? आहे समोर का? येत नाही आहे ती,....

दादा अरे.... मी" म्हणालो ना, इथेच आहे म्हणून मग मग तू शांत हो बरं म्हणताचं तो थोडा शांत झाला .

हे काय?नवीन चालू केलसं बरं याने लहान मुलांसारखं त्याचापेक्षा तीर्था  लहान असून ही किती समजदार आहे.
हे वाक्य मी" नकळतपणे स्वत:शीच पुटपुटलो.

हो तीर्था आताही कधी मला दादाची आठवण आली ना"तर...
मला त्याची त्यावेळची अवस्था आठवते जशी तू, तूझ्या लहान पणी होचीस,

त्यानंतर ही वहिनीच्या नावाने कसं बसं दादाला शांत केलं माहित नाही पण...नंतर तो एकदमच शांत झाला.मी" मात्र बोलता बोलता त्याचाकडे बघितलं तेव्हा कळलं कि, तो झोपी गेला होता.मी" मात्र पुन्हा त्याला नीट झोपवून खोलीच्या बाहेर आलो.

कार्य झालं आणि दादाला सावरता सावरता दिवसही कधीतरी संपला. या सर्वात बाबाचा औषध पाण्याकडे दुर्लक्ष झालं.
वहिनीने जेव्हा घराचा डोलांरा उचलला होता.तेव्हा बाबाच्या औषध पाण्यांची जबाबदारी तीनेच घेतली होती पण वहिनी आजारी पडली.आणि होत्याचं नव्हतं झालं.त्यांचा कडे तीच कायम स्वरूपी दुर्लक्ष झालं.

दादाला त्याचाकडे लक्ष देता आलंच नाही कारण वहिनीचा आजारपणात कुठे?तरी त्याचा डोक्यांने काम करणंच सोडून दिलं होतं. त्याचं वावरण फक्त वहिनी पुरत राहिलं तो आमच्या वाटेला कमी येऊ लागला.आमच सोड पण तूला गरज असूनही तो तूझ्या वाटेला ही कधी आला नाही.मग मात्र तूझी आणि बाबाची जबाबदारी सर्व काही माझ्या वर नकळत येऊन पडली.

पण ते बारा दिवस माझे इतके अडचणीचे होते की प्रत्येक अडचणीत मला एकट्यांला तोड द्यावं लागत होत त्यातचं  बाबांची औषध पाणी ते स्वत:च घेत होते काय? माहित पण घेत होते की, विसरत होते यातलं तेव्हा मला काही माहित ही नव्हतं.आणि मी"विचारायची तसदी ही घेतली नाही.

आज कसं जवळपास सर्वच माझ्या मागची काम संपली होती. म्हणून बरोबर बारा दिवसांनी मला बाबांची काळजी वाटली. आणि मी "तूला तसाच घेऊन गेलो बाबाचा रूम मध्ये,बाबांन कडून तशी काम होत नसली तरी वयोमानानुसार त्यांचेही हे दिवस दगदगीतच गेल्यामूळे ते जरा लवकरच अंथरूणात झोपी गेले होते.तसा मी पुन्हा खोली बाहेर जाण्यासाठी निघालो.तसं माझं लक्ष समोर च्या टेबलावर गेल तर पाण्यांने भरलेला तांब्या आणि रात्री झोपण्यापूर्वी घ्याव्या लागणाऱ्या गोळ्या तश्यांच टेबल वर होत्या.

भौवतेक विसरले असावेतलपण मी" मात्र डोक्यावर हात मारला.

आज या गोळ्या न घेताच झोपलेत बाबा म्हणजे? मग बारा दिवस गोळ्या घेतल्या की, नाही हा एक विचार न कळत माझ्या डोक्यात आला मी "तसाचं पुन्हा त्याचा जवळ गेलो हळूचं आवाज देत उठवलं.

बाबा  ".... बाबा"....आहो तूम्ही रात्रीच्या गोळ्या घेतल्या नाही उठा बघू आणि आधी त्या घ्या म्हणताचं ते अंथरूणात उठून बसले मी" त्याचा हातात त्या गोळ्या देऊ केल्या.आणि मग पाण्याचा ग्लास त्याचा हातात  दिला.तशा यांनी गोळ्या घेतल्या आणि काय़?माहित पण माझ्या कडे बघून गोड हसले.तसा मी" त्याचा समोर बसलो.

