Login

२४) अलवार अशा वळणावरती

भावनिक
बोलता बोलता बाबा धायमोकळून रडत होते.मी दादाचा मृत देह घेऊन घरात आलो.

थोडक्यात जसा वहिनीचा अंतिम संस्कार झाला तसा दादाचा ही झाला पण त्याचा अंतिम संस्काराला वेळ नाही लागला लवकरच सर्व आटपलं
बारा दिवस झाले आणि तेराव ही झालं आणि मग काय? पुन्हा एकदा घरात तीच शांतता पसरली.हळूहळू आम्ही दु:खातून बाहेर येत होतो अस फक्त मलाच वाटलं तसं पण तस काही नव्हत़.

बाबा मात्र दादाचा जान सहन नाही करू शकले.कारण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी,बाबाच्या रूम मध्ये गेलो.तर बाबा अजून झोपेतच होते.

नेहमी लवकर उठणारे बाबा आज एवढ्या उशीरापर्यंत कसे बर झोपू शकतात मला थोड अश्चर्य वाटलं आणि क्षणभर विचाराने भिती सुद्धा वाटली.

मी घाबरुन आवाज दिला.पण बाबा काही उठले नाही.
मी, घाबरलो  आणि बाबांन जवळ जात त्याला हालवलं.आणि मला धक्का बसला कारण बाबा झोपेतच गेले होते.

आता मात्र माझ्या ही डोक्यावरून त्याचा हात उठला.आणि माझ्या वर दु:खाचा डोंगर कोसळला.पण तूझ्यासाठी मला यातून ही सावरण गरजेच होतं.मीच दु:खात कोलमडलो तर तूझ्या कडे दुर्लक्ष हे होणारच होतं.त्यामूळे मी तूझ्याकडे बघून पुन्हा स्वत:ला सावरलं.आणि तूझ्यासाठी जगायला सुरूवात केली.

झाल बाबांना ही जाऊन तेरा दिवस झाले.महिन्यांचा आत मी, तीन चीता जाळल्या होत्या. हे पुण्यांच काम असलं तरी मला तो कमनशीबीपणा वाटत होता.ज्या हाताने तूझ्या आई बाबांना अग्नी दिला त्याच हाताने मला तूला सांभाळायचं आहे
आंकरायचं आहे गोंजारायचं आहे.पुढे जे काही करायचं ते तूझ्या साठी करायचं असं मनाशी पक्क करत तूला लहानाची मोठी होताना बघत होतो आणि बघता बघता ही इतकी मोठी झालीस की आता या विसरभो़ळ्या सदा काकालातूझ्या शिवाय दुसरे कु़णीही समजून घेत नाही.

बसं एवढच इथून सूरू झाला तो तूझा प्रवास माझा हात पकडूनच आणि अजूनही तसाच पकडलेला.आहे तूझ्या काकू मुळे कधी कधी तू खूप दुखावली जातेस मला माहित आहे.आता फक्त एकच काम राहिलं तूझ्या काकूंच्या जाचातुन तूला बाहेर पडता याव यासाठी एक चांगला मुलगा चांगलं घर मिळालं आणि तूझा हा नाजूक हात त्याचा हातात दिला की, मी मोकळा मग मेल्यानंतर वहिनी दादाला गर्वाने सांगू शकेन बघा दादा वहिनी तूम्ही माझ्या वर टाकलेली कर्तव्य पुर्ण करून आलोयं इथे आपण कुणीही नसलो तरी तीचा हात घट्ट पकडून कुणीतरी तीच्या सोबत कायम असणार आहे.

मला माहित आहे तेव्हा दादा वहिनी तूझ्यासाठी खूप खुश असणार आहेत आणि माझीही पाठ थोपडणार आहेत

सदा काका काय? अभद्र बोलतोस अरे आज तूझ्या तीर्थाचा वाढदिवस आहे आणि तू मरणाच्या गोष्टी करतोस जा मला तूझ्या शी बोलायचंच नाही आहे.

. अरे... बापरे माझी तीर्थाचा रूसली  का? माझ्या वर अरे... पण तू माझ्या शी बोलली नाहीस तर... माझा श्वास नाही का? थांबणार

सदा काका? काय? आहे सारख मरण मरण एवढीच मारायची हौस आलीय म्हणजे?आई बाबासारखा तूला माझा कंटाळा आला की, काय?तसं असेल तर सांग ना,तूला काय? गरज आहे मरायची मी जाऊ शकते ना घरातून,...

