22) अलवार अशा वळणावरती

.....
माझा डोळा लागलाच होता की, वहिनीचा आवाज आला.आणि मी" खाडकन डोळे उघडले.आजूबाजूला नजर फिरवली.कुणीही नव्हतं.पण वहिनीचा आवाज नंतर ही माझ्या कानात घुमत राहिला.

वहिनी अग... मी "विसरलो नाही पण उद्या दादाला डाँक्टर कडे घेऊन जातो त्यानंतर लगेच दुसर्या दिवशी तीर्था आणि दादाला सोबत घेऊन जातो आणि नवस सुद्धा फोडतो ग...काळजी कशाला करतेस बरं,

वहिनी तूझी तीर्था तूझा जीव आहे मला माहित नाही का? ग.... आणि हीच तर ...तूझी शेवटची इच्छा सुद्धा म्हणून तरी मी "हे करीनच मी "वहिनीचा आवाजा सरशी प्रतिउत्तर म्हणून पुटपुटलो.आणि पुन्हा झोपी गेलो.

दुसरा दिवस सकाळी जरा लवकरच जाग आली घरात एकदमच शांतता जाणवत होती.पण मी" पटपट स्वत:च आवरलं आणि मग तूझंही आवरलं.आणि शेवटी दादाच्या रूममध्ये गेलो.

पण तो अजूनही झोपला होता.मी "त्याला उठवायला म्हणून पुढे गेलो तेव्हा समजलं की, तो झोपला नसून बेशुद्ध पडला होता.

भौतिक रात्री तो बेशुद्ध पडला होता.पण मीच गैरसमज करून घेतला की, त्याला झोप लागली असावी.पण खर तर ....तो पुर्ण रात्रभर फक्त बेशुद्ध अवस्थेत होता.

वहिनी"..नेहमी त्याचा आजूबाजूला असते मग आज काय?झालं आज कसं लक्षात नाही आलं हिच्या काय? माहित का? पण त्याला तसं निपचित पडलेलं बघून पुन्हा  एकदा वहिनीचाच राग आला.म्हणून चिडूनच वहिनीला उद्देशून बडबडलो.

सदा अरे.... काय? झालं का? चिडलांस माझ्या वर अचानक वहिनीचा मागून आवाज आला.तसा आवाजा सरशी गरक्कन फिरलो .

काय? रे.... जीवंत असताना वहिनी वहिनी करताना दमत नव्हतास पण आता असं काय? झालं की, माझे डोळे मिटले आणि माझ्या प्रती तूझा राग चिडचिड वाढली.मलाच बोलत होतास ना,म्हणून म्हटलं इतकी आठवण काढतोच आहे तर...भेटुन याव काय? म्हणतोस बोल वहिनीच्या आवाजावर मी" "इकडे तिकडे नजर फिरवली.

इकडे तिकडे काय? बघतोस दिसत नसले तरी तुझ्यां समोरच उभी आहे काय? झालंय का? चिडला आहेस एवढा वहिनीचा पुन्हा आवाज माझ्या कानावर पडला.आणि माझी ततपप झाली.

अरे.... असा काय? थरथरतोस मीच आहे बोल बरं,
पुन्हा एकदा वहिनीचा आवाज आला आणि माझी बोबडीच वळली.

वहिनी ते अग...रात्री मला वाटलं त्याला झोप लागली म्हणून मी' "तसाचं गेलो पण अग वहिनी तो दादा बेशुद्ध पडलायं पण मला ते आता समजलं म्हणून मला तूझी आठवण आली गेले बारा दिवस तर...तू तूमच्या खोलीत वावरत होतीस मग आज का? नव्हतीस आज तूझी गरज होती ना,

आणि म्हणून तूला माझा राग आला का? सदा,

नाही म्हणजे? हो पण तस काही नाही. मी"तीच्या प्रश्नाची उत्तर देताना पुरता गोंधळलो.

सदा सदा शांत हो इतका काय? गोंधळून जातोस जरी मी "या जगात नसले तरी तूझ्यांशी असलेलं नातं माझं पुसलेलं नाही. सर्व मान्य आहे मला या जगात नसले तरी तूझी माया कळते मला अजूनही"....तुझ्या प्रश्नांची उत्तर देईन मी" नंतर पण आधी डाँक्टरांना बोलव बराच उशीरा पर्यत बेशुद्ध असणं चांगलं नाही.वहिनी म्हणाली आणि मी" लगेच डाँक्टरांना काँल केला. तसा वहिनीचा पुन्हा आवाज आला,

सदा".....डाँक्टर येत नाही तोवर मी"तूझ्या प्रश्नांच उत्तर द्यावं म्हणतेयं ,

वहिनी अग तसं काही नाही खर सांगू तर...त्याची गरज नाही ते जरा माझंच चुकलं.मी "तसं चिडायला नको होतं,

सदा तू माझ्या वर चिडला या बद्दल मला काहीच बोलायचं नाही. आहे.तो तूझा हक्क आहे पण तू त्या दिवशी ब्लेम केलांस आणि आताही "...

त्या दिवशी मी" इथे होते राज जवळ कारण तो माझा नवरा आहे काही म्हणा पण कुठे? ना ,कुठे?त्याची ही काही अवस्था झालीयं त्याला पुर्ण पणे मीच जबाबदार आहे. तो इतका मासिक तणावाखाली आहे की, तो त्याचा बायकोला कधीही बघू शकणार नाही हेच माहित नाही.त्याची अवस्था मला बघवत  नव्हती तो सैरभैर होऊन माझी वाट बघत होता.
मला बघण्यासाठी त्याचे डोळे आसुसले होते मला बघून तो थोडा का? असेना प़ण शांत होईल म्हणून दिसत होते मी"त्याला पण त्यावर तू मला जे काही ऐकवलंस त्याने वाटलं की,मी काही तरी गुन्हाच केला.

काय? म्हणालास होतास की, मी तूझ्या दादाचा मानसिक त्रास वाढवते.हेच म्हणाला होतास ना,

भानावर नव्हतास रे.... तेव्हा तू विचार ही नाही केलास की, जीला तू ब्लेम करतोस ती तूझ्या दादाची बायको आहे मग ती आपल्या नवर्याचा मानसिक त्रास वाढावा आसा विचार तरी करेल का? इतक बोललांस तरीही म्हटलं जाऊ दे, आता तूझ्यां आजूबाजूची परिस्थिती अशी आहे की, तूला ती कशी सांभाळावी हे कळत नाही.म्हणून बोलला असशील म्हणून म्हटलं नको अस सतत समोर जायला इच्छा असूनही नाही आले. आज त्याचा समोर,....

🎭 Series Post

View all