बाबा मला माफ करा वहिनीच्या जाण्यांने आपल्या आयुष्यात इतकी उलथापाळथ झाली की ,मला तुमच्या खाण्यांपिण्या पासून औषध पाण्यांवर लक्ष नाही ठेवता आलं.आज जरा मनावरचं ओझं कमी झालं म्हणून आठवलं की,काही दिवस झाले माझं तुमच्या वर लक्षच नाही.म्हणून आलो होतो तर...मला दिसलं की, तुम्ही नेहमीच्या रात्रीच्या गोळ्या घेतल्या नाहीत नाही म्हणजे?आज दगदग झाली असेल, म्हणून कदाचित विसले असालं पण गेले बारा दिवस तूम्ही न विसरता गोळ्या घेत होता ना, त्याचा हात हातात घेत मी" बाबांकडे शंकेने बघत विचारलं.पण बाबा कसल्या तरी गहन विचारात असल्या सारखे जाणवले.म्हणून मी" त्याना पुन्हा आवाज दिला.तसे ते भानावर आले माझ्याकडे बघितलं पण...मी"विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर काही दिलं नाही.

बाबा आहो मी "काय? विचारतोय काय? झालं घेत होतात की, नाही तूम्ही गोळ्या पुन्हा एकदा म्हणालो.

सदा अरे....शांत हो घेतल्या आहेत मी "रोज गोळ्या न चुकता  तूच तर काढून ठेवत होतास ना,

काय? बोलतायं  बाबा मी "गोळ्या काढून ठेवत  होतो कुठे?

अरे ....असं काय? करतोस हे काय?इथेच टेबलवर

बाबा काय? बोलतायं इथे टेबल वर मी" गोळ्या काढून ठेवल्या आहेत मी "म्हणालो ना, आताच की ,या सर्व गडबडीत मला तुमच्या वर लक्ष ठेवता नाही आलं मला तरी आठवत नाही त्या
दिवसांत मी"तुम्हाला गोळ्या वगैरे काढून इथे ठेवल्या म्हणून

सदा अरे काय? बोलतोस तू,.... गेले बारा दिवसं शारीरिक नसला तरी मानसिक त्रास होताच रे....मला ती दिवस भराची दगदगीतून बाहेर येण्यासाठी मला फक्त आरामाची गरज असायची त्यात मला माझ्या झोपण्यापूर्वी घेण्याचा गोळ्यावघेण्याचा विसर पडायचा पण खोलीत येताचं माझं लक्ष
जाईल आशाचं माझ्या गोळ्या काढून त्या समोरच्या टेबलांवर ठेवल्या जायचा जिथून आताही तू मला दिल्यांस मला वाटायचं हे काम तूझंच असावं म्हणून म्हणून मी "आनंदाने घेत होतो.

तसही सीमा होती तेव्हा हे काम तीच करत होती पण आता ती नाही तर...तुच करू शकतोस ना,पण तू तर...म्हणतोस तू नाही ठेवल्या त्या गोळ्या टेबलं वर मग कुणी ठेवल्या सदा विचार करण्यांसारखी गोष्ट आहे नाही.

वहिनी "मी बाबाच्या बोलण्यांवर विहिनीच नाव घेतलं.

काय? म्हणालास वहिनी म्हणजे? सीमा,

हो बाबा विचार करा तूमच्या औषध पाण्यांची जबाबदारी तीच्या वर होती ना,आणि ती तीने कधी झटकली नाही.पण आजारपणात तीला ती पुर्ण नाही करता आली.पण तुम्हाला म्हणून सांगतो तेवढ्या आजारात ही तीला तूमची काळजी असायची म्हणून मग वेळ झाला की, बरोबर मला बोलवून तूमच्या खोलीत पाठवायची मगच देत होत मी "तुम्हांला औषध

म्हणजे? सदा तूला काय? म्हणायचं आहे एवढ्या दिवस माझी औषध सीमा माझ्या खोलीत आणून ठेवतेय तर...

हो बाब एवढचं बोलून मी" काही दिवसांपासून दादाच्या खोलीत घडणारा प्रकार सांगितला.आणि ते सर्व ऐकून बाबाच्या डोळ्यात नक़ळत पाणी आलं.

म्हणजे? सदा आपली सीमा अजूनही घरात वावरते वावरणारचं ना ,पोरीचा जीव आपल्यातच आडकला होता.

त्या रात्री खूप दिवसांनी बाबांशी बोललो होतो बोलून झाल्या वर बाबांना झोपायला सांगून मी"सुद्धा तूला सोबत घेऊन माझ्या खोलीत आलो नेहमीप्रमाणे तूला झोपवलं आणि मीही आढवा झालो.

सदा "..... सदा "..... अरे.... झोपतोस काय? असा, मी सांगितलेलं आहे ना तूझ्या लक्षात की विसरलास आपल्या तीर्थाचा नवस फेडायचा राहिला बघ अजून उशीर नको करूसमाझ्या तीर्थाटन त्या बाप्पाच्या पायाशी नेऊन ठेवत्याला म्हणावंवहिनीने नवस केला पण ती फेडायला विसरलीतीला माफ कर आाणि माझ्या तीर्थाला उंदड आयुष्य दे....


🎭 Series Post

View all