तीर्था "काय? बोलतेस हे कुठे? जाणार आहेस या घरातून खबरदार पुन्हा असं बोललीस तर याद राख माझा हात उठेल तूझ्या वर एक गाठ बांधून ठेव स्वत:शी हे घर तूझं आहे. त्यामूळे या उंबरठ्या बाहेर पाऊल लग्नानंतर टाकायचां कुणाच्या बोलण्यांने किवा कुणाचा त्रासाला वैतागून नाही.कुणाला जर इतकीच खटकत असशील ना, तू तर मग त्या व्यक्तीने हे घर सोडाव कुणीही आढवणार नाही म्हणावं

तीर्थाला बजावता बजावता मध्येच त्यानी त्याचा बायकोला मोठ्या आवाजात टोपणा मारला तो तीर्थाला कळून चुकला तीने इकडे तिकडे नजर फिरवली तर काकू दाराच्या फटीतून कान टवकारून उभी होती.

काका पूरे काय? करतोस टोमणा काय? मारतोस मला बोलता बोलता हे काय? मध्येच आणि हे रे काय? हे घर तूझं आहे माझं नाही तसही तूच म्हणतोस ना, मला लग्नानंतर या घराचा उंबरठा ओलांडायचा आहे म्हणून मग मी जिथे जाईन तिथे हे घर घेऊन जाता तरी येणार आहे का? मग ते तूझंच आहे.

शू.....  काही ही बोलू नको तूझ्या काकू ला नाही तरी हे घर घशातच घालायचं आहे पण घालता येत नाही.कारण हे घर कागदोपत्री तूझ्या नावावर आहे. हे तीला चांगलचं मीहित आहे.म्हणून तीला काही करता येत नाही आणि म्हणून मग अशी तूझ्या वर घुरगूरी करून पाण्यावाचून मासा जणू तडफडते.

सदा काका जाऊ दे,ना कशाला काही बोलतोस तू मला मुलगी मानतोस ना ,मग नात्यांने मीही तीची मुलगीच आहे ना कदाचित पुढे जाऊन तीला माझ्यातली मी कळू शकेन,

हो ग...काय? माहित तू तीला कधी कळशील की कळणार ही नाहीस पण तू मात्र वहिनी सारखी कोणत्या मातीची बनली आहेस काय? माहित एक गालावर मारलं की, दुसरा ही गाल पुढे करणारी तू,

बोलता बोलता सदा काकाच्या डोक्यातून विषय भरकटला
आणि मध्येच सदा काकांना काही तरी आठवलं आणि चालू विषय थांबवत"....

पुरे हे काय?तीर्था आपण भर उन्हात का?उभे आहोत मी" कुठे?निघालो होतो  का? विसरलो बघ हे असं आहे असं बोलत ठेवतेस आणि ज्या कामाला जायचं असतं तेच राहून जात  आता अशी बघत काय? राहिलीस सांग मी, "कुठे?, निघालो होतो का? आणि जर का? निघालो होतोच तर मग कुठे?ते तरी सांग मला काहीच का? आठवत नाही सदा काकां बोलता बोलता डोक्याला हात लावून विचार करायचा प्रयत्न करत म्हणाला.


सदा काका? अरे.... तू शांत हो इतका काय? विचार करतोस
मी" आहे ना" सांगायला मग.... मला सांग आज काय? आहे

माझी परीक्षा घेतेस का? तूला माहित नाही का? आजचा दिवस मी"कधीच विसरू शकत नाही.

हो रे.... काका?ज्या गोष्टीत तूझी तीर्था असेल ती गोष्ट तू विसरणं शक्य नाही.

मला माहित आहे मला पण आज माझ्या वाढदिवसा सारखाचं अजून कुणाचा तरी वाढदिवस आहे आठवतंय का? बघ बरं तीर्था सदा काका कडे बघत म्हणाली तसा सदा काका? तीर्था च्या बोलण्यावर विचार करू लागला.

हा आठवलं आज जयंती आहे बाप्पाची मध्येच सदा काका काही तरी आठवल्या सारखा ओरडला.

बरोबर गणेश जयंती आहे किती सोप होतं बघ बर आणि तू आहेस की, विचार करता करता डोक्यावर तान आणतोस,

हे सर्व ठिक आहे पण मी"मंदिरात कशाला चाललोय

अरे"सदा काका? असं काय? करतोस तू न जाऊन कसं चालेलं आजच्याचं दिवसांचा प्रश्न नाही हा त्या गणारायाची सुरूवात रोजच तूझ्या पुजेने होते. आणि आज तर तू खूप उशीर लावलास आतुरतेने वाट बघत बसला असेलं.तो बाप्पा सदा काका अरे असं काय? करतोय तू पुजारी नाही का?  बाप्पांचा मंदिराचा

अरे.... देवा काय? ग... हे तीर्था माझा देव वाट बघून तांठकळ ला असेल तूला माहित आहे, ना"तूझां सदा काका विसरभोळा आहे आणि तू आता आठवण करून देतेस.